NEET PG Exam 2021 : कोविड सुरक्षा गाइडलाइन्स जारी

NEET PG Exam 2021

NEET PG Exam 2021 – Covid safety guidelines have been issued by the National Board of Examination for NEET PG 2021 exam. The exam is scheduled for April 18th. It is mandatory to follow the health precautionary instructions at the time of examination. 

NEET PG Exam 2021 : कोविड सुरक्षा गाइडलाइन्स जारी – NEET PG 2021 परीक्षेसाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमार्फत कोविड सुरक्षा गाइडलाइन्स जारी करण्यात आले आहेत. १८ एप्रिल रोजी हि परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या वेळेस आरोग्यविषयक खबरदारीच्या सूचना पाळणे बंधनकारक आहे.

परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसार होईल. NEET PG 2021 परीक्षेचे नियोजन सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी आरोग्यविषयक खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवासासाठी त्यांचे NEET PG अॅडमिट कार्ड एक COVID E-PASS सारखे देखील काम करेल. सर्व राज्यांना यासंबंधी सूचित केले जात आहे.

गाइडलाइन्स

 • परीक्षा केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येण्यासाठी ठराविक वेळ नेमून दिली जाणार आहे.
 • हा वेळेचा स्लॉट उमेदवारांना ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वरुपात सूचित केला जाईल.
 • थर्मल गनचा उपयोग करून प्रवेशद्वारावर उमेदवारांचे तापमान तपासले जाईल.
 • सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान असलेल्या COVID -19 संक्रमणाचे कोणतेही लक्षण आढळल्यास त्या उमेदवारांना स्वतंत्र आयसोलेशन रूममध्ये परीक्षा देण्याची परवानगी असेल.
 • उमेदवारांना फेस मास्क शिवाय परीक्षा केंद्रांवर प्रवेश करण्याची अनुमती नसेल.
 • सर्व उमेदवारांना एक सुरक्षा गियर सुरक्षा किट दिले जाईल, यात एक फेस शील्ड, एक फेस मास्क आणि फाइव हँड सॅनिटाइजर पाउच असेल.
 • सर्व उमेदवारांना परीक्षेवेळी फेस शील्ड घालणे अनिवार्य असेल.
 • परीक्षा संपल्यावर उमेदवारांनी परीक्षा केंद्रांतून बाहेर पडताना गर्दी टाळावी लागेल, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल.

नीट पीजीचे प्रवेश पत्र 12 एप्रिलला होणार जाहीर!!

NEET PG Exam 2021  : Candidates can download their tickets from nbe.edu.in. The board will upload the admission letter to its website on April 12, 2021, NEET said. He also said that the applications of candidates whose applications were not accepted for any reason will not be issued.

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तरचे (NEET PG 2021) प्रवेशपत्र देणार आहे. ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर (nbe.edu.in.) जावून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. दरम्यान, बोर्ड 12 एप्रिल 2021 रोजी आपल्या वेबसाइटवर प्रवेश पत्र अपलोड करणार असल्याचे NEET ने सांगितले आहे.

एनबीईनुसार, प्रवेश पत्र ऑनलाइन अपलोड करण्याची माहिती उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर, एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल. NBE उमेदवारांना प्रवेश पत्र पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांचे अर्ज कोणत्याही कारणास्तव स्वीकारले गेले नाहीत, अशा उमेदवारांची प्रवेशपत्रे दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


नीट पीजी 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रियेस सुरुवात

NEET PG Exam 2021  : neet pg 2021 registration begins today – नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET PG 2021) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. NEET PG 2021 ची नोंदणी लिंक दुपारी 3 वाजता कार्यान्वित झाली आहे आणि NEET PG 2021 साठी ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२१ आहे. एमडी / एमएस / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर nbe.edu.in यावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

परीक्षा कधी घेतली जाईल?

नीट पीजी २०२१ परीक्षा १८ एप्रिल रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल. ३१ मे पर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

नीट पीजी २०२१ साठी पात्रता

उमेदवारांकडे नीट पीजी २०२१ साठी पात्र होणअयासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेचे MBBS पदवी (तात्पुरती किंवा कायमस्वरूपी) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

याशिवाय, उमेदवारांकडे एमसीआय किंवा राज्य वैद्यकीय परिषदेने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र देखील असले पाहिजे. नीट पीजी २०२१ उमेदवारांनी ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केली असली पाहिजे.

नीट पीजी प्रवेश परीक्षेद्वारे १०,८२१ मास्टर ऑफ सर्जरी (एमएस), १९,९५३ डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) आणि १,९७९ पीडी डिप्लोमा जागांवर ६,१०२ शासकीय, खासगी, डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो.


NEET PG Exam 2021  : NEET PG 2021: नीट पीजी २०२० परीक्षेच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) लवकरच या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. बोर्ड परीक्षेसाठी अर्ज nbe.edu.in वर उपलब्ध करणार आहे. त्यानंतर उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी ही परीक्षा संगणक आधारित असेल. एनबीईने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, जे विद्यार्थी ३० जून २०२१ रोजी वा त्यापूर्वी आपली इंटर्नशीप पूर्ण करतील, तेच पीजी परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टल nbe.edu.in किंवा natboard.edu.in ला भेट द्यावी लागेल.

नीट पीजीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे NMC द्वारे मान्यताप्राप्त संस्थेची प्रोव्हिजनल वा स्थायी MBBS डिग्री असणे अनिवार्य आहे. तसेच एमसीआय द्वारे किंवा राज्य चिकित्सा शिबीराद्वारे जारी प्रोव्हिजनल किंवा स्थायी नोंदणी प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त नीट पीजी २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी आपली एक वर्ष कालावधीची इंटर्नशीप पूर्ण केलेली असावी. NEET PG 2021 परीक्षेचे आयोजन मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसीन आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी केले जात आहे.

परीक्षेत मागील वर्षी १,६७,१०२ उमेदवारांनी नोंदणी केली होती, यापैकी १,६०,८८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे. परीक्षेचा कालावधी साडेतीन तासांचा असेल. एकूण ३०० एमसीक्यू प्रश्न विचारले जातील. परीक्षेत नकारात्मक मूल्यांकन असेल. परीक्षेची भाषा इंग्रजी असेल. या परीक्षेत प्री-क्लिनिकल, क्लिनिकल, पॅरा-क्लिनिकल विषयांसह एमबीबीएस अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


NEET PG Exam Date 2021: NEET PG exam 2021 date declared by NBE, exam will be conducted on 18th April – नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NTA) ने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेची अर्थात NEET PG परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत संकेतस्थळ nbe.edu.in आणि ntaboard.edu.in वर परीक्षेच्या तारखेसंदर्भात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

नीट पीजी २०२१ परीक्षेचे आयोजन १८ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा संगणकीकृत असेल. या परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि परीक्षा देण्यासाठी काय पात्रता आवश्यक यासंबंधीची माहिती जाणून घ्या…

NEET PG eligibility

 • मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (MCI) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून नियमित एमबीबीएस (MBBS) पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
 • एमसीआय किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलद्वारे दिलेले प्रोव्हिजनल किंवा परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असावे.
 • मेडिकलच्या पीजी कोर्समध्ये अॅडमिशनसाठी उमेदवारांना ३० जून २०२१ पर्यंत मेडिकल यूजी इंटर्नशीप पूर्ण करणे आवश्यक आहे.

नीट पीजी परीक्षेचा पॅटर्न (NEET PG Exam Pattern)

 • परीक्षा संगणकीकृत असेल.
 • परीक्षेचा कालावधी ३.३० तासांचे असेल.
 • ३०० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारले जातील.
 • योग्य उत्तरासाठी प्रत्येकी ४ गुण दिले जातील तर अयोग्य उत्तरासाठी एक गुण कापला जाईल.
 • परीक्षेची भाषा इंग्रजी असेल.
 • प्री-क्लिनिकल, क्लिनिकल, पॅरा-क्लिनिकल विषयांसह एमबीबीएस अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जातील.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन NBE ने सांगितले की करोना स्थितीनुसार परीक्षेच्या तारखेत बदलही होऊ शकतो. या परीक्षेद्वारे देशातील ६,१०२ संस्थांमध्ये एकूण १०,८२१ मास्टर ऑफ सर्जरी (MS), १९,९५३ डॉक्टर ऑफ मेडिसीन (MD) आणि १,९७९ डिप्लोमाच्या जागांवर प्रवेश मिळतो. यात ५० टक्के जागा ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात, तर उर्वरित ५० टक्के जागा या स्टेट कोट्यातील असतात.

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड