विद्यापीठातील विविध अधिविभागातील प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे! – Pradhyapak Bharti 2024

Professor Bharti 2024

Pradhyapak Bharti 2024 Update

शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागातील प्राध्यापकांच्या ७२ पदांच्या भरतीचा प्रस्ताव पुन्हा राज्य शासनाकडे सादर केला आहे. शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर अर्ज मागविण्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशा ६५९ पर्दाच्या भरतीला शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये मान्यता दिली. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला एकूण ७२ पर्दाच्या भरतीसाठी मान्यता मिळाली.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भरतीसाठी मान्यता मिळालेल्या पदांच्या अधिविभागानिहाय बिंदुनामावली (रोस्टर) तयार करून त्याच्या तपासणीचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये शासनाकडे पाठविला, त्याला शासनाकडून मान्यताही मिळाली. त्यानंतर अर्जासह अन्य प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यास व्यवस्थापन परिषदेने पाच फेब्रुवारीला मान्यता दिली. त्यानंतर या बिंदुनामावलीमध्ये पुन्हा मराठा, एसईबीसी आदी आरक्षणानुसार बदल करण्यासाठी राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडे या पदांच्या भरतीचा प्रस्ताव विद्यापीठाने सादर केला. या कक्षाच्या संबंधित प्रस्तावावरील कार्यवाही नुकतीच पूर्ण झाली असून, अंतिम मान्यतेचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे दरम्यान, या प्रस्तावाला शासनाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शैक्षणिक कामकाजाला गती मिळणार
प्राध्यापकांच्या ७२ पदांची भरती प्रक्रियेचा प्रस्ताव मान्यता अंतिम  टप्प्यात आहे. ही मान्यता लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण होईल. त्याने विद्यापीठातील शैक्षणिक कामकाजाला गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. स्वागत परुळेकर यांनी व्यक्त केली.

दृष्टिक्षेपात…
• प्राध्यापकांची मंजूर पदे……. २६२
■ रिक्त पदे…. १३९
• सध्या कार्यरत प्राध्यापक ….. १२३
■ भरती होणारी पदे……………७२


Professor Bharti 2024

Professor Bharti 2024: शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापकांची ३७ पदे भरण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही पदे वाढताच नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तरच्या जागा ५१ वर पोहचतील. त्यामुळे नागपूर हे राज्यातील सर्वाधिक पदव्युत्तर जागा असलेले शासकीय दंत महाविद्यालय ठरेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नागपुरातील दंत महाविद्यालयात सर्वाधिक जागा
राज्यात नागपूर, मुंबई, औरंगाबाद अशी तीन शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये आहेत. मुंबईच्या दंत महाविद्यालयात पदव्युत्तरच्या सुमारे ५० जागा, नागपूर आणि औरंगाबादला प्रत्येकी २४ च्या जवळपास जागा मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे मंजूर जागांपेक्षा कमी विद्यार्थीच पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.
नागपुरातील रुग्णालयाने वैद्यकीय शिक्षण विभागाला ३७ पदे भरण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रवेश क्षमता ५१ वर पोहचेल. ही पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचे नियोजन आहे. त्याबाबत वैद्यकीय शिक्षण खात्याला प्रस्तावही गेला आहे. त्याला शासनाने अनुकूलताही दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच ही पदे कंत्राटी स्वरूपात भरून येथे पदव्युत्तर जागा वाढतील. त्यानंतर ही पदे कायम स्वरूपातही भरली जातील, असे नागपूर दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी सांगितले.

नऊ विषयांसाठी प्राध्यापकांची पदे भरणार

नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात लवकरच सुपरस्पेशालिटी दंत रुग्णालय सुरू होणार आहे. त्यासाठी येथे प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ निवासी डॉक्टर अशा वेगवेगळ्या ९ विषयात ३७ प्राध्यापकांची पदे भरली जातील. त्यात कृत्रिम दंतशास्त्रचे ६, दंत शल्यशास्त्रचे ६, बाल दंतशास्त्रचे ४, मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्रचे ४, मुख शल्य चिकित्साशास्त्रचे ४, दंत व्यंगोपचारचे ४, दंत विकृतीशास्त्रचे ४, बायोमेडीकल इंजिनिअर विभागाचा एक अशी एकूण ३७ पदे आहेत. नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापकांची ३७ पदे भरताव पदव्युतरच्या जागांची संख्या ५१ वर पोहोचेल. ही राज्यातील शासकीय दंत महाविद्यालयातील सर्वोच्च संख्या असेल. त्यामुळे गरीब- मध्यमवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना माफक दरात दर्जेदार पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. – डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय


 Professor Recruitment 2024

शिवाजी विद्यापीठात प्राध्यापकांची एकूण ७२ पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. त्याबाबतची प्रक्रिया विद्यापीठाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु केली. मात्र, मराठा आरक्षणामुळे बिंदूनामावली (रोस्टर) नव्याने तयार होणार आहे. त्यामुळे आणि आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे या निवडणुकीनंतरच भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदांच्या भरतीला शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये मान्यता दिली. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला एकूण ७२ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली. त्यामध्ये सहायक प्राध्यापक ६२ आणि सहयोगी प्राध्यापकांची १० पदे आहेत. भरतीसाठी मान्यता मिळालेल्या पदांच्या अधिविभागनिहाय बिंदूनामावली तयार करून त्याची तपासणीचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे पाठविला. त्याला गेल्या महिन्यात शासनाची अंतिम मान्यता मिळाली. त्यानंतर अर्जासह अन्य प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यास व्यवस्थापन परिषदेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मान्यता दिली. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली. राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले. त्यामुळे या आरक्षणानुसार आता भरती प्रक्रियेसाठी बिंदूनामावली तयार करण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाकडून सुरु आहे.

 

प्रशासनाची योग्य कार्यवाही
मराठा आरक्षण जाहीर झाल्यामुळे रोस्टरची प्रक्रिया नव्याने होईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरु होईल. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. विद्यापीठ प्रशासन याबाबत योग्य ती कार्यवाही करत असल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य स्वागत परुळेकर यांनी दिली.

 

विद्यापीठातील प्राध्यापकांची मंजूर पदे ः २६२
रिक्त असेलली पदे ः १३९
सध्या कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांची संख्या ः१२३
भरती होणाऱ्या पदांची संख्या ः ७२

 


शिवाजी विद्यापीठातील राज्य शासनाने मान्यता दिलेल्या प्राध्यापकांच्या एकूण ७२ पदांच्या भरतीची प्रक्रियेला प्रारंभ झाला. त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आज मान्यता दिली. राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदांच्या भरतीला शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये मान्यता दिली. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला एकूण ७२ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली. त्यामध्ये सहायक प्राध्यापक ६२ आणि सहयोगी प्राध्यापकांची १० पदे आहेत. भरतीसाठी मान्यता मिळालेल्या पदांच्या अधिविभागनिहाय बिंदूनामावली (रोस्टर) तयार करून त्याची तपासणीचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये शासनाकडे पाठविला. त्याला गेल्या महिन्यात शासनाची अंतिम मान्यता मिळाली. त्यानंतर अर्जासह अन्य प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यास व्यवस्थापन परिषदेने आज मान्यता दिली. विद्यापीठात प्राध्यापकांच्या मंजूर जागांपेक्षा निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे तासिका आणि कंत्राटी तत्त्वावर विद्यापीठाला प्राध्यापकांच्या नेमणुका कराव्या लागत आहेत. आता प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याने त्याबाबतचा प्रशासनावरील ताण कमी होवून शैक्षणिक कामकाजाला गती मिळणार आहे.

 

दरम्यान, क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्या दैनिक भत्त्यामध्ये वाढ करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. लॉ अभ्यासक्रमाच्या अपात्र विद्यार्थ्यांना बार कौन्सिलच्या निर्णयास अधीन राहून सम-विषममध्ये परीक्षा देण्यास मान्यता मिळाली. महाविद्यालय दर्जा तपासणीसाठीच्या समितीत व्यवस्थापन परिषदमधून नावे निर्देशित करण्यात आली. बी. कॉम बँकिंग आणि फायनान्स अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. विद्यापीठाचा ६० वा वार्षिक अहवाल मंजूर करण्यात आला.

 


उच्च शिक्षणात तासिका तत्त्वावरील प्राध्यापक भरतीचे धोरण बंद करण्यात यावे, एकत्रित एकरकमी वेतन प्राध्यापक भरतीचे धोरण निर्माण करून तत्काळ पदभरती करण्यात यावी आणि राज्यात प्राध्यापक भरती उच्च शिक्षण संचालनालयाच्या पोर्टलद्वारे केंद्रीय पद्धतीने करावी, अशा मागण्यांचे निवेदन प्राध्यापक पदभरती महासंघाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. राज्यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना तुटपुंजे वेतन मिळते आणि तेही वेळेत मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी या प्राध्यापकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्याशिवाय प्राध्यापक पदभरती प्रक्रियेतही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नोकरी मिळेलच, याची शाश्वती नसते. एवढेच नव्हे, तर राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त जागांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज करावे लागतात, त्याऐवजी उच्च शिक्षण संचालनालयाने ही प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने पोर्टलद्वारे राबवावी, अशी मागणी महासंघातर्फे करण्यात आली आहे. 

 

‘राज्यातील विविध विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये यातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांसाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. तसेच एवढे करूनही निवडीची अनिश्चितता आहे. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये अर्ज केल्यानंतर मुलाखतीसाठी जाताना करावा लागणारा खर्च सामान्य पात्रताधारकास न परवडणारा आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया ही पोर्टलद्वारे केंद्रीय पद्धतीने राबवावी.’

‘मी २०१२ पासून तासिका तत्त्वावर काम करत आहे. राज्य सरकार १०० टक्के प्राध्यापक पदांची पारदर्शक भरती करायला तयार नाही. प्राध्यापक भरती झाल्यास, त्यात निवड होईलच याची शाश्वती नाही. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणारे बदल लक्षात घेता, बेरोजगार होण्याची भीती वाटते. राज्य सरकारने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना किमान तीन हजार रुपये प्रति तास असे वेतन द्यावे.


Assistant Professor Bharti 2024 –  The University Grants Commission (UGC) has given many universities and institutes the opportunity to become professors even without doing NET and PhD. The UGC issued 42 notifications in this regard. To apply, candidates will have to send their CV along with the required documents to the college’s email id.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अनेक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये नेट आणि पीएचडी न करताही प्राध्यापक होण्याची संधी दिली आहे. यूजीसीने यासंदर्भात ४२ अधिसूचना जारी केल्या. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह त्यांचा सीव्ही महाविद्यालयाच्या ईमेल आयडीवर पाठवावा लागेल. 

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पृष्ठभूमीवर यूजीसीने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्यात नेट परीक्षा न दिलेल्या आणि पीएचडी महाविद्यालयांमध्ये शिकवण्याची संधी नसलेल्या पात्र उमेदवारांना दिली जाईल. त्यांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती केली जाईल.

‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ पदासाठी अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, मीडिया, कला, साहित्य, नागरी सेवा, कायदा, समुदाय विकास, पंचायती राज, ग्रामीण विकास, पाणलोट विकास, जलसंचयन, जैविक शेती, लहान हरित ऊर्जा प्रणाली, नगरपालिका योजना, आदिवासींचा सर्वसमावेशक विकास आणि सार्वजनिक प्रशासन यासारख्या क्षेत्रात प्रावीण्य असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराला त्याच्या क्षेत्रातील वरिष्ठ पदावर किमान १५ वर्षांचा अनुभव असावा.

 

कशी होणार निवड ?
‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ ची भरती विद्यापीठाचे कुलगुरू किंवा संचालक तज्ज्ञांचे नॉमिनेशन्स आमंत्रित करतील. तज्ज्ञ स्वतःला किंवा इतर कोणालाही नामनिर्देशित करू शकतात. त्यासाठी तपशीलवार सीव्ही आणि वर्णनही पाठवावे लागेल. निवड समितीमध्ये दोन वरिष्ठ प्राध्यापक आणि एक बाह्य सदस्य यांचा समावेश असेल, जे या नामांकनांची पडताळणी करतील. यानंतर अंतिम निवड होईल. उमेदवारांची निवड विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांसाठी निश्चित केलेल्या पदांपेक्षा वेगळी असेल. ही निवड निश्चित कालावधीसाठी असेल आणि या पदांवर विद्यमान किंवा सेवानिवृत्त शिक्षकांना ठेवण्यात येणार नाही. निवडलेल्या उमेदवारांचे वेतन विद्यापीठ किंवा महाविद्यालय आणि प्राध्यापकांद्वारे ठरवले जाईल. शिक्षण विभाग किंवा यूजीसी पगार देणार नाही.

 


The state government has approved the filling up of 111 assistant professor posts in various departments of Savitribai Phule Pune University (SPPU), and the university administration is yet to publish an advertisement regarding the recruitment of professors even after several months of routine checks. But according to the universities, the draft advertisement regarding the recruitment of professors is ready. The administrative process is underway and the advertisement will be released in the coming days.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांत १११ सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली, तसेच राेस्टर तपासणी हाेऊन अनेक महिने झाले तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली नाही. परंतु विद्यापीठांनुसार प्राध्यापक भरतीसंदर्भात जाहिरातीचा मसुदा तयार आहे. प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे म्हणणे आहे. 

 

प्राध्यापक भरतीला मुहूर्त केव्हा लागणार? प्रशासनाकडून दिरंगाई का हाेत आहे? असा संतप्त सवाल प्राध्यापक संघटनांकडून विचारला जात आहे. राज्यातील १५ अकृषी विद्यापीठांमध्ये ६५९ पदांवर प्राध्यापक भरती करावी, याबाबत दि.७ ऑगस्ट २०१९ राेजी शासन निर्णय निर्गमित केला हाेता. काेराेना प्रादुर्भाव काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा पदभरती सुरू करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. दरम्यान, एक वर्षाच्या कालावधीत केवळ गाेंडवाना विद्यापीठात ३० सहायक प्राध्यापकांच्या जागांवर भरती प्रक्रिया पार पडली आहे, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ७३ आणि राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ ९२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांवर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. प्राध्यापक भरतीसंदर्भात सप्टेंबरअखेर जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याचे पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले हाेते. राज्यातील विद्यापीठांनी रिक्त असलेल्या सहायक प्राध्यापकांच्या जागा भराव्यात; अन्यथा राज्य सरकारविराेधात ‘तुमची दिवाळी, आमचं दिवाळं’ आंदाेलन छेडणार असल्याचे नेट-सेट पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या वतीने वतीने सांगण्यात आले.

 

अकृषी विद्यापीठात १,१६६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ६५९ पदभरतीला परवानगी दिली आहे. राज्यातील विद्यापीठांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब केला, तर आगामी काळात आचारसंहितेमुळे भरतीप्रक्रिया रखडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    राज्यात लवकरच मोठी प्राध्यापक भरती! भरती तातडीने सुरू करण्याचे निर्देश

  2. MahaBharti says

    New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड