महत्वाचे-पॉलिटेक्निक प्रवेशासाठी पुन्हा एकदा मिळाली मुदतवाढ! -Polytechnic Admissions 2025 Updates

Polytechnic Admissions 2025 Updates

राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) प्रवेशप्रक्रियेचे तंत्रशिक्षण संचालनालयाने गुरुवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांना आता ३० जूनपर्यंत करता येणार आहे. गुरुवार रात्रीपर्यंत एक लाख ५० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने २० मेपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू केली. संचालनालयातर्फे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासह कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चितीसाठी आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रारंभी १६ जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावयाची होती. यानंतर २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता गुरुवारी रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/वास्तुकला या पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. अर्ज नोंदणीसह कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्याची प्रक्रियाही याच दरम्यान करता येणार आहे.

Big Shift in Polytechnic Admissions!

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला. २० मेपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. यात दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. २६ जूनपर्यंत राज्यभरात एक लाख ५० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी अर्जासह शुल्क भरलेल्या अर्जाची संख्या एक लाख ३० हजार ८८५ आहे. राज्यात अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठीच्या संस्थांची संख्या ४१० आहे. यामध्ये सुमारे एक लाख १० हजार प्रवेश क्षमता आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Poly Admission Revised Schdule 2025

कोणाला आधिक प्राधान्य मिळणार?
कॅप नंतर रिकाम्या राहिलेल्या जागा आधी त्या त्या प्रवर्गासाठी राखीव राहतील. तिथंही जर भरल्या गेल्या नाहीत, तर गुणवत्ता आधारे त्या भरल्या जातील. त्यात राज्यातील उमेदवारांना आधिक प्राधान्य दिलं जाणार.

फी परतावा नियम:
प्रवेश रद्द करायचाय तर ऑनलाईन अर्ज लागतो. शेवटच्या तारखेच्या आत केलं, तर हजार रुपये वजा करून बाकीचे पैसे परत मिळतील. पण जर अंतिम मुदतीनंतर रद्द केलं, तर काहीच परत मिळणार नाही.

पॉलिटेक्निक प्रवे जागा रद्द समजली जाईल आणि उमेदवार पुढच्या फेरीसाठी अपात्र ठरेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड