प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक रिक्त पदे!, भरती प्रक्रिया लवकरच अपेक्षित! – Primary Health Center Bharti 2023

Primary Health Center Bharti 2023

Primary Health Center Bharti 2023

Primary Health Center Bharti 2023 – The government has started Primary Health Centers to provide adequate health facilities to patients in rural areas; However, since the posts of various 42 health workers are vacant in these health centers for the past few years, the health facilities of various villages in the local Lakhandur taluka are a picture of collapse. As many as 62 gram panchayat areas of Lakhandur taluka include a total of 89 villages under Primary Health Center Bharti 2023. As many as 4 primary health centers have been started in the taluka to provide adequate health facilities to the citizens of these villages. These primary health centers include Kudegaon, Sarandi Bu, Barwa and Dighori/Mothi etc under Primary Health Center Bharti 2023.

 

ग्रामीण भागातील रुग्णांना पर्याप्त आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहेत; मात्र या आरोग्य केंद्रांमध्ये मागील काही वर्षांपासून विविध ४२ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने स्थानिक लाखांदूर तालुक्यातील विविध गावांची आरोग्य सुविधा कोलमडल्याचे चित्र आहे. लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६२ ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण ८९ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांना पर्याप्त आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी तालुक्यात तब्बल ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुडेगाव, सरांडी बु, बारव्हा व दिघोरी/मोठी आदींचा समावेश आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या उपकेंद्रांमध्ये तावशी, दहेगाव, पिंपळगाव को, बोथली, लाखांदूर, कुडेगाव, खैरी/पट, किरमटी, मडेघाट, सोनी, बेलाटी, मांढळ, भागडी, पाहूनगाव व विरली बु आदी उपकेंद्रांचा समावेश आहे. ७ उपकेंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये साखरा, मानेगाव, जैतपूर, पिंपळगाव को, बोथली, लाखांदूर व किरमटी उपकेंद्रांचा समावेश आहे. तालुक्यातील तब्बल २६ उपकेंद्रांपैकी १२ आरोग्य उपकेंद्रांमध्ये तब्बल १२ आरोग्यसेवकांची पदे रिक्त असल्याची माहिती आहे. यामध्ये साखरा, दिघोरी मोठी, दहेगाव, जैतपूर, पिंपळगाव को, बोथली, कुडेगाव, मोहरणा, सरांडी बु., बेलाटी व विरली बु. आदी उपकेंद्रांचा समावेश आहे. २० उपकेंद्रांपैकी ५ उपकेंद्रांमध्ये तब्बल ५ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. मागील काही वर्षांपासून विविध आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना पर्याप्त आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे.

तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी केवळ बारव्हा केंद्रामध्ये १ बाह्यरुग्ण आरोग्य सेविका पद भरले आहे तर उर्वरित ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ३ बाह्यरुग्ण आरोग्य सेविका पद रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाखांदूर तालुक्यात तब्बल ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २६ आरोग्य उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांमध्ये नियमित आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, समुदाय आरोग्य अधिकारी आदी आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत; ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १५ उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांचे पद रिक्त आहेत.

 


Primary Health Center Bharti : There are three vacancies in the primary health center, including two posts for attendants and one post for a cleaner. Three posts in the primary health center have been vacant for several months. Patients and villagers are asking when the posts will be filled. Further details are as follows:-

प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन पदे परिचर, एक पद सफाई कामगार अशी तीन पदे रिक्त आहेत. आगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. ती पदे केव्हा भरणार, अस प्रश्न रुग्ण व ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना दर्जेदार सेवा डेट असल्याने परिसरातील रुंग तपासणीसाठी येतात व औषधोपचार घेऊन बरे होतात. रुग्णालयातील स्वच्छता लक्षत घेऊन प्रसूती साठी महिलांची यथे पस्ती असल्याने येथे पृर्णपणे आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे आहे.

Primary Health Center Bharti

प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन पदे परिचर, एक पद सफाई कामगार अशी तीन पदे रिक्त असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांना लेखी माहिती देण्यात आली आहे. तात्पुरता सफाई कामगार आहे. लवकरच रिक्त असलेल्या पदांवर नवीन नियुक्ती करण्यात येईल.

-डॉ. अजय नाथक

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आगर

अनेक दिवसांपासून दोन परिचर, शिपाई पद रिक्त आहे. सफाई कामगार प्रभारी असल्याने आठवड्यातून तीन दिवस कमावर येऊन स्वच्छता ठेवण्यात येते. इतर दिवशी सर्वत्र कचरा असतो. तरी अशावेळी कायम स्वरूपी तिन्ही पदे भरण्याट यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.


Prathmik Arogya Kendra Bharti 2022

Primary Health Center Bharti: The primary health center currently has some vacancies for health workers, including soldiers. As a result, there is disruption in the work. Savargaon Health Center covers 21 villages. In addition, six substations are operated. Further details are as follows:-

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या शिपायासह आरोग्य सेविकांच्या देखील काही जागा रिक्त आहेत. यामुळे कामकाजात विस्कळीतपणा येथे आहे. सावरगाव आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावे येतात. शिवाय, सहा उपकेंद्रे चालविली जातात.

  • आरोग्य केंद्रात शिपायाच्या ६ जागा असून, सध्या दोन शिपायांवर साफसफाईसह अन्य कामांचा भार आहे.
  • शिवाय, आरोग्य सेविकांच्या तीन जागा मागील वर्षाभरापासून रिक्त आहेत.
  • सध्या कार्यरत असलेल्या दोन शिपायापैकी एकजणाची मे महिन्यात सेवानिवृत्ती आहे.
  • त्यामुळे यानंतर एकाच शिपायावर कामाचा ताण पडणार आहे.

 


घोट व रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त

Primary Health Center Bharti : Many posts are vacant in Ghot and Regadi Primary Health Centers.  Further details are given below.

घोट व रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ब १, आरोग्य सहायक महिला १, आरोग्य सेविका राज्य १ तसेच उपकेंद्रांतर्गत पेटतळा, भाडभिडी, विष्णूपूर, नेताजीनगर या उपकेंद्रातील आरोग्य सेविकाची ६ पदे, आरोग्य सेवक ४ पद, वाहनचालक १ ,परिचर १ पद रिक्त आहेत??

 

तर रेगडी आरोग्य केंद्रामध्ये एकूण ११ हजार ६६३ जनसंख्या असून केंद्रांतर्गत येत असलेल्या माडेआमगाव उपकेंद्रात १ महिला आरोग्य सेवक व’ १ पुरुष आरोग्य सेवक तर चापलवाडा उपकेंद्रात १ आरोग्य सेविकाचे पद रिक्त आहेत. रेगडी आरोग्य केंद्रांतर्गत आणखी नवीन तीन उपकेंद्राची मागणी करण्यात आली असून त्यात रेगडी, विकासपल्ली आणि वेंगनूर ही गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव गेल्या एक वर्षापूर्वी शासनाकडे पाठविला आहे.


जिल्ह्यात आरोग्य केंद्रांतील 50 टक्के जागा रिक्त

Primary Health Center Bharti : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११० प्राथमिक आरोग्य केंद्रे व १,०९२ आरोग्य केंद्रे कार्यरत असून, ग्रामीण व अति दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरविण्यात ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत आहे. पंधरापैकी आठ तालुके आदिवासी असल्यामुळे या भागात आरोग्यसेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कायमच नाखूश असतात. त्यातूनच ही पदे रिक्त राहात असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, असे असले, तरी ज्या आरोग्य केंद्रांवर कमतरता असेल, अशा केंद्राच्या लगतच्या केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्पुरती नियुक्ती देऊन रुग्णसेवा अविरत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.



  • ११० प्राथमिक आरोग्य केंद्रे
  • १०,९२ आरोग्य उपकेंद्रे

प्राथमिक आरोग्य केंद्र

११०- ११६९

उपकेंद्र

१०९२- ५३२

ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर अनुत्सुक

लाखो रुपये वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च केलेल्या डॉक्टरांचा पदवी मिळाल्यानंतर अधिकाधिक पैसे कसे मिळतील, याकडे कल असतो. शासनाने नवीन डॉक्टरांना काही काळासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा सक्तीची केली असली, तरी अवघ्या महिना, दोन महिन्यांतच नवीन डॉक्टर न सांगता आपली सेवा समाप्त करून गायब होत असल्यामुळेच पदे रिक्त राहतात.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. डॉक्टर वा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होतो, अशी तक्रार मात्र नाही. शासनाने काही प्रमाणात रिक्त पदे भरण्याची अनुमती दिली आहे. कंत्राटी पद्धतीने ती भरली जातील.

– डॉ.कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

सोर्स : लोकमत


जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त

Primary Health Center Bharti : कोरोनामध्ये ग्रामीण जनतेला सर्वाधिक उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच दिली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी मोठ्या रुग्णालयांनी आरोग्य सेवा थांबविली होती. अनेक रुग्णांना वेळेत उपचार झाले नसल्यामुळे त्यांचा बळी गेला आहे. कोरोनामध्ये शासकीय आरोग्य यंत्रणा कशी सक्षम असली पाहिजे, हे सिद्ध झाले आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकार शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरत नाही. मूलभूत सुविधांचा तेथे अभाव असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देऊ शकत नाहीत. आटपाडी, जत तालुक्यात आरोग्य केंद्रामध्ये शिपायांचीही पदे रिक्त आहेत. यामुळे तेथील स्वच्छतेसह रुग्णांना सेवा देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे ज%Bवे लागत आB9े. कंत्राटीपदावर आरोग्य सेवा सक्षम होणे खूप कठीण आहे, असे आरोग्य कर्मचारी संघटना आणि डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करायची असेल तर रिक्त पदे शंभर टक्के भरण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाकडील रिक्त पदे         विभाग मंजूर रिक्त पदे

औषधनिर्माता ६४                                      १६

प्रयोगशाळा तंत्रज्ञ २                                    १

कृष्ठरोग तंत्रज्ञ ४                                         ४

कृष्ठरोग तंत्रज्ञ ४                                         ४

आरोग्य पर्यवेक्षक ८                                    ३

औषध फवारणीस १९०                               १६२

आरोग्य सेविका ५७९                                  २९३

एकूण ११२७ ५०२

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे : ६२

उपकेंद्रे : ३२०

प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. शासन ती पदे भरणार आहे, पण तोपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक व सेविकांची पदे भरली आहेत. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चांगली आरोग्य सेवा सुरू आहे.


Primary Health Center Bharti : कोरोना काळातही अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेतच आरोग्य यंत्रणा काम करत होती. आरोग्य केंद्र, उपकेंद्रासोबतच ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे तसेच सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. रिक्त जागांमुळे सर्वेक्षण मोहीम व कोरोनासंबंधी इतर कामे करताना अतिरिक्त ताण सोसावा लागला होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट क चे एकूण ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० पदे भरली गेली आहेत. तर २९९ पदे अद्याप रिक्त आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाने सूचना केली होती. रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली बिंदुनामावली मात्र अजूनही प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

डॉक्टरच नाहीत –%3/p>

जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची पदेही रिक्त आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांची ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. शासनाच्या विविध मोहीम, सर्वेक्षण नेहमी सुरू असतात. रिक्त पदे भरले तर आरोग्य क्षेत्रातील विविध मोहिमा प्रभावीपणे पार पडतील.

बिंदुनामावलीनंतर होईल भरती –

ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील क गटातील २९९ पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवा व पदोन्नतीच्या पदांचा समावेश आहे. बिंदुनामावलीची यादी अद्याप शासनाकडून प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची यादी प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. येत्या आठवड्यात बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

– डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी

आकडेवारी अशी –

  • प्राथमिक आरोग्य केंद्र – ४१
  • आरोग्य उपकेंद्र – २३२
  • एकूण कर्मचारी –
  • आरोग्य केंद्रे – ३००
  • आरोग्य उपकेंद्रे – ४८९
  • रिक्त कर्मचारी –
  • आरोग्य केंद्रे – १८६
  • उपकेंद्र – ११३

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

25 Comments
  1. Laxman thombare says

    Im job is needs

  2. Laxman thombare says

    12 vi pas var aahet ka konte pad

  3. Karishma says

    Punayat aahet Ka jaga sheelk

  4. Mahesh Nisarad says

    Link patva from ksa bhraycha te pn sanga Aani kevha nignar Aahe bharti ti Date sanga

  5. Ajay Khandekar says

    Kadi pasun chlu honar form

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड