पिंपरी-चिंचवड महापालिकेत ४,७१९ पदे रिक्त; मेगाभरती कधी होणार जाणून घ्या !! | PCMC Recruitment 2026

PCMC Bharti 2026

PCMC Recruitment 2026: अंत्यंत महत्वाची बातमी !! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर मनुष्यबळाची कमतरता हे गंभीर आव्हान बनले आहे. महापालिकेतील तब्बल ४ हजार ७१९ पदे रिक्त असल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत असून, उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले, मात्र त्यांच्या जागी आवश्यक त्या प्रमाणात भरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या सातत्याने वाढत आहे. या भरती बद्दल अधिक माहिती खाली वाचा आणि MahaBharti.in ला फ़ॉलो करा 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याने नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, कर संकलन, नगररचना आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. परिणामी, प्रशासकीय निर्णय आणि फाईल्सचा निपटारा अपेक्षित वेगाने होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागरिकांना फेऱ्या मारण्याची वेळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विविध शासकीय कामांच्या प्रक्रियेत विलंब होत आहे. नागरिकांच्या अर्ज, तक्रारी आणि प्रस्ताव निकाली काढण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने अनेकांना वारंवार महापालिकेच्या कार्यालयात जावे लागत आहे. दुसरीकडे, कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मानसिक तसेच शारीरिक ताण वाढत असून त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अनुभवी अधिकाऱ्यांची कमतरता

महापालिकेच्या स्थापनेपासून सेवा बजावणारे अनेक अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे शहराची सखोल माहिती आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. भविष्यात विकासकामांच्या नियोजन आणि अंमलबजावणीवर याचा परिणाम होण्याची शक्यता प्रशासनातील जाणकार व्यक्त करत आहेत.

नवीन आकृतिबंध अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत

महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाल्यानंतर वाढत्या लोकसंख्येचा आणि प्रशासकीय गरजांचा विचार करून नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असला, तरी गेल्या अडीच वर्षांपासून तो प्रलंबित आहे.

नवीन आकृतिबंधानुसार महापालिकेत ११ हजार ५६१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ६ हजार ८४२ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून उर्वरित ४ हजार ७१९ पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे वाढत्या नागरी सेवांचा भार विद्यमान कर्मचाऱ्यांवरच पडत आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वाढते अवलंबित्व

स्थायी पदांवरील भरती रखडल्याने महापालिकेला विविध विभागांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे. सफाई कर्मचारी, डॉक्टर, परिचारक, वैद्यकीय कर्मचारी, व्हॉल्वमन, सुरक्षारक्षक, मदतनीस आणि वॉर्डन यांसारख्या अनेक पदांसाठी ठेकेदारी पद्धतीचा वापर केला जात आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात कामकाज सुरू असले, तरी हा पर्याय दीर्घकालीन उपाय ठरत नाही. तज्ज्ञांच्या मते, महापालिकेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नागरिकांना वेळेवर दर्जेदार सेवा देण्यासाठी रिक्त पदांची नियमित आणि कायमस्वरूपी भरती करणे अत्यावश्यक आहे.

मेगाभरतीची वाढती मागणी

महापालिकेतील वाढत्या रिक्त पदांमुळे प्रशासनावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी लवकरात लवकर ४,७१९ रिक्त पदांची मेगाभरती करण्याची मागणी जोर धरत आहे. राज्य शासनाकडून नवीन आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया वेगाने राबविण्यात यावी, अशी अपेक्षा कर्मचारी संघटना तसेच नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


PCMC Volunteer Bharti 2026

PCMC Bharti 2026: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of Volunteer (PCDRF). There are a total of 50 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply offline through given mentioned address before the last date. The Last date to submit offline application is 16th July 2026. For more detail about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “तुमचा मित्र स्वयंसेवक (PCDRF)” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२६

  • पदाचे नावतुमचा मित्र स्वयंसेवक (PCDRF)
  • पदसंख्या50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 18 – 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, मुंबई पुणे महामार्ग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पिंपरी ४११ ०१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2026
  • अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2026 

पदाचे नाव पद संख्या 
तुमचा मित्र स्वयंसेवक (PCDRF)50

Educational Qualification For PCMC Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तुमचा मित्र स्वयंसेवक (PCDRF)
  • १० वी उत्तीर्ण आवश्यक
  • राज्य अग्निशमन दल, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल प्रशिक्षण आवश्यक
  • आपत्ती व्यवस्थापन कामाचा अनुभव असणे आवश्यक

 Salary For PCMC Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
तुमचा मित्र स्वयंसेवक (PCDRF)22,485/- per month

How to Apply For PCMC Application 2026 

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • वरील पदांकरीता अधिक माहिती  pcmcindia.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pcmcindia.gov.in Arj 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/9DjfIqoq9
✅ अधिकृत वेबसाईट
pcmcindia.gov.in

Table of Contents

Comments are closed.



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड