1 डिसेंबरपासून सुरू होणार इंजिनीअरिंगचे वर्ग
New Academic Session For Engineering Students Begins From 1st December 2020
New Academic Session For Engineering Students Begins From 1st December 2020 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ची मान्यता असलेल्या संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेचा आजचा अखेरचा दिवस आहे. इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे नवे सत्र मंगळवार १ डिसेंबर २०२० पासून सुरू होत आहे.
एआयसीटीईच्या वेळापत्रकानुसार, सेकंड इयर डायरेक्ट इंजिनीअरिंग प्रवेशांचा देखल सोमवार ३० नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. इंजिनीअरिंगसह, डिप्लोमा, फार्मसी, आर्किटेक्चर आणि परिषदेच्या अखत्यारीतील इतर अभ्यासक्रमांसाठीही हेच वेळापत्रक लागू राहील, असे एआयसीटीईने स्पष्ट केले होते.
‘देशातील करोना स्थितीमुळे अनेक राज्य सरकारांनी आणि आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती,’ असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, इंजीनिअरिंगचे वर्ग ऑनलाइन, ऑफलाइन किंवा दोन्ही संमिश्र प्रकारे घेता येईल. त्यासाठी एआयसीटीईने SOP देखील जारी केले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर झाला आहे. याबाबत परिषदेने १ नोव्हेंबरपासून प्रथम वर्ष इंजिनीअरिंगचे वर्ग सुरू करण्यातबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, अनेक राज्यांच्या प्रवेशपरीक्षा पार पडलेल्या नव्हत्या. तसेच ज्यांच्या प्रवेशपरीक्षा झाल्या आहेत, त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नव्हते. यामुळे प्रवेशप्रक्रिया खोळंबल्या होत्या. परिणामी १ नोव्हेंबरपासून प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होणे अवघड आहे. परिणामी हे वर्ग आता १ डिसेंबरपासून सुरू करावेत, असे आदेश परिषदेने दिले होते. सर्व इंजिनीअरिंग कॉलेजे, तसेच आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेश ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले होते.
सोर्स : म. टा.