UPI द्वारे PF काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार! – PF Withdrawal via UPI to Be Available Soon
PF Withdrawal via UPI to Be Available Soon!
सरकार अशा प्रकारे कार्यरत आहे की, UPI प्रणालीद्वारे EPF खातेधारकांना त्यांचे पैसे काढताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट आहे – पीएफ खात्यातील रक्कम जलद आणि सुलभ पद्धतीने काढण्याची प्रक्रिया सुनिश्चित करणे.
EPFO महत्त्वाची सूचना
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
EPFO म्हणजे ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’, जी खाजगी कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवते आणि त्यांच्या पेमेंट प्रक्रियेस सुलभ बनवण्याची जबाबदारी घेत असते. सध्या, पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे – लवकरच खातेधारकांना UPI (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) च्या मदतीने त्यांचे पैसे काढता येणार आहेत.
डिजिटल व्यवहारांना चालना मिळणार
-
EPFO पुढील काही महिन्यांत UPI व्यवहार सुरू करणार – EPFO डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी लवकरच UPI प्लॅटफॉर्मवरून पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. यासंदर्भात NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) सोबत चर्चा सुरू आहे.
-
EPFO खाते UPI शी जोडल्यास थेट व्यवहार शक्य – खातेधारक त्यांचे EPF खाते UPI शी लिंक केल्यास, त्यांना थेट UPI वॉलेटच्या मदतीने पीएफमधील पैसे काढता येतील. ही सुधारणा करण्यासाठी कामगार मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतर प्रमुख बँका प्रयत्नशील आहेत.
-
दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदा – जे कर्मचारी ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहतात, त्यांच्यासाठी ही नवीन प्रणाली अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आता गरजेच्या वेळी पैसे मिळवण्यासाठी त्यांना थांबावे लागणार नाही, तर काही क्षणांतच पैसे त्यांच्या खात्यात येतील.
गुंतवणुकीच्या धोरणात बदल
माध्यमांच्या माहितीनुसार, EPFO आपल्या गुंतवणुकीच्या धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कर्ज क्षेत्रातील गुंतवणूक 20% वरून थेट 10% करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यासंदर्भात कामगार मंत्रालय लवकरच अर्थ मंत्रालयाची मंजुरी घेणार आहे.
Table of Contents