पेटच्या विद्यार्थ्यांना एकदा संशोधन केंद्र निवडल्यास परीक्षा केंद्र बदलता येणार नाही | PET Exam 2024

PET Exam 2024

Pune University PET Exam 2024 Update

PET Exam 2024:  पीएच.डी. प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘पेट’ (Pune PhD Entrance Exam) परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी एकदा संशोधन केंद्र निवडल्यास त्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी रिक्त जागांचा तपशील पाहूनच संशोधन केंद्र निवडावे, असे आवाहन पुणे विद्यापीठाचे उपलकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी केले आहे. PET Exam संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्या शाखानिहाय, विषयनिहाय आणि प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध केला आहे. ही सर्व प्रक्रिया येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यार्थ्यांनी हा तपशील समजून त्यांच्या लॉगिनमधून संशोधन केंद्र निवडायचे आहे व त्यांच्या प्रस्तावित संशोधन कार्यासंदर्भातील स्पेशलायझेशनही नमूद करायचे आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्र निवडल्यास ते बदलता येणार नाही, असेही डॉ. रासवे यांनी परिपत्रकाद्वारे कळवले.


Pune University PET Exam 2024

PET Exam 2024: संशोधन मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करण्याबाबत सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जारी केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत दिली आहे. ही माहिती अद्ययावत केल्‍यानंतर ‘पेट’ परीक्षा आयोजनाचा मार्ग मोकळा होणार आहे. पुणे विद्यापीठातर्फे प्रांगणातील सर्व विभाग प्रमुखांना तसेच संलग्‍न महाविद्यालयाच्‍या प्राचार्य, संचालकांसाठी ही सूचना जारी केली आहे. PET Exam संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या परिपत्रकात म्‍हटले आहे, की आगामी पीएच्.डी. प्रवेश परीक्षा (पेट) आयोजित करण्याच्या अनुषंगाने पीएच. डी. मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. जागा अद्ययावत करताना संशोधन केंद्र व संशोधन मार्गदर्शकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी.

यापूर्वी रिक्त जागा अद्ययावत केल्या आहेत किंवा संशोधन मार्गदर्शकांकडे सद्यःस्थितीत जागा रिक्त झाल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांना नव्याने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे, अशा मार्गदर्शकांना पुन्‍हा किंवा नव्याने जागा अद्ययावत करायच्या आहेत.

त्या संशोधन मार्गदर्शकांनी त्यांच्या लॉगीनमधून त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत कराव्‍या लागतील. त्‍यानंतर संबंधित संशोधन केंद्रांनी त्यांचे मार्गदर्शकाकडील पुन्‍हा किंवा नव्याने अद्ययावत केलेल्या रिक्त जागांना प्रवर्गनिहाय ऑनलाइन पद्धतीने मान्यता देण्याबाबत सूचना केल्‍या आहेत.

यापूर्वी रिक्त जागा अद्ययावत केलेल्या आहेत, परंतु त्यांना जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता वाटत नाही, अशा संशोधन मार्गदर्शकांनी रिक्त जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया पूर्ण करताना काही तांत्रिक अडचण आल्यास, प्रशासकीय भवन, पहिला मजला येथील आय. टी. सपोर्ट संपर्क येथे संपर्क साधण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.


PET Exam 2022

PET Exam 2022: The latest update for University PET Examination. As per the latest news, PhD Admission Exam (PET) exam dates announced. The exam will be held on 6th of November 2022. Candidates can apply online before the 30th of September 2022. Further details are as follows:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) 6 नोव्हेंबरला परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या परीक्षेद्वारे विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न संशोधन केंद्रातील पीएचडी अभ्यासक्रमाच्या एकूण 3 हजार 187 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाने ‘पेट’साठी परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परिपत्रकानुसार 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे. दोन तासांच्या परीक्षेत रिसर्च मेथडॉलॉजी आणि संबंधित विषय असे दोन पेपर होणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1000 रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 800 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

एमफिल, नेट, पेट 2021 अशा परीक्षा उत्तीर्ण असणार्‍या विद्यार्थ्यांना, ही परीक्षा देण्यापासून सवलत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जासोबतच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरून, सहभागी व्हावे लागणार आहे. या परीक्षेबाबत अधिक माहिती विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.

काही अभ्यासक्रमांसाठी नाममात्र जागा…

  • 3 हजार 187 हजार जागांसाठी पेट होणार असली, तरी काही विषयांसाठी फारच कमी जागा उपलब्ध आहेत.
  • त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण झाला, तरी त्याला प्रवेश मिळणे अवघड ठरणार आहे.
  • केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजी, लायब-री अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस अशा काही विषयांमध्ये प्रत्येकी एकच जागा आहे, तर कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, म्युझिक, जिऑलॉजी अशा विषयांमध्ये प्रत्येकी चार जागा आहेत.
  • त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

PET Exam 2022

PET Exam 2022: Pre-PhD Entrance Examination scheduled has been declared of Mumbai University. The exam will be held on 26th of August & 27th of August 2022. Further details are as follows:-

Pre-PhD Entrance Examination 

पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Online Exam) घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • मुंबई विद्यापीठाच्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) (Pre-PhD Entrance Examination) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • यानुसार मानव्यविद्याशाखेच्या परीक्षा २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा २६ ऑगस्ट २०२२ रोजी २ ते ४ या वेळेत घेतल्या जाणार आहेत.
  • वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या परीक्षा २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा सुद्धा २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान होणार असून या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Online Exam) घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
  • तसेच २० ते २३ ऑगस्ट २०२२ दरम्यान ऑनलाईन सराव परीक्षांचेही आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४७८१ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक २१०० एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १२३३, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७८४ आणि आंतरविद्याशाखेसाठी ६६४ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ५८४ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ व्यवस्थापन या विषयासाठी २४८ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड