१२वी उत्तीर्णांसाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ; करा ऑनलाईन अर्ज !-Navy Recruitment – Golden Chance!
Navy Recruitment – Golden Chance!
देशसेवेची इच्छा बाळगणाऱ्या आणि नौदलात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! भारतीय नौसेनेत वरिष्ठ माध्यमिक भरती (वैद्यकीय) अंतर्गत वैद्यकीय शाखेत ‘नाविक’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून १० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे – joinindiannavy.gov.in
भरती कुठ्या तुकड्यांसाठी?
ही भरती विशेषत: खालील तीन तुकड्यांसाठी घेतली जात आहे:
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- ०२/२०२५
- ०१/२०२६
- ०२/२०२६
यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नौसेनेच्या वैद्यकीय शाखेत नाविक पदावर सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराने खालील अटी पूर्ण केलेल्या असाव्यात:
- १२वी उत्तीर्ण असणे अनिवार्य (भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त बोर्डातून).
- विषय: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अनिवार्य.
- एकूण गुण: किमान ५०%
- प्रत्येक विषयात किमान ४०% गुण आवश्यक.
- सध्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये १२वीची परीक्षा देणारे विद्यार्थी देखील या भरतीसाठी पात्र आहेत.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
- अधिकृत संकेतस्थळ: joinindiannavy.gov.in
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० एप्रिल २०२५, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
अधिक माहिती कुठे मिळेल?
या भरतीसंदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास, उमेदवारांनी पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) स. दै. हंगे यांनी इच्छुक उमेदवारांना हे आवाहन केलं आहे की, संधीचे सोने करा आणि वेळेत अर्ज करा!