पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत “उपअभियंता” पदांची भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा !! | PMRDA Bharti 2024
PMRDA Recruitment 2024
PMRDA Bharti 2025
PMRDA Bharti 2025– Pune Metropolitan Region Development Authority is published a recruitment notification for the various vacant Posts of “Sub-Engineer”. There is a 07 vacant post available. The job location for this recruitment is Ratnagiri. Interested applicants can apply before the last date. The last date for submission of application is 6th January 2025. The official website of PMRDA is ratnagiri.gov.in. For more details about PMRDA Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत “उपअभियंता” पदांची 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) ऑफलाईन.पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – उपअभियंता
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाईन.
- ईमेल पत्ता- [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विभाग क्र. १ नवीन प्रशासकीय इमारत, आकुडी रेल्वे स्टेशनजवळ, आकुर्डी, पुणे- ४११०४४.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – http://www.pmrda.gov.in/
PMRDA Vacancy 2024-25
पदाचे नाव | पद संख्या |
उपअभियंता | 07 |
Educational Qualification For PMRDA Recruitment 2024
पदाचे नावशैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता |
उपअभियंता | Diploma/ BE |
How To Apply For PMRDA Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2025 आहे.
- वरील दिनांकानंतर आलेला अर्जचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pmrda.gov.in Job 2024-25
|
|
📑 PDF जाहिरात |
https://tinyurl.com/fvy6br3u |
✅ अधिकृत वेबसाईट | http://www.pmrda.gov.in/ |
‘PMRDA’च्या अंतर्गत २४४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. नव्याने मागविलेल्या निविदेत बीव्हीजीला हे काम प्राप्त झाले आहे. त्यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरपासून बीव्हीजीला हे काम मिळाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पीएमआरडीएमधील भरती प्रक्रिया निविदांमध्ये अडकून पडली होती. मध्यंतरी या जुन्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा दर्जा नसल्याने सध्या असलेला कंत्राटी कर्मचारी कंपनीचा ठेका काढून घेतला होता. त्यानुसार नव्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिकदृष्ट्या खुल्या केल्या होत्या.
‘पीएमआरडी’कडून प्रशासनाकडून नमूद केलेल्या अटींची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी, तीनपैकी दोन कंपन्यांच्या निविदा रद्द झाल्या असून, पुन्हा नव्याने प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार बीव्हीजीने प्रस्ताव दाखल केला होता. अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतर १५ ऑक्टोबरपासून कंपनीला काम प्राप्त झाले असून, एक वर्षांसाठी त्यांना मुदत असणार आहे.
आवश्यकतेनुसार होणार भरती
वर्ग तीन आणि चारच्या पदांबाबतची माहिती पीएमआरडीए प्रशासन खासगी कंपनीला कळविणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार ही कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड करणार आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ‘पीएमआरडीए’कडून केली जाणार आहे. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली. ‘पीएमआरडीए’कडून २४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बीव्हीजी पात्र ठरली आहे. १५ ऑक्टोबरपासून त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.
स्थापनेपासूनच पीएमआरडीएच्या वरिष्ठ पदावर विविध विभागांतील अधिकारी यांची प्रतिनियुक्तीने तात्पुरती नियुक्ती केली जात होती, तर कारकून शिपाई आदी पदे कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत होती. त्यामुळे पीएमआरडीएच्या कारभाराला अपेक्षित अशी गती मिळत नव्हती. आकृतिबंध तयार करणे त्यानंतर सेवा नियमावली तयार करणे आदीं बाबींसाठी प्रशासनाला वेळ लागला. मागील वर्षी शासनाने आकृतिबंधास मान्यता दिली. त्यानंतर राज्य शासनाने आज सेवा विनियम 2023 ला मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी जारी केला आहे. प्रशासकीय विभाग, लेखा विभाग, तांत्रिक विभाग, नगररचना व मूल्य निर्धारण विभाग, गृह विभाग, अग्निशमन विभाग आदी विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा नियमावली तयार करून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्राधिकरणाचा स्वतंत्र आकृतीबंध मान्य केला असून, जवळपास ४०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम संपुष्टात येईल. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. शिपाई व इतर साहाय्यक या ‘ड’ वर्गाचे मनुष्यबळ कंत्राटीने भरावे लागणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.pmrda.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | Avilable Soon |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.pmrda.gov.in/ |
Table of Contents