10 वी व 12 वी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण परीक्षेकरिता मार्गदर्शक सूचना जाहीर
Physical Education Exam 2021
Physical Education Exam 2021 : The State Board has issued guidelines for the examination of students of class X-XII in the subject of health and physical education. Further details are as follows:-
10 वी व 12 वी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण परीक्षेकरिता मार्गदर्शक सूचना जाहीर. इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा घेण्याबाबत राज्य मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रात परीक्षा न घेता एकाच सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या नवीन मूल्यमापन आराखड्यानुसार मूल्याकंन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य व शारिरीक विषयाच्या परीक्षेबाबतही विद्यार्थी-पालक, त्याचबरोबरच शिक्षकांमध्ये संभ्रम होता. या परीक्षा कधी आणि कशाप्रकारे घ्यायच्या, त्यांचे मूल्यांकन कसे करायचे, अशी पेचात शिक्षक होते.
दहावीसाठी दोन्ही सत्रांत परीक्षा न घेता एकाच म्हणजे द्वितीय सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखन कार्य पूर्व करून घ्यावे लागणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी २५ आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २५ अशा ५० गुणांची परीक्षा होणार आहे. आरोग्याधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शारीरिक क्षमतेवर आधारित कोणतीही एक क्षमता, कोणताही एका सांघिक खेळाची निवड करून क्रीडा कौशल्य सादरीकरण करणे, योग व प्राणायाम, दोन आसने विविध क्रीडा स्पर्धातील सहभाग व तासिका उपस्ि ति, पुस्तक लेखन कार्य यावर परीक्षा घ्यावी लागणार आहे.
आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होणार
Physical Education Exam 2021 : There will be written and practical examinations in Health and Physical Education. The State Board of Secondary and Higher Secondary Education has directed to conduct written and practical examinations in Health and Physical Education.
आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होणार. शारीरिक शिक्षणाच्या परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम होता. याबाबत मंडळाने प्रशिक्षण आयोजित केले. मात्र त्यामध्येही शिक्षकांना बोलण्याची संधी न दिल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले होते. यानंतर आता मंडळातर्फे या परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपात घेण्यात याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
लेखी परीक्षा २५ गुणांची आणि प्रात्यक्षिक परीक्षा २५ गुणांची घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे आयोजन शाळांनी त्यांच्या स्तरावर करून १० जूनपर्यंत मंडळाला श्रेणी सादर कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. तसेच या परीक्षा घेताना कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करून शारीरिक अंतर ठेवून गटागटाने घेण्यात याव्यात. २३ मेपर्यंत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू राहणार आहेत. यामुळे आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी या परीक्षा घेणे शक्य नाही.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…