नेट चा निकाल जाहीर
NTA Exam Results Declared
सहायक प्राध्यापकांसाठी 60 हजार 147 उमेदवार तर, कनिष्ठ संशोधक पदासाठी 5 हजार 92 उमेदवार पात्र
पुणे – वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)चा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात सहायक प्राध्यापकांसाठी 60 हजार 147 उमेदवार, तर कनिष्ठ संशोधक पदासाठी 5 हजार 92 उमेदवार पात्र ठरले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे युजीसी नेट परीक्षा देशभरात 2 ते 6 डिसेंबरदरम्यान 299 शहरांतील 700 केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 10 लाख 34 हजार 872 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 7 लाख 93 हजार 813 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. या व्यावसायिक परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाइल जॅमर यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. तसेच, ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
युजीसीच्या धोरणानुसार, दोन्ही विषयांच्या परीक्षा देऊन त्यात किमान सरासरी गुण मिळवलेल्या उमेदवारांना पात्र ठरवण्यात येते. त्यानुसार परीक्षा दिलेल्यांपैकी 6 टक्के उमेदवार पात्र ठरल आहेत. सविस्तर निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.