शाळांमध्ये ऑनलाइन प्रीलिम परीक्षा – जाणून घ्या
Online Prelims Exams in Schools
Online Prelims Exams in Schools : पुढील वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांबाबत अद्याप स्पष्टता नसतानाही शाळांनी ऑनलाइन प्रीलिम परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. बोर्डाच्या परीक्षांची घोषणा झाल्यास विद्यार्थी त्यासाठी तयार असावेत, यासाठी ही परीक्षा घेतली जात असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.
शिक्षण मंत्रालयाने १०वी व १२वीच्या मुख्य परीक्षांच्या तारखांबाबत अजूनही स्पष्ट सूचना केलेली नाही. मात्र, ही परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीनेच होईल, असे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळांनी ऑनलाइन प्रीलिम परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरगाव, गाझियाबाद आणि नॉएडामध्ये लॉकडाउनमध्ये शिथिलता असल्याने प्रीलिम परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्यावर विचार सुरू आहे. करोनाचा प्रादुर्भाव जोरात असतानाही सीबीएसईने नीट व जेईई या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या. साहजिकच १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रत्यक्ष परीक्षेसाठी तयार राहायला हवे. आम्ही सध्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ऑनलाइन प्रीलिम परीक्षा घेत आहोत. अर्थात, एवढी तयारी पुरेशी नसून, आम्ही सीबीएसईच्या मार्गदर्शक सूचनांतर्गत प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचाही विचार करत आहोत, असे दिल्लीतील रोहिणी येथील एमआरजी शाळेच्या प्राचार्य प्रियांका बरारा यांनी सांगितले.
गाझियाबादमधील डीपीएस-आरएनई शाळेच्या प्राचार्य पल्लवी उपाध्येय यांच्या म्हणण्यानुसार, करोना संसर्गकाळातही शाळेकडून बोर्डाच्या परीक्षेसाठीचा आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात आला आहे. तसेच सीबीएसईच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेने ऑनलाइन परीक्षा घेतली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तत्पूर्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत डिजिटल संवादसत्र आयोजित करण्यात आले होते. आता जानेवारीत प्रत्यक्षरित्या परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. पुष्पांजली विहारस्थित डीएव्ही पब्लिक स्कूलच्या प्राचार्य रश्मी बिस्वाल यांनी सांगितले की, बोर्डाच्या बहुतांश परीक्षा या ८० गुणांच्या असतात. त्यामुळे विद्यार्थांना पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव व्हायला हवा, असे आम्हाला वाटते. त्यानुसार आम्ही डिसेंबरच्या सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या प्रीलिम परीक्षा घेतली. पुढची प्रीलिम आणि चाचणी परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचा विचार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- – सरकारची अद्यापही स्पष्ट सूचना नाही
- – संभ्रम असतानाही दिल्लीतील शाळांच्या ऑनलाइन परीक्षा
- – विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी परीक्षा घेत असल्याचे स्पष्टीकरण
आम्ही सध्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ऑनलाइन प्रीलिम परीक्षा घेत आहोत. अर्थात, एवढी तयारी पुरेशी नसून, आम्ही सीबीएसईच्या मार्गदर्शक सूचनांतर्गत प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचाही विचार करीत आहोत.
प्रियांका बरारा, प्राचार्य
बोर्डाच्या बहुतांश परीक्षा या ८० गुणांच्या असतात. त्यामुळे विद्यार्थांना पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव व्हायला हवा, असे आम्हाला वाटते. त्यानुसार आम्ही डिसेंबरच्या सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरीत्या प्रीलिम परीक्षा घेतली. पुढची प्रीलिम आणि चाचणी परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचा विचार आहे.
रश्मी बिस्वाल, प्राचार्य
सोर्स : म. टा.