राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरती पुन्हा सुरू होणार ! वाचा सविस्तर माहिती
Non-Teaching Staff Recruitment Returns!
राज्यातल्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे. तब्बल २००५ सालापासून बंद असलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत शासनस्तरावरून मिळाले आहेत. क्लर्क (लिपिक), ग्रंथपाल (लायब्रेरियन), आणि प्रयोगशाळा सहाय्यक (लॅब असिस्टंट) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवरील भरतीची वाट तब्बल २५ वर्षांपासून पाहिली जात होती.
आता ही भरती पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार असल्याने, शाळांमधील व्यवस्थापनाला मोठा आधार मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या शिक्षकांवर टाकण्यात येणाऱ्या शिक्षकेतर जबाबदाऱ्या देखील कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
काय मंजूर झालंय?
राज्य सरकारने खासगी अनुदानित शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात सुधारित आकृतीबंध (Revised Staffing Pattern) लागू केला आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:
- कनिष्ठ लिपिक
- वरिष्ठ लिपिक
- मुख्य लिपिक
- पूर्णवेळ ग्रंथपाल
- प्रयोगशाळा सहाय्यक
या सर्व पदांवर “१०० टक्के नामनिर्देश” (Nomination-Based Recruitment) पद्धतीने भरती केली जाणार आहे. अनुपात तत्त्वानुसार ही पदं वितरित करण्यात येणार असल्यामुळे योग्य संस्थांना त्यांचा हिस्सा मिळेल आणि पारदर्शकतेला चालना मिळेल.