‘अशी’ करा स्टेट बँकेत अधिकारी पदाची तयारी – जाणून घ्या
Preparation FOR The Post of Officer in SBI
Preparation FOR The Post of Officer in SBI : बँकेतील नोकरीच्या शोधात अनेक मंडळी असतात सध्या स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी जागा रिक्त आहेत त्या पदासाठी परीक्षा घेतल्या जातात…
Preparation FOR The Post of Officer in SBI : ‘स्पर्धा तेथे प्रगती’ असं म्हटलं जातं. स्पर्धेशिवाय जग नाही. प्रगतीशील जीवन हेच खरं जीवन. हे सत्य आहे, म्हणूनच चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य आहे. आता हेच पाहा ना, या लॉकडाउनमध्ये सरकारी नोकरीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. तसंच नोकरीची संधी देखील चालून आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी तब्बल दोन हजार जागा रिक्त असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाइन अर्ज १४ नोव्हेंबर रोजी सुरू झाले असून ४ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
निवडप्रक्रिया आणि अभ्यासक्रम
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या भरतीचे मुख्य तीन टप्पे आहेत. ऑनलाइन परीक्षा ही दोन स्तरावर होणार असून पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसता येतं. पूर्व परीक्षेत १०० प्रश्न असून १०० गुणांसाठी एकूण एक तासाचा कालावधी देण्यात येतो. यात रिझनिंग आणि कम्प्युटर अॅप्टीट्यूड, डाटा अॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन, इंग्रजी आणि बँकिंग अवेअरनेस असे चार विषय आहेत. यात निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबली जाते. चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण कमी केले जातात. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. परीक्षा ३१ डिसेंबर आणि २, ४, ५ जानेवारीला होणार आहे. म्हणजेच खूपच कमी कालावधीत उमेदवारांना परीक्षेची तयारी करायची आहे. यासाठी पूर्वीपासूनच या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा नक्कीच इतरांपेक्षा सोपी जाईल. म्हणूनच अर्ज निघण्याची वाट न पाहता परीक्षेची तयारी करायला हवी. यासाठी गणितातील संबोध पक्के असायला हवेत. इंग्रजी व्याकरणाचा रोजचा सराव करायला पाहिजे. रिझनिंगचे दररोज किमान ५० प्रश्न सोडवायला पाहिजेत. चालू घडामोडी आणि बँकिंग अवेअरनेस या घटकासाठी रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचून त्यातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करायला हवी. निमितपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना यश नक्की मिळवता येईल. चला तर मग स्टेट बँकेत अधिकारी होण्यासाठी लागा अभ्यासाला!
- बंपर भरती – SBI मध्ये 8500 जागांची भरती सुरु!!
- पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी – भारतीय स्टेट बँकेत 2000 पदांची भरती
कॅनरा बँकेत विविध पदांवर भरती
- बँकेचं नाव- स्टेट बँक ऑफ इंडिया
- पदाचं नाव- प्रोबेशनरी ऑफिसर
- एकूण पदं- दोन हजार
- वयोमर्यादा- २१ ते ३० वर्षं
- अर्ज करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर
- पूर्व परीक्षा- ३१ डिसेंबर आणि २, ४, ५ जानेवारी, २०२१
- मुख्य परीक्षा- फेब्रुवारी/ मार्च २०२१
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.. – कॅनरा बँक अंतर्गत 220 रिक्त पदांची भरती
आम्हाला कळवा,
सदराच्या माध्यमातून नोकरीच्या संधींविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला नोकरीविषयी काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा. त्यातील निवडक प्रश्नांची उत्तरं या सदराच्या माध्यमातून दिली जातील.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Sbi po exam sarav papers
शैक्षणिक पात्रता किती पाहिजे