JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

NEET विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा धक्का! ३ मे ची ‘नीट’ परीक्षा रद्द; आता पुन्हा द्यावी लागणार परीक्षा, NTA चा निर्णय – NEET 2026 Exam Cancelled

NEET 2026 Exam Cancelled – वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी ही परीक्षा देशभरात पार पडली होती, मात्र भारत सरकारच्या परवानगीनंतर आता ती अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुन्हा होणाऱ्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे एनटीएकडून सांगण्यात आले आहे. परीक्षा रद्द होण्यामागचे नेमके कारण आणि पुढील प्रक्रियेबाबत विद्यार्थी आता अधिकृत माहितीच्या प्रतीक्षेत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २०२६ ची ‘नीट यूजी’ परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहेत. भारत सरकारच्या परवानगीनंतर नीट यूजीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा ३ मे २०२६ रोजी घेण्यात आली होती. दुसऱ्यांदा होणाऱ्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.NEET 2026 Exam Cancelled

देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

सीबीआय आता या पेपरफुटीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपास करणार आहे. दुसरीकडे, ‘एनटीए’ लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर करेल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आपल्या अभ्यासाचे नियोजन पुन्हा एकदा नीट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विविध तपास यंत्रणांकडून प्राप्त झालेले अहवाल आणि पुराव्यांच्या आधारे, एनजीएने (NTA) केंद्र सरकारच्या मान्यतेने ३ मे २०२६ रोजी झालेली ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची प्रक्रिया आता ग्राह्य धरली जाणार नाही. फेरपरीक्षेच्या तारखा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होणाऱ्या त्रासाची संस्थेला जाणीव आहे. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे हे शैक्षणिक व्यवस्थेसाठी अधिक घातक ठरले असते, असे NTA ने स्पष्ट केले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

NEET Re Exam Fees Details 

नोंदणी: मे २०२६ च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेली नोंदणी आणि निवडलेली परीक्षा केंद्रे फेरपरीक्षेसाठी कायम राहतील.

फी: विद्यार्थ्यांना कोणतीही नवीन नोंदणी करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेली फी परत (Refund) केली जाईल आणि फेरपरीक्षेचा खर्च NTA स्वतःच्या अंतर्गत निधीतून करेल. परीक्षेच्या नवीन तारखा आणि प्रवेशपत्राचे (Admit Card) वेळापत्रक केवळ NTA च्या अधिकृत चॅनेलवरूनच प्रसिद्ध केले जाईल. सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आले आहे.

NEET

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड