नव्या धोरणानुसार अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू!!
Process of Preparing Curriculum
Process of Preparing Curriculum
Process of Preparing Curriculum : Under the National Education Policy, position papers related to about 25 subjects are being developed at the national and state levels for the preparation of the curriculum. A separate process has been initiated at the state level to develop this paper. For this, the State Council for Educational Research and Training (SCERT) has developed an independent portal. Further details are as follows:-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर जवळपास २५ विषयांशी संबंधित पोझिशन पेपर’ विकसित करण्यात येत आहेत. राज्य स्तरावरून हे पेपर विकसित करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. यात शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ, नागरिक यांना आपले अभिप्राय, मते, प्रतिसाद, सूचना नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्यामार्फत राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने कार्यवाही सुरु आहे. हा अभ्यासक्रम आराखडे तयार करण्यासाठी २५ विषयांशी संबंधित पोझिशन पेपर’ विकसित करण्यात येत आहेत.
- देशातील सर्व राज्यांतील या प्रक्रियेमध्ये एक वाक्यता राहावी, यादृष्टीने राष्ट्रीय स्तरावरून २५ विषयांवरील पोझिशन पेपरसाठीचे स्वरूप निश्चित केले आहे.
- निश्चित केलेले पोझिशन पेपर आराखडे राज्यांना उपलब्ध करून दिले आहेत.
- त्यानुसार राज्य स्तरावरून हे पेपर विकसित करण्याची स्वतंत्र प्रक्रिया सुरू केल्याचे एससीईआरटीने जाहीर केले आहे.
यात शिक्षणाचे तत्वज्ञान, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि समग्र प्रगती पुस्तक अशा २५ विषयांवर पोझिशन पेपर आहेत. या पेपरशी संबंधित प्रश्न पोर्टलवर दिले आहेत. या प्रश्नांना अनुसरून इच्छुकांना आपली मते ३० मे पर्यंत नोंदविता येणार आहेत. त्यासाठी ‘https://scertmaha.ac.in/positionpapers/’ या लिंकवर पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन एससीईआरटीने केले आहे.