Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया सुरू-अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत – Pune University Admission 2024

Pune University Admission 2024

Pune University Admission 2024 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. त्यासाठीची ही प्रक्रिया शनिवारी (दि.२०) पासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १० मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पुणे विद्यापीठात ५२ विभाग असून, दर वर्षी शेकडो विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतात. नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून विद्यार्थी विद्यापीठातील विभागांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. या वेळी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना २० दिवसांची मुदत देण्यात आली असून, पदवी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा १३ जून रोजी, तर पदव्युत्तरसाठी परीक्षा १४ ते १६ जूनदरम्यान घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत.

पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी १२वी उत्तीर्ण केलेली असावी, तर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान आवश्यक गुणांसह पदवीधर पदवी धारण केलेली असावी, असे पात्रतेचे निकष आहेत. ही प्रवेश परीक्षा १०० गुणांची असून, २० गुण हे सामान्य ज्ञानावर असतात, तर ८० गुणांची संबंधित विषयाची परीक्षा असते. या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असून, ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड