नागपूर मध्ये एकदम १४ नवीन रुग्ण – Maharashtra, Pune, Mumbai, Nagpur Corona Count update today

Pune Corona update today


Maharashtra: Pune, Mumbai, Nagpur, Sangli, Nagar All Count Updates From Maharashtra About Corona Count is given below. more #COVID19 cases reported in the state. The Latest Count Updates of District wise Corona updates From Maharashtra are given below. 

 

आज १२ एप्रिल २०२० : नागपूर शहरात चक्‍क 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रशासन आणि नागपूरकरांच्या चिंतेते चांगलीच वाढ झाली आहे. सहा रुग्ण मेयोमध्ये दाखल करण्यात आले आहेत. ते मरकज येऊन आले होते. तर 8 रुग्णांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. हे रुग्ण खामलामध्ये आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते.नागपूरही कोरोना पासून आता दूर नाही. रविवारी सकाळी दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दुपारी आणखी 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळून आले. यामुळे एकाच दिवशी उपराजधानीत 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. आता एकट्या नागपुरात 41 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हि बातमी सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईट वर आताच प्रकाशित झालेली आहे. (लिंक : https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/found-14-corona-positive-patients-nagpur-279732)  

जगासह देशात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात रुग्ण कमी होते. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असून, देशातील लॉकडाउनही वाढविण्यात आला आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढतच आहेत. गुरुवारी एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनाने रात्रीच युद्धपातळीवर मोहीम हाती घेत उपाययोजनेला सुरुवात केली होती. याअंतर्गत सतरंजीपुरा भागातील रुग्णाच्या रहिवास क्षेत्रातील बडीमशीद आणि त्याला लागून असलेल्या मस्कासाथचा भाग सील केला होता.


 ११ एप्रिल २०२० : राज्यातील करोना रुग्णांची संख्या १५७४ वर गेली आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही कायम ठेवणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी आणखी 16 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल.

जिल्ह्यानिहाय रुग्णांनाचा आकडा खाली दिलेला आहे. देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती असून 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून उमटला आहे. नरेंद्र मोदी शनिवार 11 एप्रिलला पुन्हा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून लॉकडाऊनच्या मुदतवाढीचा फैसला याच दिवशी होण्याची चिन्ह आहेत. देशात आणीबाणी लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (PM Narendra Modi to decide on Corona Lockdown Extension)

DistrictTotal casesRecoveredDeathsNotes
Mumbai City + Mumbai Suburban1,00812164
Thane1198Kalyan-Dombivli (34), Navi Mumbai (32), Thane (28), Mira-Bhayandar (21), Thane rural (3), Ulhasnagar (1)
Palghar154Vasai-Virar (12), Palghar rural (3)
Raigad61Panvel (6)
Total in Mumbai Metropolitan Region1,14812177
Pune2482825Pune (219), Pimpri-Chinchwad (22), Pune rural (7)
Sangli26240
Ahmednagar2530
Nagpur2541
Aurangabad1721
Buldhana1301
Akola1200
Latur800
Nashik701
Satara611
Kolhapur500
Ratnagiri511
Amravati401
Osmanabad400
Yavatmal430
Jalgaon201
Beed100
Gondia100
Hingoli100
Jalna100
Sindhudurg110
Washim100
Total (all districts)1,574188110

 

१ एप्रिल २०२०  अपडेट 

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा आज पुन्हा वाढला असून सध्या तो ३२० वर पोहोचला आहे. काल मंगळवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३०२ एवढी होती. परंतु आज १ एप्रिल रोजी तो आकडा वाढून ३२० वर पोहोचला. यामध्ये मुंबईत १६ आणि पुण्यात २ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत.

३१ मार्च – आज राज्यात एकूण 82 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 302 झाली आहे. या रुग्णांमध्ये 59,मुंबई 13 मुंबई परिसरातील शहरी भागातील, 5 पुणे, 3 अहमदनगरचे व 2 बुलढाणा येथील आहेत.

राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून उद्यापासून राज्यात या योजनेमध्ये सुमारे 1 हजार रुग्णालये सहभागी होणार आहेत त्याद्वारेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातील.

राज्यात 13 शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज 2300 चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून 3 शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या 16 होणार आहे.

राज्यातल्या काही खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना चाचणी करायला परवानगी देण्यात आली. पण गेल्या ५ दिवसांमध्ये या प्रयोगशाळांमधून चाचणी झालेले पॉझिटिव्ह रुग्ण यात धरले गेले नव्हते. आजच्या अहवालामध्ये ही संख्या एकत्रित देण्यात आली आहे. त्यामुळे आज एवढी संख्या वाढल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे.

  • अहमदनगर-३
  • मुंबई- ५९
  • पुणे-२
  • ठाणे-२
  • कल्याण डोंबिवली-२
  • नवी मुंबई-२
  • वसई विरार-२

३० मार्च – आज नवीन रुग्णात गुलटेकडी परिसरातील झोपडपट्टीतील दोघांचा तसेच बारामती येथील एका रिक्षाचालकाचाही समावेश आहे. आता पुण्यात रुग्ण संख्या ४३ आहे.  राज्यात आणखी १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक ५ पुण्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत तीन, नागपूरमधील दोन आणि कोल्हापूर व नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

District Corona Patient Count in Maharashtra 

Corona infected patients count updates in Maharashtra is given below. This count is on the 31th March 2020.


29 March 2020 Updates – आजच महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 215  झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ०३, रत्नागिरी ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३, मिरज २५, सातारा ०२, सिंधुदुर्ग ०१, कोल्हापूर ०१, जळगाव ०१, बुलढाणा ०१ अशी रुग्णांची संख्या प्राप्त झाली आहे . तर मुंबई १४, पुणे १५, नागपूर ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३ असे एकूण ३४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १५५ रुग्णालयात ऍडमिट आहेत. हि माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. याशिवाय नवीन अपडेट्स आम्ही वेळोवेळी प्रकाशित करत राहू.Pune Coronavirus disease (COVID-19) :  Pune Corona update today : Updates of number of CORONA Infected Persons Live Updates Details are given here. We will keep updating this Page with Latest Number of CORONA infected persons Number in Pune Region. The Current Live count of Corona affcted persons in Pune is 37 as per the current new resources. More updates will be declared here. So this COVID19 an infectious disease caused by a new virus. Pune has reported yet another positive coronavirus case taking the total in the region to 37 . The latest patient had a travel history to France and Netherlands.

Sunday 29 March Update : महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असून बाधितांची संख्या १९६ वर गेली आहे.  शनिवारी (दि.28) रोजी एकाच दिवशी चार कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. हे तीनही जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण पुणे शहरातील आहेत. पुण्यात गेल्या १९ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 37 वर जाऊन पोहोचली आहे .  • Pune Corona Count on 29 March 2020 : 37 

Pune Corona Live Count Updates

For More Updates Please Keep visiting MahaBharti.inLeave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड