लाडक्या बहिणींना नाराजी, पेमेंट मिळाले कमी! – Promise or Cutback?

Promise or Cutback?

राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू ठेवली असली तरी, लाभार्थींना केवळ 1500 मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, सध्याच्या अंदाजपत्रकात योजनेच्या निधीत कपात झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Promise or Cutback?

योजना सुरू झाल्यापासून सुमारे 2.53 कोटी महिला लाभार्थी ठरल्या असून, आतापर्यंत 33,232 कोटी खर्च झाले आहेत. सुरुवातीला 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती, परंतु आता 2025-26 साठी फक्त 36,000 कोटींची तरतूद असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर 1500 ऐवजी 2100 देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केले असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही मान्य केले. त्यांनी आपल्या कवितेतून “लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो… विकासाची केली कामे, म्हणून आम्ही पुन्हा आलो!” असे म्हणत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, महिलांच्या अपेक्षा आणि सरकारची कृती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे असे विरोधी  पक्षाचे म्हणणे आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड