दिवाळीपूर्वी मानधन मिळणार, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या दिवाळीत गोडवा! | Pune Shikshak Bharti 2024

Pune Shikshak Bharti 2024

Pune Shikshak Bharti 2024

पुणे विभागातील ४२ वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील ४८६ सहाय्यक प्राध्यापकांना दिवाळीपुर्वी मानधन मिळणार असल्याने या प्राध्यापकांचा दिवाळीतील गोडवा वाढणार आहे. मानधन मिळणार असल्याने या प्राध्यापकांना मोठा दिलासाही मिळणार आहे. पुणे विभागात पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. बहुसंख्य महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची कायमस्वरुपी पुर्णवेळची पदे भरण्यात आलेली नाहीत. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सहाय्यक प्राध्यापकांची १०० टक्के पदे भरण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मकता दर्शविण्यात आलेली नाही. सन २०१८ मध्ये ४० टक्के पदे भरण्याबाबतची सुरु करण्यात आली. ही प्रक्रिया काही महाविद्यालयांनी अद्यापही पुर्णच केलेली नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

 

महाविद्यालयांनी पर्यायी व्यवस्था म्हणुन तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याचा धडाका लावला आहे. महाविद्यालयाकडून तासिका तत्वावरील प्राध्यापकांकडून भरमसाठ कामेही करुन घेतली जातात. मात्र त्यांना त्या तुलनेत आर्थिक मोबदला मात्र दिला जात नाही. त्यामुळे तासिका तत्वावरील प्राध्यापकांना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. शासनाकडून मानधनातही फारशी वाढ झालेली नाही. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापकांची मान्यता पत्रे देण्यात खुप विलंब लावला. त्यामुळे प्राध्यापक आणखीनच अडचणीत सापडले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीकरिता कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. तासिका तत्त्वावरिल प्राध्यपकांच्या मानधनाबाबत सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठ मान्यता प्राप्त होताच महाविद्यालयांनी दरमहा नियमीत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाची बिले सादर करणे आवश्यक आहे. त्याबाबत परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वारंवार बजाविले होते. त्यानुसार ४२ महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या मानधनाबाबतचे परिपुर्ण प्रस्ताव सहसंचालक कार्यालयाकडे सादर केले होते. यासाठी ३ कोटी २७ लाख रुपयांच्या रक्कमेची देयके कोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांना तात्काळ ती प्राध्यापकांना अदा करावी लागणार आहे.

“पुणे विभागातील बहुसंख्य महाविद्यालयांनी तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचे प्रस्ताव अद्यापही सहसंचालक कार्यालयाकडे सादर केलेले नाहीत. त्यामुळे या संबंधित महाविद्यालयांनी दिवाळी सणापुर्वी देय ठरत असलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना महाविद्यालयीन स्तरावरुन मानधनाची रक्कम अदा करणे आवश्यक आहे.” – डॉ. अशोक उबाळे, सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग.

 


राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. प्रचलित शासन निर्णयाचे पालन करूनच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ चे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी एकूण २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी २ लाख़ १६ ह्जार ४४३ उमेदवार प्रविष्ट झाले. जून ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदुनामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदुनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या १० टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या ७० टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण सन २००४ पासून शासनाने अंगीकारलेले आहे. अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा या मराठीतूनच शिक्षण देणाऱ्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत, या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या संज्ञेची व्याप्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सध्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर शिक्षकांची २ लाख १४ हजार पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कार्यवाही होत असलेली सेमी इंग्रजी व साधन व्यक्ती मिळून ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहेत, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

Pune Shikshak Bharti 2024: The civic administration has decided to fill up 355 vacant posts of teachers in old limits, including schools including those included in the municipal limits. The proposal has been sent to the state government for final approval of the point list and the teacher recruitment process will be implemented by the civic administration through the holy portal under Pune Shikshak Bharti 2024. The bmc has Marathi, English, Urdu and Kannada medium schools. These schools have 1.25 lakh students studying and the number of teachers is inadequate as teachers have not been recruited for many years. In the absence of teachers, the same teacher has been given the responsibility of two classes each and parents and teachers have also staged protests against it.

 

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या शाळांसह जुन्या हद्दीतील शिक्षकांच्या रिक्त ३५५ जागा भरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठीच्या बिंदुनामावलीस अंतिम मान्यता मिळविण्यासाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमधून सव्वा लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक वर्षात शिक्षक भरती न झाल्याने शिक्षकांची संख्या अपुरी आहे. शिक्षकांअभावी एकाच शिक्षकांवर दोन-दोन वर्गांची जबाबदारी देण्यात आली असून त्याविरोधात पालक, शिक्षकांनी आंदोलनेही केली आहेत. 

 

महापालिकेकडील आकडेवारीनुसार शिक्षकांच्या ६५० जागा रिक्त आहेत. मात्र राज्य शासनाने रजा मुदतीमधील ९३ शिक्षकांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंतरजिल्हा बदली पद्धतीनुसार काही शिक्षक महापालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे सध्या रिक्त जागांची संख्या ३५५ एवढी आहे. ही पदभरती येत्या काही दिवसांत केली जाणार आहे.

शिक्षण विभागातील शिक्षकांची बिंदुनामावली तयार करून ती राज्य शासनाकडे महापालिकेने मंजुरीसाठी पाठवली आहे. राज्य शासनाने उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर केली आहे. मात्र, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर झालेली नाही. येत्या काही दिवसांत त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. दरम्यान, जुन्या हद्दीतील शाळांबरोबरच समाविष्ट गावांनाही पदभरतीनंतर शिक्षक दिले जाणार आहेत. समाविष्ट गावांतील ६५ पैकी ६१ शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरित शाळा येत्या काही दिवसांत हस्तांतरित होणार आहेत.


There are 530 vacancies in the district. The zilla parishad has decided to appoint retired teachers on contractual basis at the site. All the powers to appoint retired teachers have been given to the block development officers of those talukas. The zilla parishad’s education department has sought information on the vacant seats in all talukas about Pune Shikshak Bharti 2023. According to the report, 530 teaching posts are vacant in the district. Retired teachers will be appointed at the site. The primary education officer said an advertisement for the same will be released soon.

 

जिल्ह्यात 530 प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्‍ती करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने केला आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचे सर्व अधिकारी त्या त्या तालुक्‍यातील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व तालुक्‍यातील रिक्त जागांची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 530 शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. 

 

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांमधील शिक्षकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे दुर्गम भागासह इतर ठिकाणीही शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत केले जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 


 

While crores of rupees are being spent on the schools of Pune Municipal Corporation, on the other hand, there are not enough teachers to teach the students. Out of the total number of teacher posts in Pune Municipal Corporation, 727 posts were vacant. The municipal corporation received 219 teachers through inter-district transfer, but still 508 posts are vacant. But as the process of teacher recruitment is not done by the government through the holy portal, the municipal administration has also become helpless.

 

पुणे महापालिकेच्या शाळांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेशे शिक्षक नसल्याने शैक्षणिक गुणवत्तेचा व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेतील एकूण शिक्षकांच्या जागांपैकी ७२७ जागा रिक्त होत्या. आंतरजिल्हा बदलीतून महापालिकेला २१९ शिक्षक प्राप्त झाल्याने अद्यापही ५०८ जागा रिक्त आहेत. पण शासनाकडून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रियाच केली जात नसल्याने महापालिका प्रशासन देखील हतबल झाले आहे. 

पुणे महापालिकेच्या शहरात मराठी, उर्दू, कन्नड, इंग्रजी माध्यमाच्या मिळून एकूण २८४ शाळा आहेत. या ठिकाणी बालवाडी पासून ते इयत्ता १०वी पर्यंत शिक्षण दिले जाते. शहरातील ९३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

 

या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असतात. वर्गखोल्या वाढविण्यासाठी भवन विभागातर्फे तरतूद केली जाते. गेल्या काही वर्षापासून इ लर्निंग, विविध प्रकारच्या प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यावरही महापालिकेचा भर आहे. या गोष्टींवर भर असला तरीही विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या शाळेतील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढत गेली आहे. त्यातच महापालिकेत हद्दीलगतची ३२ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील रिक्त जागांमुळे ही संख्या वाढली आहे.

 

महापालिकेच्या जुन्या हद्दीतील शाळांमधील शिक्षकांच्या ३१७ जागा रिक्त आहेत, तर समाविष्ट गावातील रिक्त जागांची संख्या ३५० इतकी आहे. गेल्या दीड वर्षात महापालिकेकडे २१९ आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणे आली होती. त्यास नुकतीच महापालिका प्रशासनाने मान्यता दिली. त्यामुळे येत्या काळात महापालिकेकडे २१९ शिक्षक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रिक्त जागांची संख्या घटून ७२७ वरून ५०८ इतकी झाली आहे. पण अद्याप यातील अनेक शिक्षक महापालिकेकडे रुजू झालेले नाहीत.

 


 

 तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ८९ उपशिक्षक कमी असून पदवीधरच्या ४२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा बंद राहण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. काही ठिकाणी एक शिक्षक असल्याने त्याच्यावर अतिरिक्त ताण येत असून त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी मागणी पालकांमध्यून होत आहे.

 

भोर तालुक्यात २७४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून १ ते ७ वीपर्यंत सुमारे नऊ हजार ७११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर या शाळांवर ६५३ शिक्षक कार्यरत आहेत. दीड वर्षापूर्वी भोर तालुक्यातील १६१ शाळा दुर्गम होत्या. या दुर्गम भागात तीन वर्षे काम केल्यावर सुगम भागात ऑनलाइन बदल्या झाल्या होत्या. मात्र, सुगममध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर दुर्गम भागात नवीन शिक्षक रुजू झालेले नाहीत, त्यामुळे दुर्गम भागात प्राथमिक शिक्षक कमी आहेत. शासनाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे सदर शाळांवर शिक्षक आले नाहीत.

त्यामुळे भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी नीरा देवघर, भाटघर धरण भागातील शाळांवर ८९ उपशिक्षक कमी आहेत, तर पदवीधर जागा समुपदेशनमध्ये शिक्षकांनी स्वेच्छेने घेतल्या पहिजेत; पण दुर्गम भागातील शाळा पदवीधर शिक्षक घेत नाहीत. त्यामुळे पदवीधर ४२ जागा रिक्त आहेत.

Pune Shikshak Recruitment 2022

Pune Shikshak Bharti 2022

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड