JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पुण्यात JCB, HDFC बँक अन् टेक महिंद्रासह १३ कंपन्यांमध्ये थेट एन्ट्री! १० वी, १२ वी आणि पदवीधरांना संधी! – Pune PM Internship Jobs

Pune PM Internship Jobs 2026 – पुण्यात नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर उमेदवारांसाठी नोकरीची एक मस्त संधी समोर आली आहे. कौशल्याधारित शिक्षणाला प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची जोड देऊन तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्यांतर्गत देशभरात तब्बल ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देशातील आघाडीच्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये थेट कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली असून, यात ३१ हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी जेसीबी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९००० रुपये विद्यावेतन दिले जाईल. पात्र उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या पोर्टलवर त्वरित अर्ज करावा.

पुणे जिल्ह्यातील उद्योगांचे जाळे पाहता, अनेक दिग्गज कंपन्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. पुण्यातील रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

Pune PM Internship Jobs

कंपनीचे नावउपलब्ध जागा
जेसीबी इंडिया लिमिटेड१२०
क्वीज कॉर्पोरेट लिमिटेड५०
एचडीएफसी बँक लिमिटेड२२
बेलराईस इंडिया लिमिटेड२०
टेक महिंद्रा लिमिटेड२०
चोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स१५
बर्जर पेन्ट्स इंडिया लिमिटेड१४
हनीवेल टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स लॅब
द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड
एमक्युर फार्मास्युटिकल्स लिमिटेड
जे. के. सिमेंट लिमिटेड
एच. जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड
स्कोडा ऑटो व्होल्क्सवॅगन इंडिया

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

काय आहे पात्रता आणि निकष?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही निश्चित पात्रता निकष ठरवले आहेत:

  • वयोमर्यादा: अर्जदार उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे.
  • नागरिकत्व: उमेदवार भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे.
  • शैक्षणिक पात्रता: किमान १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत.
  • अपात्रता: जे उमेदवार सध्या पूर्णवेळ नोकरी करत आहेत किंवा नियमित शिक्षण घेत आहेत, ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
  • अपवाद: ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणारे विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.

महिन्याला ९००० रुपये विद्यावेतन आणि प्रमाणपत्र
निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी ही इंटर्नशिप दिली जाईल. या कालावधीत उमेदवारांना दरमहा ९००० रुपये इतके विद्यावेतन दिले जाणार आहे. ज्यामुळे तरुणांना आर्थिक हातभार तर लागेलच, सोबतीला कॉर्पोरेट जगताचा अनुभवही घेता येईल. इंटर्नशिपचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना केंद्र सरकार आणि संबंधित कंपनीतर्फे अनुभवाचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल, जे त्यांच्या भविष्यातील नोकरीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

अर्ज कसा करावा?
या योजनेअंतर्गत नामांकित कंपन्यांमध्ये अर्ज करण्यासाठी अत्यंत मर्यादित कालावधी उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत पोर्टल pminternship.mca.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करावी आणि उपलब्ध रिक्त पदांसाठी त्वरित अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
योजनेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ‘जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे’ या कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी. किंवा कार्यालयीन वेळेत ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड