पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ
5,822 पदांची यादी पोर्टलवर,१३ ते २१ ऑगस्ट या काळात कागद पडताळणी.
अनेक वर्षांपासून भरती करण्यासाठी शिक्षकांकडून होत असलेल्या मागणीला अखेर शुक्रवारी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मुहूर्त मिळाला. 12 हजार 140 जागांसाठी मुलाखतीशिवाय उपलब्ध ५ हजार ८२२ शिक्षकांची पदांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली. १३ ते २१ ऑगस्टदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यात शिक्षकांच्या भरल्या जाणार्या १२ हजार १४० पदांपैकी मुलाखतीशिवाय ९ हजार १२८ पदे भरली जाणार आहेत. शुक्रवारी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर मुलाखतीशिवायचा प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या प्राधान्य क्रमानुसार संस्थांसाठीच्या उमेदवारांची अंतिम ९ हजार १२८ पदांपैकी ९०८० पदे मुलाखती शिवाय भरतीसाठी उपलब्ध होती. त्यापैकी ५ हजार ८२२ पदासाठी निवड यादी जाहीर केली. त्यापैकी ३ हजार २५८ पदे रिक्त राहिली आहेत. शिक्षकांना १३ ते २१ ऑगस्ट या काळात कागदपत्र पडताळणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षेतेखाली, नगरपरिषद, नगरपालिकेच्या शाळांसाठी प्राधिकार्यांच्या अध्यक्षेतेखाली व खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळांसाठी शाळा समिती मार्फत कागदपत्रांची पडताळी करण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्थासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्राधान्यक्रमाची प्रक्रिया झाली होती. उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून आपली संपूर्ण माहिती पवित्र पोर्टलवर भरलेली होती. त्यानुसार ही यादी जाहीर केली आहे. गेली दोन वर्ष चर्चेत असलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे घेण्याची घोषणा होऊनही जवळपास प्रशासकीय तर कधी तांत्रिक बाबींमध्ये अडकलेली पहायला मिळत होती. ही प्रक्रिया कधी पूर्ण होते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. अखेर शालेय शिक्षण मंत्री अशिष शेलार यांनी वारंवार बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. शिक्षक आमदार, संघटना, प्रशासन आदी बाबत वारंवार यामधील चर्चा करुन अखेर पहिली यादी जाहीर करण्यास यश मिळाले आहे.
जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक
इयत्ता सहावी ते आठवीसाठी इंग्रजी, गणित व विज्ञान विषयासाठी अर्हता प्राप्त उमेदवार उपलब्ध नाहीत. त्यामुळे २,३९२ पदे रिक्त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील २,३११, उर्दू माध्यमाच्या शाळांमधील ६९७, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २३७ पदावर पात्र उमेदवार मिळालेले नाहीत. हिंदी २७, कन्नड १२ आणि पालिकेच्या हिंदी माध्यमाची १३ अशीही पदे रिक्त राहिली आहेत.
आरक्षणनिहाय उपलब्ध न झालेले उमेदवार
अनुसूचित जाती – ३६९
अन्य मागासवर्गीय – ३०१
एसईबीसी – २३२
इडब्लूएस – १६१
खुला गट – ११६
भटक्या जमाती ब, क, व ड प्रवर्ग – २२७
विमुक्त जाती प्रवर्ग – ८१
विशेष मागास प्रवर्ग – ६५
उमेदवारांची जाहीर केलेली निवड सूची
जिल्हा परिषद – ३,५३०
महानगरपालिका – १,०५३
नगरपालिका – १७२
खासगी प्राथमिक शाळा – १,०६७
I want to login on pavitra portal ,how will I login .pl.guide me.