NEET UG 2020 परीक्षेची तारीख जाहीर, ‘इथं’ पहा पूर्ण वेळापत्रक !
एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET २०२०) ने परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. पुढील वर्षी ३ मे (रविवारी) रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) घेईल. एनटीएकडून नीट परीक्षा घेण्यात येत असताना ही दुसरी वेळ आहे.
वेळापत्रक :
परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू होईल आणि ३१ डिसेंबर रोजी बंद होईल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर अर्ज करू शकतात. ही परीक्षा पेपर आणि पेन मोडमध्ये म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेचे प्रवेश पत्र २७ मार्च रोजी जाहीर केले जाईल. तर याचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
एनईई परीक्षेचा पॅटर्न कसा असेल :
नीट परीक्षा १ तासाची असेल. यामध्ये तीन विभाग असतील. या तीन विभागात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांचा समावेश असेल. पेपर १८० गुणांचा असेल, ज्यामध्ये प्रत्येक विभाग ४५ गुणांचा असेल. संबंधित विषयातील अभ्यासक्रम इयत्ता ११ वी आणि १२ वी च्या सर्व मानक एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतीळ अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तराला अधिक चार गुण मिळतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला गुण वजा केले जातील (नकारात्मक चिन्हांकन) मिळेल. तसेच, आपण प्रश्न न सोडवल्यास तेथे मात्र नकारात्मक चिन्हांकन होणार नाही.