तयारीला लागा! नव्या वर्षात कंपन्यांमधील नाेकरभरतीला येणार वेग
New Job Opportunities 2021
New Job Opportunities 2021 : काेराेना महामारीमुळे अनेकांच्या राेजगारावर संकट आले. नव्या नाेकरीच्या संधीही कमी हाेत्या. मात्र, नव्या वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. अनेक कंपन्या २०२१ या वर्षामध्ये कर्मचारी संख्या वाढविण्याच्या विचारात आहेत.
व्यावसायिक भरती सेवा उपलब्ध करणारी कंपनी मायकल पेज इंडियाच्या ‘टॅलेंट ट्रेंड्स २०२१’ या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समाेर आली आहे. सुमारे ५३ टक्के कंपन्या कर्मचारी संख्या वाढविण्याच्या तयारीत आहेत. काेराेनामुळे संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी, राेजगाराचे माेठे संकट निर्माण झाले. नाेकरभरतीमध्ये १८ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मात्र, नव्या वर्षात दिलासादायक चित्र अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेमध्ये हळूहळू सुधारणा हाेत आहे. त्यामुळे नाेकरभरतीला लवकरच सुरुवात हाेण्याची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
काेराेना काळात लस उत्पादक कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती केली. येणाऱ्या काळातही या क्षेत्रात मागणी राहणार असल्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. आराेग्य क्षेत्रातीलतपासणी, औषध निर्मिती कंपन्यांमध्ये नाेकरभरतीतील वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे ;आराेग्य आणि औद्याेगिक क्षेत्रात समाधानकारक नाेकरभरतीची अपेक्षा आहे. याशिवाय इंटरनेटवर आधारित व्यवसायांमध्येही मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. ई-काॅमर्स, तसेच शैक्षणिक क्षेत्रात दिलासादायक चित्र राहण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण सर्वेक्षणात नाेंदविले आहे.
नव्या नाेकरीच्या संधींसाेबत वेतनामध्येही १५ ते २० टक्के वाढीची अपेक्षा आहे. त्यातही आराेग्य क्षेत्रामध्ये ही शक्यता जास्त असून, या क्षेत्रातील कंपन्या जवळपास महिनाभराचा पगार बाेनस स्वरूपात देण्याच्या तयारीत असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे.तंत्रज्ञान क्षेत्रातील ७४ टक्के कंपन्या मनुष्यबळ वृद्धीच्या तयारीत आहेत. यात सुमारे १४ टक्के वाढ दिसू शकते. विशेष म्हणजे, ‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पनेतून काम करण्यासाठी तयार असलेल्यांना जास्त संधी आहेत.
सोर्स : लोकमत
Central government Driving job ahe ka
I’m service person Indian army
I’m retired 31 December 21
I am apply for police bharti
Job chi garj aahe mala
Hi sir
I have job .I have done my hospital yte
certificate.