ऑनलाईन रोजगार मेळाव्याद्वारे नोकरीची संधी !

Online Rojgar Melava

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दुसरा ऑनलाईन रोजगार मेळावा घेण्यात येणार असून यासाठी विविध कंपन्यामध्ये 485 पेक्षा अधिक पदे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या मेळाव्यासाठी पसंतीक्रम नोंदविण्याकरीता येत्या 10 जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्यामधील विविध प्रकारच्या रिेक्तपदांद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्याअंतर्गत उद्योजकांकडील वेल्डर, फिटर, टर्नर, इलेक्‍ट्रीशियन, मशिनिस्ट, पीपीओ यासारखे आयटीआय ट्रेड, हेल्पर, रीगर, इंजीनिअरींग डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रीकल, मेकॅनिकल, ऑटोमोटिव्ह, प्रॉडक्‍शन तसेच सेफ्टी ऑफीसर या सारख्या पदांसाठी आवश्‍यक ती अल्पशिक्षित, एसएससी, एचएससी, पदवीधर उमेदवारांसाठी रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

“रोजगार मेळाव्यात ऑनलाईन ऍप्लाय करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे ई-मेलद्वारे सादर केलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत. ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टद्वारे कळविण्यात येणार आहे. शक्‍य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

-अनुपमा पवार(सहायक आयुक्त, पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र)

हा मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी लागणार आहे. पसंतीक्रम नोंदविताना उमेदवारांनी वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची व आवश्‍यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदांची निवड करणे आवश्‍यक आहे.


या उपक्रमात सध्या ३ कंपन्या सहभागी होत आहेत. तसेच या अतंर्गत २०० अधिक पदाची भरती होणार आहे. यात १२ वी पास , पदवी व ITI उमेदवारांसाठी रोजगार संधी आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी(लिंक खाली दिलेली आहे).

तसेच लक्षात ठेवा त्या काळात आपला फोन सुरु ठेवा, या प्रक्रयेत काही अडचण आल्यास निशुल्क क्रमांक १८००-४२५-१५१४ वर संपर्क साधण्याचेही कळविण्या आले आहे. या रोजगारसाठी आपल्याला लाँकडाउन संपल्यानंतर रुजू होता येईल. सर्व प्रक्रिया निशुल्क आहे. या व्यतीरिक्त ईतरही ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याचे डॉ. अनिल जाधव यांनी सांगितले.



प्रामुख्याने पीडीएफ स्वरुपातील बायोडाटा तयार ठेवण्याबरोबरच बदलत्या काळानुसार आता व्हिडिओ प्रोफाईलही बायोडेटा तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली कागदपत्रे डीजीलॉकरसारख्या ॲपमध्येही ठेवता येतात, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

https://www.ncs.gov.in/_layouts/15/NCSP/job-seeker/JSRegister.aspx


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
  1. Rinkujoshi says

    B.com jobs

  2. Dhanashree Machale says

    I am searching a job in agriculture sector please informe if vacancies are available and in lockdown,job from another sector if available then, I am ready for doing but the work from home base. Thank you

  3. Sanjay potode says

    Sar mi lagu sakto ky

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड