देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत !
Nationwide Lockdown For 2 Weeks
देशातील लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवला आहे. (Centre Extends Nationwide Lockdown For 2 Weeks) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता 4 मे ते 17 मेपर्यंत लॉकडाऊन असेल. गृहमंत्रालयाने याबाबतची घोषणा केली. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. येत्या तीन मेपर्यंत देशात लॉकडाऊन होता. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला.
रेड झोनमध्ये काय सुरु काय बंद?
- सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सीवर बंदी
- दोन जिल्ह्यांमध्ये होणारी बस वाहतूक बंद.
- केशकर्तनालय दुकाने, स्पा बंद
- रेड झोनमध्ये परवानगी घेऊन चारचाकीमध्ये दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा असेल.
- अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने रेड झोनमध्ये बंद राहतील. मात्र कॉलिनीमध्ये असणारी दुकाने उघडी ठेवणाची परवानगी आहे.