खासगी शाळांतील शिक्षकभरती निवडणुकीनंतर

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मुलाखतीशिवायची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खासगी शाळांमधील शिक्षक भरती विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्येच होणार आहे. यावर शिक्षण विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

पवित्र पोर्टलमार्फत 12 हजार शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केलेला आहे. यासाठी 87 हजार उमेदवारांनी नोंदणीही केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याबाबत उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 5 हजार 822 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांची नियुुक्ती पत्रे देण्यात आलेली आहेत.

सुमारे 7 हजार उमेदवारांनी निवड यादीत संधी न मिळाल्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केले आहेत. याची तपासणी सुरू असून यातील नियमांत बसणाऱ्या अर्जांचा गांभीर्याने विचार करुन त्या उमेदवारांना नोकरी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
उर्दू माध्यमातील आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने त्या जागा “कन्व्हर्ट’ करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. माजी सैनिकांच्या उमेदवारांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. समांतर आरक्षणात पात्र असलेल्या उमेदवारांचीही तपासणी सुरु आहे. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रत असणाऱ्या उमेदवारांनाही न्याय मिळणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोर्टलवरील भरतीच्या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करुन त्यात आवश्‍यक ते बदलही करण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे मुलाखतीशिवायच्या भरती प्रक्रियेचे सर्व कामकाज झाल्यानंतरच खासगी शाळांमधील शिक्षक भरती करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबत पोर्टलवर सूचनाही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

Maha TET डिसेंबर किंवा जानेवारीत परीक्षा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड