पशुधन विकास अधिकारी सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे पदे भरणार! – Pashusavardhan Vibhag Bharti 2025
Maharashtra Pashusavardhan Vibhag Offline Application 2025
Pashusavardhan Vibhag Bharti 2025
पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या MPSC तर्फे भरती सुरु असून या भरतीला उत्फुर्त प्रतिसाद भेटला. आता हि नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासनाने पशुसंवर्धन विभागातील गट अ संवर्गातील पशुधन विकास अधिकारी पद भरतीची जाहिरात काढली आहे. मात्र, या पदाला सहायक असलेले गट व संवर्गातील सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांची तब्बल ३ हजार पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने कामकाज करताना विभागाला कसरत करावी लागते. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तसेच त्यांच्या अधिन असलेले क्षेत्रीय पदे कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात पशुसंवर्धन सेवा गट अंतर्गत पशुद्धान विकास अधिकारी संवर्गात एकूण ४ हजार ८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत १ हजार ८८६ पदे भरलेली असून, २ हजार ७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर आठ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत.
अशी एकूण २ हजार ८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची २ हजार ७९५ पदे भरली जाणार असून, यासाठी एमपीएससीकडून २९ एप्रिल ते १९ मे या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ पशुधन विकास अधिकारी (गट-ब) व सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक ही पदेदेखील महत्त्वाची आहेत. ही पदेदेखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. ग्रामीण भागात पशुधन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी असलेली ही पदे रिक्त असल्याने ही पदे भरावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ अखेर ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, अशी एकूण २८०६ पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ मधील प्रतिक्षायादीतील ११ पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे. ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याच्या ठिकाणी , दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या अधिनस्त कार्यालयात भरलेल्या पदांपैकी अनेक पदे रिक्त आहे. कृषी आयोगांनी सांगितल्या नुसार ५००० प्राण्यांच्या मागे १ पशुवैद्यकीय अधिकार आसने आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यात ३००० पदे रिक्त आहे. या रिक्त पदांना राज्य सरकार लवकरच भरणार असल्याचे समजते. या साठी नवीन पदभरती प्रक्रया लवकरच सुरु होणार आहे. या द्वारे उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि शेतकरी आणि जनसामान्यांना दिलासा मिळेल. हि माहिती MAHADGIPR महाराष्ट्र जनसंपर्क विभागाद्वारे देण्यात आली आहे. आणि हो मित्रांनो,
या विभागात एकूण मंजूर पदे १० हजार ८७० आहे. यातील ७८५ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ४७१ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले ३८८ आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या ८१ आहे. तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या ६० दाखविण्यात आलेली आहे. माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी ही माहिती मागितलेली आहे. दरम्यान, अनुसूचित जमातीच्या बिंदूवर असलेल्या एकूण ८१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यानंतर ८१ जागा रिक्त असायला पाहिजे. परंतु केवळ ६० जागा रिक्त दाखवल्या आहेत. म्हणजे यातील २१ पदांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात असून, या पदांसाठी विशेष पदभरती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी आहे.
‘पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करा. त्याला मंत्रालयातून मंजुरी दिली जाईल. पावसाळ्यापूर्वी आराखड्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू केले पाहिजे’, अशा सूचना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी (ता.२७) अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. मंत्री मुंडे यांनी शासकीय विश्रामगृहात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुंडे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदांचा आढावा मुंडे यांनी घेतला. रिक्त पदांच्या भरतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा, असेही त्या म्हणाल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पशुधनाची संख्या जास्त आहे त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरली जातील, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले.पर्यावरण आणि पशुसंवर्धनमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. मुंडे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. दुपारच्या सत्रात त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला कोल्हापूर शहरातील प्रमुख उद्योजकांचीही उपस्थिती होती. मंत्रालयस्तरावरून या आराखड्यास मंजुरी दिली जाईल. मात्र, पावसाळ्यापूर्वी पंचगंगा शुद्धीकरणाचे काम सुरू झाले पाहिजे, असे निर्देश मुंडे यांनी दिले. या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे, डॉ. मतकरी, डॉ. सुशील शिंदे यांच्यासह कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पंचगंगेच्या वाढत्या प्रदूषणावर चर्चा झाली. “नदीकाठावरच्या गावांमधून तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका क्षेत्रांतून दररोज लाखो लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगेत मिसळत आहे. त्यासोबत नदीकाठावर कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. दोन्ही महापालिकांची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. पंचगंगा नदी दिवसेंदिवस मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या?,” असा सवाल मंत्री मुंडे यांनी केला.
Pashusavardhan Vibhag Bharti 2025: In accordance with the above subject, it is submitted to you that the Government Decision regarding the reorganization and structure of the Animal Husbandry and Dairying Department has been issued on 10/10/2024. As per Appendix-7 of the said Government Decision, 115 posts of Superintendent in the Clerk cadre and 261 posts of Senior Clerk in the Animal Husbandry and Dairying Department have been abolished. Also, 1286 posts of Peon/Attendant cadre in Class-4 cadre have been declared dead. In respect of the said posts, the employees working on those posts should be counted as majority. In accordance with the provisions of the Government Decision dated 10/09/2001, separate action should be taken by the Finance Department in accordance with the provisions of the Government Decision dated 10/09/2001.
उपरोक्त विषयानुसार आपणास सादर करण्यात येते की, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंधाबाबतचा शासन निर्णय दि.10/10/2024 रोजी निर्गमित झालेला आहे. सदरच्या शासन निर्णयामधील परिशिष्ठ-7 प्रमाणे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातील लिपीक संवर्गातील अधिक्षक या सवंर्गाची 115 पदे, वरिष्ठ लिपीक या सवंर्गातील 261 पदे निरसीत करण्यात आलेली आहेत. तसेच वर्ग-4 संवर्गातील शिपाई / परिचर संवर्गातील 1286 पदे मृत घोषीत करण्यात आलेली आहेत. सदर पदांबाबत त्या पदांवर कार्यरत कर्मचा-यांना अधिसंख्य गणण्यात यावेत. सदर पदावर कार्यरत कर्मचा-यांचे विभागामधील उपलब्ध पदांवर समावेशन करण्याच्या अनुषंगाने वित्त् विभागाचे दि.10/09/2001 च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात यावी असे नमुद केलेले आहे.
पशुसंवर्धन विभाग ची पशुसंवर्धन पर्यवेक्षक पदांची
परीक्षा कधी आहे.पशुधन पर्यवेक्षक पदासाठी पहिले अर्ज दाखल केले आहे त्याचे काय परत अर्ज भरायचे असतील काही लोक एजबार होतील
Job permanent nasnar ka? Pay scale kay asel?
पशुसंवर्धन विभाग ची पशुसंवर्धन पर्यवेक्षक पदांची
परीक्षा कधी आहे.
Ya pepar sati education patrta kiti lagte..???
From KS full krach