नवीन मुंबई महानगर पालिका नोकरभरती परीक्षा गैरप्रकार; पर्यवेक्षकावर कारवाई- NMMC Exam Admit Card, Hall Ticket Download

NMMC Exam Admit Card Download, Print

नवी मुंबई महापालिकेच्या नोकरीभरतीसाठी राज्यातील २८ केंद्रांवर दुसऱ्या दिवशी १८ हजार ४४२ उमेदवारांनी परीक्षा दिली. यात कोल्हापूरमधील केंद्रावर पर्यवेक्षक उमेदवारास उत्तरे सांगत असल्याचे चित्रीकरणात लक्षात आल्याने त्याला तत्काळ हटवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यावर प्रशासनाच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहे. गुरुवारी दुपारच्या सत्रामध्ये कोल्हापूरमधील एका केंद्रावर पर्यवेक्षकाच्या माध्यमातून उमेदवारांना उत्तरे सांगण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याविषयी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता उमेदवारास दोन ते तीन प्रश्नांची उत्तरे सांगितली जात असल्याचे निदर्शनास आले.

तसेच, या परीक्षेचे सिल्याबस आणि नवीन एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. 

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या प्रकरणी पर्यवेक्षकास तत्काळ हटविले आहे. महापालिकेच्या समन्वय अधिकाऱ्याने परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेलाही संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल केला जात आहे. पहिल्या दिवशी २१ हजार ११५ जणांनी, तर दुसऱ्या दिवशी १८ हजार ४४२ जणांनी परीक्षा दिली आहे. १२ जिल्ह्यांमध्ये २८ केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये ६२२३, दुपारच्या सत्रात ६२३४ व सायंकाळच्या सत्रामध्ये ५९८५ जणांनी परीक्षा दिली आहे.

 

 

नवीन मुंबई महानगरपालिकेच्या ६६८ पदांसाठी ८४ हजार ७७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. (NMMC Exam Admit Card Download, Print) या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत. प्रवेशपत्र लिंक सुरु झाली आहे. खालील लिंक वरून उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. तसेच हि परीक्षा निर्विघ्न, सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून प्रत्येक केंद्रांवर पोलिस बंदोबस्त देण्याची विनंती केली. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान काही समाजकंटक उमेदवारांना खोटी आश्वासने देऊन आर्थिक फसवणूक करण्याचा धोका संभवतो. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार लेखी परीक्षा पारदर्शक, शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त उपलब्ध केला जाईल.

 

 

NMMC Exam Date Details

या परीक्षेचे सिल्याबस आणि नवीन एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हानिहाय केंद्रांची यादी, परीक्षा दिनांक, वेळ व आवश्यक मनुष्यबळाबाबत लवकरच कळविण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेत ३० संवर्गातील ६६८ पदांचा समावेश आहे. यामध्ये लिपिक टंकलेखक (१३५), स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (१३१), लेखा लिपिक (५८), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (५१), एएनएम (३८), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३५), वॉर्डबॉय (२९), कक्ष सेविका/आया (२८), शस्त्रक्रियागृह सहायक (१५), आरोग्य सहायक महिला (१२), औषध निर्माता (१२), वैद्यकीय समाजसेवक (१५) आदी पदांचा समावेश आहे.

भरती प्रक्रियेबाबत दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून उमेदवारांनी सावध राहावे, तसेच भरतीसंदर्भातील अधिकृत आणि अचूक माहितीसाठी नवी मुंबई पालिकेच्या अधिकृत वेबसाइट तसेच फेसबुक, द्विटर आणि इन्स्टाग्राम पेजला भेट देण्याचे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड