राज्यात NRHM ची सात हजार पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार! – NRHM Bharti 2025
NRHM Bharti 2025
राज्यात एनआरएचएमची ३६ हजारांपैकी सात हजार पदे रिक्त – ग्रामीण भाग व असुरक्षित गटातील नागरिकांना परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, म्हणून सार्वजनिक आरोग्यसेवेचा इंडेक्स कमी असणाऱ्या राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) राबवण्यात येते; परंतु मनुष्यबळाअभावी हे अभियान सलाइनवर आले आहे. राज्यात ३६ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील सात हजार १२७ पदे आजघडीला रिक्त आहेत. विदर्भआणि आदिवासीबहुल जिल्ह्यांतील रिक्तपदांची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. त्या मुले हि पदभरती त्वरित करण्यात येण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने सरकार सुद्धा या रिक्त जागा लवकरच भरणार असल्याचे समजते. या मुळे राज्यातील उमेदवारांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या सुद्धा मिळणार आहेत. ग्रामीण भाग व असुरक्षित गटातील नागरिकांना परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, म्हणून सार्वजनिक आरोग्यसेवेचा इंडेक्स कमी असणाऱ्या राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) राबवण्यात येते; परंतु मनुष्यबळाअभावी हे अभियान सलाइनवर आले आहे. राज्यात ३६ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील सात हजार १२७ पदे आजघडीला रिक्त आहेत. विदर्भआणि आदिवासीबहुल जिल्ह्यांतील रिक्तपदांची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे.
ही कंत्राटी पदे असली, तरी सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. यात एएएनएम, स्टाफ नर्स, एलएचव्ही, लॅब टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, मेडिकल ऑफिसर (एल २, एल ३), अॅनेस्थेसिया स्पेशालिस्ट, गायनिक, सपोर्ट स्टाफ, अटेंडन्स, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर आयुष, पेड्रिटिशियन, फिजिशियन, डेंटल टेक्निशियन व इतर पदांचा समावेश आहे. यातील बहुतांश पदे ही जिल्हा परिषदेचे सीईओ व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत भरण्यात येतात. ११ महिन्यांची कंत्राटी पदे असली, तरी नंतर सेवेला एक दिवसाचा ‘ब्रेक’ देत सेवा पूर्ववत केली जाते; परंतु या पदांना मनुष्यबळ मिळत नाही की पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी कासवगती आहे, ही बाब अस्पष्ट आहे. एकट्या विदर्भात १,८०४ पदे रिक्त आहेत. याशिवाय आरोग्य विभागाच्या आठ मंडळांमध्ये चार पदे, मनपाच्या अखत्यारीतील दवाखान्यांमध्ये २१० पदे, एफडब्ल्यूटीसी १८ व एसटीडीसीमध्ये १९ व एसएचएस रुग्णालयांमध्ये ९०९ पदे रिक्त आहेत. ठाणे जिल्ह्यात ३४२, रायगड २१०, पालघर १२४, नाशिक २२०, धुळे ९९, नंदुरबार १५२, जळगाव १७१, अहमदनगर २६३, पुणे ३७३ रिक्त पदांचा समावेश आहे. अकोला १०६, अमरावती ३४९, बुलढाणा २२८, वाशीम ११८, यवतमाळ १२२, नागपूर १६३, वर्धा ४३, भंडारा १४१, गोंदिया २१, चंद्रपूर २०४, गडचिरोली २३९, अशी एकूण १,८०४ पदे एकट्या विदर्भात भरली गेली नाहीत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App