Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पेसा शिक्षक भरती स्थगितीमुळे उमेदवारांमध्ये नैराश्य! | Palghar Shikshak Bharti 2023

Palghar Shikshak Bharti 2023 - zppalghar.gov.in

Palghar Shikshak Bharti 2023

Palghar Shikshak Bharti 2023: The postponement of the PESA Shikshak Bahrti 2023 teacher recruitment process in Palghar district has triggered resentment among eligible candidates for teacher recruitment. According to a letter from the General Administration Department, the recruitment process has been postponed as the petition filed in the Supreme Court is being heard. After completing all the procedures for the teacher recruitment process, out of 835 candidates eligible for PESA teacher recruitment, 778 candidates have been finalised at the school level as per the subject at the taluka level. However, the General Administration Department has ordered the recruitment process to be postponed till November 10 as a petition filed by an NGO is being heard in the Supreme Court. This has created a fear among the candidates that they will miss out on their jobs.

 

पालघर जिल्ह्यातील पेसा शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्यामुळे शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या एका पत्रानुसार भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेसा शिक्षक भरती साठीपात्र असलेल्या ८३५ उमेदवारांपैकी ७७८ उमेदवारांना तालुका स्तरावर विषयाप्रमाणे शाळा स्तरावर निश्चिती करण्यात आली आहे. मात्र एका सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून येथे १० नोव्हेंबर पर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये हातातोंडाशी आलेल्या नोकरीला मुकावे लागेल अशी भीती निर्माण झाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यातील अनेक शिक्षक भरती उमेदवार पोलीस भरती तयारी, होमगार्ड, आश्रमशाळेत तासिका शिक्षक तसेच खाजगी क्षेत्र आणि कंपनीमध्ये नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र भरती प्रक्रियेत पात्र ठरून शाळा निश्चिती झाल्यामुळे त्यांनी नवीन नोकरीच्या आशेवर आपल्या हातातील कामे सोडली. त्यातच भरती प्रक्रियेवर स्थगिती आल्यामुळे उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

भरती प्रक्रिया स्थगितीमुळे एका उमेदवार तरुणीचा नैराश्याने मृत्यू झाल्याची घटना जव्हारमधून समोर आली आहे. याआधी २०१४ साली तलाठी भरती प्रक्रियेत मेरिटमध्ये आलेली ताई गणपत गभाले ही तरुणी शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र ठरली असून तिला तालुका स्तरावरून शाळा निश्चिती देण्यात आली होती. मात्र भरतीवर स्थगिती आल्यामुळे ताई गभालेला नैराश्याने घेरले असून त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या प्रकरणी परिसरातून हळहळ व्यक्त होत असून पेसा भरतीचा पहिला बळी या मथळ्याखाली तिचा फोटो प्रसार माध्यमांवर प्रसारित होत असून यापुढे निराश उमेदवारांकडून चुकीचे पाऊल उचलण्यात येण्याची शक्यता आदिवासी संघटनांकडून वर्तवण्यात येत आहे.

 


 

The state government has approved filling up of 80 per cent of the vacant posts of teachers in pesa area in Palghar district. That clears the way for the district to hire PESA teachers by the end of this month, and the district will receive 1,318 teachers. In view of the impact of vacant posts of teachers across the state on the education of students and the difficulties faced in the recruitment process, the state government has allowed filling up 80 per cent of the vacant posts of teachers in pesa area in 13 districts, including Palghar.

पालघर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागेसाठी ‘पेसा’ अंतर्गत दोन हजार १९४ रिक्त पदांपैकी १ हजार तीनशे अठरा पदे भरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी ‘पेसा’ क्षेत्रातील परीक्षा दिलेल्या २,५५६ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीनंतर ७७३ उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांची ही अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

प्रसिद्ध केलेल्या यादीतील उमेदवाराला हरकतीसाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून या संदर्भातील प्राप्त हरकती तपासून अंतिम यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. ‘पेसा’ मध्ये नकारात्मक प्रतिसाद नोंदवणाऱ्या उमेदवारांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांची मान्यता घेऊन पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र ‘पेसा’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने उमेदवारांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही. तसेच अपात्र उमेदवारांची अपात्र होण्याची कारणे यादीत नमूद असतील, तसेच त्रुटी पूर्ततेसाठी तीन कार्यालयीन दिवस वेळ देण्यात येणार आहे

ST संवर्गातील पेसा क्षेत्रातील शिक्षण सेवक पद भरती अपात्र यादी प्रसिद्ध करणे बाबत

पालघर जिल्ह्यातील रिक्त असणाऱ्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या पदांपैकी ८० टक्के पदे भरण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात या महिन्याअखेपर्यंत पेसा शिक्षकांची नेमणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्ह्याला १३१८ शिक्षक मिळणार आहेत. राज्यभरात शिक्षकांची असलेली रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम, त्यातच भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता राज्य सरकारने पालघरसह १३ जिल्ह्यांमध्ये रिक्त असणाऱ्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांपैकी ८० टक्के पदे भरण्यासाठी अनुमती दिली आहे.

सन २०२१ च्या रिक्त पदांना अनुसरून जिल्ह्याला १३१८ शिक्षकांची भरती करण्यास शासनाचे अनुमती दिली होती. त्यानुसार बारावी, डीएड, टीईटी तसेच जात पडताळणी झालेल्या व पात्र वयोगटातील उमेदवारांची यादी आयुक्तालयाने दिल्यानंतर संबंधित उमेदवारांना आवश्यक कागदपत्र जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र प्राप्त यादीतील २५५६ पैकी ११९ उमेदवार हे टीईटीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अडकल्यामुळे उर्वरित २४३७ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी शिक्षण विभागाने हाती घेतली आहे.

शासनाने दिलेल्या नियमानुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे शिक्षकांना पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर नेमणूक करण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदोपत्री प्राथमिक छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त असलेल्या पदांपेक्षा कमी संख्येने शिक्षक उपलब्ध होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. शिक्षकांची महिना अखेरीपर्यंत नेमणूक व्हावी म्हणून शिक्षण विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. या कामी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पालघर: जिल्हा प्रशासनाने सरळ सेवेने सुरू केलेली भरती ही इतर समाजातील उमेदवारांवर अन्यायकारक असून ही पेसा भरती प्रक्रिया रद्द करा, अशी मागणी ओबीसी समाजाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. २०१४ चे राज्यपालांच्या अद्यादेशाने आदिवासी जिल्ह्यामध्ये ‘क’ व ‘ड’ संवर्गातील नोकरीची १७ पदे ही १०० टक्के फक्त आदिवासी समाजासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. पेसा भरतीची बाब न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील उमेदवारांची सरळसेवेने सुरू केलेली नियमबाह्य शिक्षक भरती त्वरित थांबविण्यात यावी, शिक्षक व इतर पदाच्या भरतीसाठी पात्र असलेल्या भूमिपुत्र उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत निर्णय न घेतल्यास न्यायासाठी इतर उमेदवारांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. शासनाने अनुसूचित क्षेत्रातील भरतीबाबत घेतलेले निर्णय व आयुक्तांच्या आदेशाने सुरू असलेली शिक्षक भरती ही फक्त आदिवासी समाजातील उमेदवारांसाठी असल्याने बिगर आदिवासी समाजातील पात्र उमेदवारांवर नोकरीमध्ये अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

 


 

Document Verification Schedule of Candidates in Teacher Recruitment in PESA Sector has been issued.  Education Department Primary, Zilla Parishad Palghar is recruiting teachers in vocational sector. As per that schedule the shortlisted candidates should attend with all the original documents and a set of self attested photocopies as per the checklist provided, self declaration letter in the accompanying sample (A4 size on plain paper), small family affidavit as provided, and one passport size photograph. Download Palghar Shikshak Bharti 2023 document Verification list. Aslo Check more details about Shikshak Palghar Bharti 2023:

शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी कार्यशाळा खालील नियोजनाप्रमाणे आयोजित केलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे सोबतच्या यादीतील उमेदवारांनी सोबत दिलेल्या चेकलिस्ट प्रमाणे सर्व मुळ कागदपत्रे व स्व साक्षांकित छायांकित प्रतीचा संच, सोबतच्या नमुन्यातील स्वघोषणापत्र (साध्या कागदावरील A४ साईज ), सोबत दिल्याप्रमाणे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तसेच एक पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित रहावे.

PESA Shikshak Bharti Selection List

ZP Palghar Shikshak Bharti 2023

Download Palghar Teacher Recruitment Selection List


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड