NIOS बोर्डाचे दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जारी
NIOS Exam Time Table
NIOS Exam Time Table : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. एनआयओएसच्या अधिकृत संकेतस्थळावर nios.ac.in येथे हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
एनआयओएसची ही परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२० मध्ये होणार होती. पण ती स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार आहे.
संस्थेने जाहीर केलेल्या एनआयओएसच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा २२ जानेवारीपासून सुरू होतील आणि पहिला पेपर संस्कृत विषयाचा असेल. त्याच वेळी, शेवटचा व्यवसाय अभ्यास पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षा २२ जानेवारी पासून हिंदुस्थानी संगीत पेपरपासून सुरू होतील आणि शेवटी रोजगार कौशल्य आणि कर्नाटक संगीत पेपर १५ फेब्रुवारी रोजी होईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यावहारिक डेटाशीट जाहीर केले
प्रॅक्टिकल परीक्षा कधी?
- दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १४ जानेवारीपासून सुरू होतील आणि २५ जानेवारी २०२१ पर्यंत चालतील.
- जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ परीक्षेसाठी १० डिसेंबरपर्यंत नोंदणी
या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी व्हायचे आहे, ते अधिकृत संकेतस्थळ sdmis.nios.ac.in द्वारे परीक्षा शुल्क भरून नोंदणी करू शकतात.
एनआयओएस दहावी, बारावी वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
Important Links For NIOS Exam Time Table | |
निकाल कधी?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने म्हटले आहे की अंतिम परीक्षेनंतर जवळजवळ ६ आठवड्यांनी निकाल जाहीर केला जाईल.