प्राध्यापक भरतीवर आचारसंहितेचे सावट! – Pradhyapak Bharti 2024
Professor Recruitment 2024
Pradhyapak Bharti 2024 Update
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पर्दाच्या भरतीसाठी एसईबीसी आरक्षणाचा समावेश करीत नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यास मागील ९ महिन्यांपासून सुरू असलेली प्राध्यापक भरती पुन्हा सुमारे दोन महिने रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदभरतीसाठी ३० डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवातीला १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ केली होती.
सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर एसईबीसी आरक्षण प्राध्यापक भरतीसाठी लागू करण्यास राज्य शासनाकडून मान्यता घेणे यामुळे प्राध्यापक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. विद्यापीठात मोठ्या संख्येने प्राध्यापकांची पदे रिक्त असून मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती झालेली नाही. त्यामुळे अध्यापनासह संशोधनाच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत. जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांच्या यादीतील रैंकिंगवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निवडणूक आयोगाकडे परवानगी मागणार नवीन जाहिरातीनुसार, येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील, त्यानंतर अर्जाची छाननी होऊन मुलाखतीला प्रारंभ होणार आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान विधानसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,
राज्यात प्राध्यापकांची ११ हजार ६७ पदे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंबलबजावणी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी शंभर टक्के प्राध्यापकांची पदे भरा, अशी मागणी नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने केली आहे. पदे न भरल्यास आत्मबलीदान करण्याचा ईशाराही समितीने दिला आहे. राज्यातील प्राध्यापक भरतीबाबतची प्रक्रिया रखडली. नेट-सेट, पीएचडीधारकांकडून शंभर टक्के पदभरतीबाबत अनेकदा आंदोलने झाली. यानंतर आता पात्रताधारक पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. शंभर टक्के प्राध्यापक भरतीचा निर्णय शासनाने २४ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असे नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने घेतला आहे. शासनाने निर्णय न घेतल्यास आत्मबलीदान करण्याचा इशाराही देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिल्याचे समितीने कळविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवेदनात म्हटले आहे, राज्यात कायमस्वरूपी प्राध्यापक भरती होत नसल्यामुळे हजारो सेट, नेट, पीएचडीधारक बेरोजगार युवक गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. आता या तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वित्त विभाग तसेच उच्चस्तरीय अधिकार समिती यांच्या अनागोंदी कारभारामध्ये उच्चशिक्षित बेरोजगारांची पिढी भरडली जात आहे. राज्यामध्ये गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती सुरळीतपणे सुरू नाही. त्यामुळे शंभर टक्के पदभरतीचा निर्णय घ्यावा; अन्यथा २५ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्याचे मूळ गाव असलेल्या मौजे दरे (ता. जावळी, जि. सातारा) येथे सकाळी ११ वाजता सामूहिक आत्मबलीदान करु, समिती सदस्यांनी म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी एसईबीसी आरक्षणाचा समावेश करीत नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार दि. १४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे यापूर्वी अर्ज करू न शकलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी प्राप्त होणार आहे. पुणे विद्यापीठातर्फे १११ प्राध्यापकांची पदभरतीसाठी यापूर्वी दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवातीस दि. १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये दि. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ केली होती. दिलेल्या मुदतीमध्ये तब्बल सहा हजाराहून अधिक उमेदवारांनी विद्यापीठाकडे अर्ज केले होते.
दरम्यान, प्राध्यापक भरतीसाठी एसईबीसी आरक्षण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली.त्यामुळे सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून पद भरती केली जाणार आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सुधारित जाहिरात विद्यापीठाच्या https:// admin.unipune.ac.in/recruitme nt/ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे प्रसिद्ध केलेल्या नवीन जाहिरातीमध्ये खुल्या संवर्गातील आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दहा टक्के एसईबीसी संवर्गातील जागांमध्ये बदल केला आणार आहे. प्राध्यापकांच्या १११ रिक्त पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, आरक्षण तसेच इतर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
राज्यात लवकरच मोठी प्राध्यापक भरती! भरती तातडीने सुरू करण्याचे निर्देश
[…] Pradhyapak Bharti 2023 – राज्यात लवकरच मोठी प्राध्… […]
New Update