२६०० जाग-पुणे ऑनलाईन रोजगार मेळावा

Online Rojgar Melava 2020

Online Rojgar Melava 2020 – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांना अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत असून, केवळ २५ ते ३० टक्के मनुष्यबळ उपलब्ध आहे. परराज्यातील मजुरांच्या स्थलांतरामुळे औद्योगिक कंपन्यांत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची मेगा भरती केली जाणार आहे. विविध कंपन्यांमध्ये २६००हून अधिक रिक्त जागा आहेत. त्यातही लवकरच ऑनलाइन रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.

‘पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनीअर, अकाउटंट, टीग वेल्डर यासारख्या पदांसाठी भरती होणार आहे. आवश्‍यक पात्रताधारक, तसेच सातवी ते पदवीधर उमेदवारांसाठी एकूण २६०० पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत,’ अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्‍त अनुपमा पवार यांनी दिली.

    • ऑनलाइन रोजगार मेळावा – या नोकरभरतीच्या अनुषंगाने रस्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘ऑनलाईन रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now



  • पसंतीक्रम नोंदविणे गरजेचे – या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांतर्गत उमेदवारांनी आपापल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाइटद्वारे लॉग इन करून पदांचा पसंतीक्रम नोंदवावा लागेल. पसंतीक्रम नोंदविताना इच्छुकांनी त्यांच्या घरापासून किंवा वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून जवळची कंपनी पाहून, आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करावी. २२ जूनपर्यंत ही प्रक्रिया करता येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
  • ‘एसएमएस’द्वारे माहिती – इच्छुक व ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

📝 अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

21 Comments
  1. Suvarna kalwale says

    Mala punyat pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड