आभा कार्डची ऑनलाइन नोंदणी सुरू : आशा सेविका व सेतू केंद्राच्या माध्यमातून बनते आभा कार्ड!! – Online Registration Begins: ABHA Card Can Be Made Through ASHA Workers and Setu Centers!!
Online Registration Begins: ABHA Card Can Be Made Through ASHA Workers and Setu Centers!!
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णसेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात येताना आभा कार्ड सोबत आणावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले आहे. ज्या नागरिकांकडे आभा कार्ड नाही, त्यांनी आपल्या भागातील आशा सेविका किंवा जवळच्या सेतू केंद्रामार्फत आभा कार्ड बनवून घ्यावे.
आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची नोंदणी आभा कार्डद्वारे करण्याच्या सूचना भारत सरकार आणि राज्य सरकारकडून प्राप्त झाल्या आहेत. हे कार्ड रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी डिजिटल स्वरूपात संग्रहित करण्याची सुविधा देते. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाचा वैद्यकीय इतिहास सहज तपासता येतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आभा नंबर हा रुग्णांसाठी एक विशिष्ट आणि विश्वासार्ह ओळख क्रमांक असेल, जो देशभरातील आरोग्य सेवा प्रदाते आणि संबंधित यंत्रणांकडून स्वीकारला जाईल. आभा (आयुष्यमान भारत आरोग्य खाते) पत्ता हा एक निवडलेला वापरकर्ता नाव असतो, ज्याद्वारे रुग्ण त्यांच्या आरोग्य नोंदी सुरक्षितपणे अॅक्सेस आणि संबंधित डॉक्टरांसोबत शेअर करू शकतात. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे आभा कार्डद्वारे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचे आभा खाते तयार करण्यात आले आहे. आभा प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आणि त्यात नोंदणीसाठी रुग्णांना त्यांच्या आभा कार्ड किंवा आभा क्रमांकाची माहिती असणे आवश्यक आहे.
आभा हेल्थ कार्डचे फायदे
देशभरातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय उपचारांमध्ये सहज प्रवेश
वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित करण्याची सुविधा
डॉक्टरांना रुग्णाच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहासाची उपलब्धता
वैयक्तिक हेल्थ रेकॉर्डसाठी सोपी साइन-अप प्रक्रिया
सर्व वैद्यकीय माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात सुरक्षित
काय आहे आभा कार्ड?
आभा कार्ड हे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत असलेले डिजिटल हेल्थ कार्ड आहे. या कार्डावर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, उपचार यांची माहिती संग्रहित केली जाते. प्रत्येक आभा कार्डसाठी एक १४ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो, जो देशभरात कोणत्याही आरोग्य सेवेसाठी वापरता येतो.