नवीन आयकर नियम एप्रिल 2025 पासून लागू – जाणून घ्या महत्त्वाचे बदल! | New Tax Rules 2025
New Tax Rules 2025
मित्रांनो, नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे, या आगामी 1 एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2025) टीडीएस (TDS) संदर्भातील नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये लाभांश उत्पन्न, लॉटरी, ब्रोकरेज, डिजिटल मालमत्तांची विक्री, भाडे, आणि व्यावसायिक सेवांवरील कर आकारणीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. चला तर माहिती घेऊया काय महत्वाचे बदल होत आहेत आणि नेमके आपण काय करायला पाहिजे!
टीडीएस कपातीची मर्यादा वाढली – गुंतवणूकदारांना मोठा फायदा!
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटीच्या सीए किंजल भुटा यांनी सांगितले की, टीडीएस कपातीची मर्यादा पूर्वीच्या ₹5000 वरून ₹10,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा थेट फायदा लाभांश मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि कंपन्यांना करसंबंधी नियमांचे पालन करणे सुलभ होईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लॉटरी आणि रेसवरील टीडीएस नियमांमध्ये बदल
आतापर्यंत लॉटरी आणि रेसमधून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आर्थिक वर्षभरात ₹10,000 ची मर्यादा होती, मात्र नवीन नियमांनुसार ही मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी ₹10,000 करण्यात आली आहे. याचा फायदा मोठ्या व्यवहार करणाऱ्या नागरिकांना होणार असून टीडीएस कपात कधी लागू होईल, हे अधिक स्पष्ट होणार आहे.
ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय
ऑनलाइन गेमिंग उद्योग वेगाने वाढत असताना कर कपातीचे नियमही सुधारण्यात आले आहेत. आता एका व्यवहारात ₹10,000 पेक्षा कमी रकमेचे बक्षीस जिंकले, तर टीडीएस कपला जाणार नाही. यापूर्वी वर्षभरात एकूण ₹10,000 पेक्षा जास्त जिंकल्यास टीडीएस लागू होत असे, मात्र नवीन नियमानुसार प्रत्येक स्वतंत्र व्यवहारावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा फायदा – बँक व्याजावरील नियमांमध्ये बदल
वरिष्ठ नागरिकांना बँकेच्या मुदतठेवी (Fixed Deposit) आणि व्याज उत्पन्नावर दिलासा देण्यात आला आहे. आतापर्यंत ₹50,000 पेक्षा जास्त व्याज उत्पन्न असल्यास टीडीएस कपात केली जात होती, मात्र आता ही मर्यादा ₹1 लाख करण्यात आली आहे. याचा फायदा निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होईल.
डिजिटल मालमत्तेवरील कर कपातीचे नवे नियम
डिजिटल युगात क्रिप्टोकरन्सी, NFT, आणि इतर डिजिटल मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. डिजिटल मालमत्तांच्या विक्रीवर TDS कपातीसाठी विशिष्ट मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या कर कपातीसंदर्भातील नियोजन अधिक स्पष्टपणे करता येईल.
व्यावसायिक सेवांवरील कर नियमांमध्ये सुधारणा
स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या आणि विविध व्यावसायिक सेवांवर टीडीएस आकारणीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार करपात्र उत्पन्नाच्या मर्यादा सुधारण्यात आल्या असून, त्याचा फायदा छोट्या व मध्यम व्यवसायांना होणार आहे.
नवीन नियमांमुळे सर्वसामान्यांना कसा फायदा होईल?
- शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी लाभांशावर अधिक फायदा.
- लॉटरी आणि रेसवरील उत्पन्नासाठी स्पष्टता मिळणार.
- ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना कमी कर कपात.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याज कर कपातीच्या मर्यादा वाढवल्या.
- डिजिटल मालमत्ता गुंतवणूकदारांसाठी सुलभ कर प्रणाली.
- व्यावसायिक सेवांवरील करसंबंधी नियम सुधारले.
1 एप्रिल 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून, सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांसाठी हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.