पशुधन विकास विभागात तब्बल 906 पदे रिक्त!! – Pashudhan Vikas Vibhag Bharti 2021

Pashusavardhan Vibhag Bharti 2021

Pashudhan Vikas Vibhag Vacnacy Details 

Pashusavardhan Vibhag Bharti 2021  : There are 906 vacancies in the Livestock Development Department. There are 2 thousand 534 category one veterinary dispensaries functioning in the state. There are 906 vacancies for livestock officers since 2015. Further details are as follows:-

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी या महत्त्वाच्या पदांसह विविध ५० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांना खासगी डाॅक्टरांची मदत घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याने रिक्त पदे तातडीने भरा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व पशुसंवर्धन समितीचे सभापती एल. जी. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय ६ लाख ३३ हजार २, शेळी व मेंढी ५ लाख १९ हजार ४२६, तसेच वराह १० हजार ६४६ असे ११ लाख ६३ हजार ७५ जनावरे आहेत. त्यांच्यासाठी पंचायत समितीत ८ तालुक्यांत पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे आहे. त्यापैकी चार रिक्त आहेत. तर फुलंब्रीत पदनिर्मिती केलेली नाही. श्रेणी १ चे ३८ तर ४६ श्रेणी दोनचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. श्रेणी १ दवाखान्यांतील १९ पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. फुलंब्री, कन्नड तालुक्यात अधिकाऱ्यांची १०० टक्के पदे रिक्त आहे. तसेच सहायक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची ५ पदे रिक्त आहे. तसेच श्रेणी २ दवाखान्यांतही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. पदे भरण्यास वेळ लागणार असून तोपर्यंत कंत्राटी पदे भरून पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी निवेदनात केली.

जिल्हा परिषदेकडे पूर्वी असलेल्या २० योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित केल्या गेल्या आहेत. त्या योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग कराव्यात तसेच पोकरा आणि शेततळ्याची योजना किमान ५० टक्के अंमलबजावणी तरी जि. प. कृषी विभागाकडे द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली.

पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने या विभागातील प्रत्येक पद अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या विभागात पशुधन अधिकाऱ्यांची बरीच पदे रिक्त आहेत . राज्यात जवळपास ९०६ पदे रिक्त आहे तर धुळे जिल्यात तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत.

राज्यात श्रेणी एकचे २ हजार ५३४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. तेथे कार्यात पशुधन अधिकाऱ्याची २०१५ पासून ९०६ पदे रिक्त आहेत. निवृत्ती आणि पदोन्नत्यांमुळे अनेक जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरती जातात. मात्र गेल्या सहा वर्षांपासून भरती न निघाल्याने निम्म्या अधिकाऱ्यावरच पशुधन विभागाचा गाडा ओढला जात आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2021


Animal Husbandry Department Vacancy 2021

Pashusavardhan Vibhag Bharti 2021  : When will the eight posts in the Animal Husbandry Department be filled? Eight posts of class two are vacant in the Animal Husbandry Department of Zilla Parishad. Further details are as follows:-

उच्च प्रतीच्या वळूंची निर्मिती, पालनपोषण करणे व कृत्रिम रेतनासाठी तो इतर संस्थांना पुरविणे आदी पशुधन विकास मंडळाच्या जबाबदाऱ्या आहेत. मंडळाच्या प्रमुख कार्यालयात स्थानिक भागातील गायींसह इतर जातीच्या गाय, म्हैस येथूनच विविध शासकीय संस्थांना उपलब्ध करून दिले जातात.

विशेष म्हणजे जनावरांच्या जातीनिहाय डेटा अपडेट ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. देशी गायींचा डेटा जर काळजीपूर्वक व्यवस्थित ठेवण्यात आला तर तो निश्चितपणे भविष्यकाळात उपयोगी पडणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  त्यामुळे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळात डेटा मॅनेजर किंवा सांख्यिकीची पदे भरण्यात यावी, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी वर्गातून होत आहे.

‘पशूधन’ची पदनिहाय स्थिती –  Vacant Post In Pashusavardhan Vibhag Bharti 2021

 • मंजूर पदे ५१६
 • रिक्त पदे ३६६
 • भरलेली पदे १५०
 • (जानेवारी २०२१ पर्यंत)

पशुसंवर्धन विभागात वर्ग दोनची पदे रिक्त!! जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात वर्ग दोनची आठ पदे रिक्त आहेत. त्यातही पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी ‘पदवीधर’ सापडत नसल्याने शवविच्छेदन अहवाल व इतर जबाबदार प्रस्ताव, कागदपत्र, प्रमाणपत्र देण्यातही अनेक वेळा अडचणी येतात. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे अनेक वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले. पाठपुरावाही सुरू आहे; परंतु रिक्त पदांचा प्रश्न २ जूनपर्यंतही निकाली निघालेला नाही.

जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. जिल्ह्यात साडेतीन लाखांच्या आसपास पशुधन असून, पशुधनाचे ‘आरोग्य’ सांभाळण्यासाठी श्रेणी एकच्या दवाखान्यावर एलडीओ दर्जाची २१ पदे मंजूर आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची काही पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार कार्यरत अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.


Vacancy in Veterinary Hospital

Pashusavardhan Vibhag Bharti 2021  : There are vacancies for 3 Chief Officers and Staff in the Small Veterinary Hospital at Lakhandur. It is known that the animals have been treated in this condition for the last 4 years.

Pashusavardhan Vibhag Bharti 2021 – तालुका लघु पशू चिकित्सालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पद रिक्त. लाखांदूर येथील लघु पशू चिकित्सालयातील तब्बल ३ प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सदर स्थितीत गत ४ वर्षांपासून सदर पशू चिकित्सालयातील चपराशाद्वारे प्राण्यांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे.

लाखांदूर येथे गत काही वर्षांपूर्वी लघु पशू चिकित्सालय दवाखान्याची निर्मिती केली गेली. या दवाखान्यांतर्गत तालुक्यातील लाखांदूर, किन्हाळा, पिंपळगाव को., सावरगाव, खैरी /पट, चिचोली व दहेगाव आदी गावांतील शेतकरी व नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. या दवाखान्यांतर्गत शेतकरी व नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर उपचार करण्याहेतू ५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांत सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, ड्रेसर, लिपिक व चपराशी यांचा समावेश आहे.


Pashusavardhan Vibhag – पशुधन पर्यवेक्षकांची विविध पदे रिक्त 

Pashusavardhan Vibhag Bharti 2021 : The Livestock Development Department in Savner taluka has started taking up vacancies and the work of 17 employees of this department is being done by 10 employees. 7 out of 12 posts of Livestock Supervisors are vacant.

Pashusavardhan Vibhag – पशुधन पर्यवेक्षकांची विविध पदे रिक्त. पशुधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सावनेर तालुक्यातील पशुधन विकास विभागाला रिक्त पदाचे ग्रहण लागले असून, या विभागातील 17 कर्मचाऱ्यांची कामे 10 कर्मचाऱ्यांना कारवी लागत आहे. पशुधन पर्यवेक्षकांची 12 पैकी 7 पदे रिक्त आहेत.

Pashusavardhan Vibhag Bharti 2021

ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तसेच त्यांचा प्रभारी येत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांची जनावरे उपचारासाठी सावनेर शहरात आणावी लागतात किंवा खासगी डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करवून घ्यावे लागतात.


Pashusavardhan Vibhag – Pashusavardhan Vibhag Recruitment 2021

Pashusavardhan Vibhag Bharti Details are given below. The latest Updates & Details about the Pashusavardhan Vibhag details are given below. This recruitment is expected Soon in 2021. More updates about this bharti are given below.

पशुसंवर्धन विभागात 535 मंजूर पदे रिक्त. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात २१९२ पशुधन विकास अधिकारी गट-अ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या फक्त १६५७ पदांवर पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत तर जवळपास ५३५ मंजूर पदे रिक्त आहेत. टाळेबंदीच्या काळात इतर सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडली असताना कृषी व्यवसाय इतर अर्थव्यवस्थेस पाठबळ देत आहेत. असे असतानाही शासनाने पशुधन विकास अधिकारीपद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुटंड असोसिएशनने याचा विरोध केला आहे.

चार वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती न झाल्यामुळे राज्यामध्ये हजारो पदवीधर पशुवैद्यक शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पशुधन विकास अधिकारी गट-अ हे पद मानधनावर भरल्याने या पदाचे महत्त्व कमी होईल. तसेच पदवीधर पशुवैद्यकांसाठी रोजगार निश्चिती राहणार नाही.

या संदर्भातील अधिक माहिती आम्हीं लवकरच प्रकाशित करू…


GR प्रकाशित – पशुसंवर्धन विभागातील पदभरतीला मान्यता

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट-क या संवर्गात राज्यस्तरीय एकूण 776 पदे मंजूर असून त्यापैकी 378 पदे रिक्त आहेत. राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये कुक्कुट व इतर पक्ष्यांना एच१फाईव्ह१ (बर्ड फ्ल्यू) या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने तातडीची उपाययोजना म्हणून राज्यातील पशुपालकांना पशुस्वास्थ्यविषयक सेवा प्रदान कार्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक रिक्त पदे तात्काळ भरण्याची बाब विचाराधीन होती.
PashuSavrdhan Vibhag Bharti 2021

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक (गट-क) या संवर्गातील 378 रिक्त पदांपैकी 262 पदे संदर्भ क्र. 2 ते 6 येथील शासन निर्णय/ परिपत्रकामध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार बाह्यस्त्रोत उपलब्ध करून घेण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. यासंदर्भातील अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.

GR प्रकाशित  – http://bit.ly/2Oji4bd


महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागातील विविध पदे रिक्त! – जाणून घ्या

जिल्ह्यात नऊ लाखांवर पशुधन असताना, पशुसंवर्धन विभागाला मात्र रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत व राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील जिल्ह्यातील एक दोन, नव्हे तब्बल १३१ पदे रिक्त आहेत. विशेषत: जिल्हा पशुचिकित्सालयाचे कामकाज दोघांच्या खांद्यावर पडले आहे.

मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे; तर जालना जिल्ह्यातील तीन गावांमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी ‘लम्पी स्कीन’ या आजाराने पशुपालक, शेतकऱ्यांची झोप उडाली होती. जिल्ह्यातील पशुधनावर औषधोपचार करण्यासाठी जिल्ह्यात १०४ पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. यात जिल्हा परिषदेंतर्गत ५९, तर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची ४५ रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असून, अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांचाही वानवा आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन विकास अधिकाऱ्%4ांची ४२ पदे मंजूर असून, त्यातील २० पदे भरलेली आहेत; तर तब्बल २२ पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १० पदे मंजूर असून, त्यातील तीन पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकांच्या ४७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत, तर वर्णेापचारकांच्या २७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत.

राज्य पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांसह पशुवैद्यकीय रुग्णालयांसाठी एकूण १३९ पदे मंजूर असून, त्यातील केवळ ४९ पदे भरण्यात आली आहेत, तर तब्बल ९० पदे रिक्त आहेत. विशेषत: जालना शहरातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात केवळ सहायक आयुक्त व इतर एक अशी दोनच पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित १३ पदे रिक्त आहेत. तर एकूण पदांमध्ये सहायक आयुक्तांची ४, पशुधन विकास अधिकाऱ्यांची ५, सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याचे १, पशुधन पर्यवेक्षकांची २५, लघुलेखक १, वरिष्ठ सहायक १, वरिष्ठ लिपिक ५, कनिष्ठ लिपिक १, चालक- २, वर्णेापचारक ४, शिपायाचे एक, परिचराचे ३८, रात्रपहारेकऱ्याचे १, स्वच्छकाचे १ अशी ९० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शहरी विशेषत: ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. जनावरे आजारी पडली किंवा एखादी साथ आली, तर वेळप्रसंगी खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे

अस्मानी-सुल्तानी संकटांच्या काळात दुधाळ जनावरांमुळे शेतकरी, पशुपालकांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो. शेतकऱ्यांनी पशुधनाचा जोड व्यवसाय करावा, यासाठी शासन विविध योजनाही राबवित आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पशुधन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयातून उपचार दिले जात असून, साथ नियंत्रणासह लसीकरणाची मोहीमही राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

सोर्स : लोकमत


राज्य सरकारने नव्या वर्षात बेरोजगार व नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा देण्याचे ठरवले असावे, कारण आरोग्य खात्यातील पदभरती लवकर करा असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर आरोग्य व ग्रामविकास खात्यात ८ हजार जागांची भरती होणार आहे (सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..), तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती होणार असल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे. या भरतीच्या पुढील अपडेटसाठी प्लेस्टोर वरून महाभरती अँप डाउनलोड करायला विसरू नका.
यामुळे राज्यात नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पदभरती जानेवारी अखेर पूर्ण करा अशा सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या बहुतेक सर्वच नोकऱ्या खासगी व कार्पोरेट क्षेत्रातील आहेत. अशावेळी सरकारी नोकरी हीच कोणत्याही काळात आशेचा किरण ठरली आहे. त्यामुळेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आरोग्य, ग्रामविकास व पशुसंवर्धन मंत्रालयाने दिलासा दिला आहे.

जानेवारी महिन्यात आरोग्य खात्याची व फेब्रुवारी महिन्यात ग्रामविकास खात्याची भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठासह सर्व शासकीय पशुसंवर्धन दवाखान्यांमधील रिक्त पदेही भरली जाणार आहेत. ती पदे तीन हजारांच्या आसपास असल्याची माहिती या खात्याचे मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.


AHD Maharashtra Recruitment 2021 – Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra ,Maharashtra Pashusavardhan Vibhag recruits Freshers every year for the posts Livestock Supervisor, Livestock Attendant. SSC, HSC, Graduate Pass outs have plenty of scopes to build up Career in AHD Pashusavardhan Vibhag (Animal Husbandry Department) if qualified in the competitive exams. This year For 2021 Yet Not Advertisement is published by respective department.

पशुसंवर्धन विभाग भरती 2021  – पशुसंवर्धन विभाग भरती संदर्भातील अपडेट्स या पेज वर प्रकाशित करत असतो. सध्या या संदर्भतील कुठलाही अपडेट सध्या उपलब्ध नाही. नवीन अपडेट आम्ही उपलब्ध झाल्या वर आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.

When the Official Advertisement of Pashusavardhan Vibhag will published we will inform you about this Bharti on this page. After that we will also update the link of PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements.

Organization Name

Department of Animal Husbandry Maharashtra, AHD Maharashtra, Pashusavardhan Vibhag

Name Posts (पदाचे नाव)

Livestock Supervisor, Attendant

Number of Posts (एकूण पदे)

N/A

Age Limit (वय मर्यादा)

18 to 38 years.

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://ahd.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Pune Division, Nashik Division, Aurangabad Division, Mumbai Division,Latur Division, Amravati Division, Nagpur Division

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

Available Soon.

Following are the region wise details of the Pashusavardhan Vibhga 2021

District Wise Pashusavardhan Vibhag Bharti Vacancy Details:-

 1. Sindhudurg Vibhag Bharti 2021
 2. Bhandara Vibhag Bharti 2021
 3. Chandrapur Vibhag Bharti 2021 
 4. Gondia Vibhag Bharti 2021
 5. Wardha Vibhag Bharti 2021
 6. Ahmednagar Vibhag Bharti 2021
 7. Dhule Vibhag Bharti 2021
 8. Nashik Vibhag Bharti 2021
 9. Aurangabad Vibhag Bharti 2021
 10. Nagpur Vibhag Bharti 2021
 11. Amravati Vibhag Bharti 2021
 12. Buldhana Vibhag Bharti 2021
 13. Yavatmal Vibhag Bharti 2021
 14. Washim Vibhag Bharti 2021
 15. Nandurbar Vibhag Bharti 2021
 16. Sangali Vibhag Bharti 2021
 17. Satara Vibhag Bharti 2021
 18. Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2021
 19. Akola Vibhag Bharti 2021
 20. Kolhapur Vibhag Bharti 2021
 21. Sangali Vibhag Bharti 2021
 22. Satara Vibhag Bharti 2021
 23. Gadchiroli Vibhag Bharti 2021
 24. Gadchiroli Vibhag Bharti 2021
 25. Beed Vibhag Bharti 2021
 26. Jalna Vibhag Bharti 2021
 27. Osmanabad Vibhag Bharti 2021
 28. Latur Vibhag Bharti 2021
 29. Beed Vibhag Bharti 2021
 30. Jalna Vibhag Bharti 2021
 31. Nanded Vibhag Bharti 2021
 32. Hingoli Vibhag Bharti 2021
 33. Parbhani Vibhag Bharti 2021
 34. Ratnagiri Vibhag Bharti 2021
 35. Jalgaon Vibhag Bharti 2021
 36. Solapur Vibhag Bharti 2021
 37. Thane Vibhag Bharti 2021
 38. Palghar Vibhag Bharti 2021
 39. Raigad Vibhag Bharti 2021

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

26 Comments
 1. Hitesh nerlekar says

  8 pas नोकरी पशू कंपाउंडर

 2. Sadekar Harshwerdhan sanjay says

  पशु संवर्धन विभाग मध्ये शिपाई पदासाठी ची महिती

 3. Abhishek Prasad Kulkarni says

  इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर hsrdwetr & Nateworking चे जॉब्स आहेत का?

 4. Madhuri rokade says

  Pashu darshan tarikha jahir kra lavkar

 5. Bhavesh pawar says

  पशु पालनाविषयी माहिती

 6. purbhajigonekarl says

  पशु संवर्धन भरती दिनांक

 7. अनिल तागड says

  पशुधन पर्यवेक्षक पदासाठी पहिले अर्ज दाखल केले आहे त्याचे काय परत अर्ज भरायचे असतील काही लोक एजबार होतील

 8. Shashi shelke says

  Mi mage bharlay form ti exam post pond zali hoti. Mg pet form bharava lagel ka

 9. Keshav khade says

  Magil form bharlele paper kadhi hinar

 10. प्रशांत भोये says

  मागील ३ वर्ष चलन भरले पन भरती झालीच नाही खरच आता भरती होनार का ?

 11. Priya Sawale says

  10 12 pass vr ahe ka

  1. MahaBharti says
 12. Yug says

  Hii

 13. Yogita says

  Agri polytechnic diploma sati ha job available ahe ka??

 14. Mitali Farkunde de says

  From KS full krach

 15. Pisore says

  Ya pepar sati education patrta kiti lagte..???

 16. Dinesh shildar pawara says

  पशुसंवर्धन विभाग ची पशुसंवर्धन पर्यवेक्षक पदांची
  परीक्षा कधी आहे.

 17. Shalini Kare says

  Job permanent nasnar ka? Pay scale kay asel?

 18. modake usha Dagadoba says

  पशुसंवर्धन विभाग ची पशुसंवर्धन पर्यवेक्षक पदांची
  परीक्षा कधी आहे.पशुधन पर्यवेक्षक पदासाठी पहिले अर्ज दाखल केले आहे त्याचे काय परत अर्ज भरायचे असतील काही लोक एजबार होतील

 19. DEEPAK LAHANU PATIL says

  पशुसंवर्धन विभाग ची पशुसंवर्धन पर्यवेक्षक पदांची
  परीक्षा कधी आहे

 20. Kanchan Ghoke says

  Online jobs available ahet ka work from home sati lecturer mhnun veterinary science students la

 21. Sanjay Dabhade says

  When start Pashudhan paryavekshak Requirements

 22. पुरुषोत्तम किसन मोहरकर says

  माझं शिक्षण दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन अँड अनिमल हजबंदरी कोर्स झालं आहे कोणतं जॉब मिळणार

 23. Sopan Bhausaheb shejul says

  2019ला फाँर्म भरलेले मुलांचे परिक्षा किंवा भरती झाली नाही त्यांचे आता वय बसत नाही त्यांचे काय करणार
  पशुसंवर्धन विभाग

 24. Mangesh says

  2019 फार्म भरले आहे त्याचे पेरपर केव्हा होणार आहे सर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड