नाशिक शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू! – Nashik Shikshak Bharti 2024
Nashik Shikshak Bharti 2024
Nashik Shikshak Bharti 2024
Nashik Shikshak Bharti 2024: The Director of Primary and Secondary Education has issued a circular for the recruitment of teachers in primary, secondary and higher secondary schools through the holy portal. So, this recruitment has got the green signal. Accordingly, Zilla Parishad’s Secondary Education Officer Pravin Patil has issued a letter to the private educational institutions in the district, giving instructions and the work of registration on the holy portal has started. (Registration on pavitra portal for teacher recruitment has started nashik news) The government had conducted the Teacher Aptitude and Intelligence Test in February to fill up the vacant posts of teachers in the state. The candidates who appeared for the exam have completed the self-certificate required for recruitment to the post on the holy portal for Nashik Shikshak Bharti 2024. All managements, including local bodies, are required to get the point names of the teacher category certified by the Assistant Commissioner Backward Class Cell.
पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरतीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांना पत्र काढत सूचना दिल्या असून, पवित्र पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू झाले आहे. (Registration on pavitra portal for teacher recruitment has started nashik news) राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारीत घेतली होती. या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदू नामावली सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्त शिक्षक पदांची मागणी पोर्टलवर करण्यात यावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत परिपत्रकामध्ये सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खासगी शैक्षणिक कक्ष व्यवस्थापनाची असेल. खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी संस्थांच्या जिल्ह्यामध्ये नोंदणी झाली आहे. त्या जिल्ह्याचे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी पोर्टलवरील जाहिरातीला परवानगी द्यावी.
संबंधित विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्यास संबंधित व्यवस्थापनाने भरलेली विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कारणासह संबंधित शिक्षणाधिकारी यांनी अमान्य करावी. खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती, असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. खासगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांना मुलाखतीशिवाय पदभरती हा एकच पर्याय निवडणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील खासगी अनुदानित बिगरअल्पसंख्याक संस्थांच्या पवित्र पोर्टलवर नोंदणीचे काम सुरू झालेले आहे.
त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील संस्थांनी तत्काळ मागासवर्ग कक्ष यांचे कडून २०२२-२३ च्या संच मान्यतेच्या आधारे अद्ययावत तपासलेले बिंदू नामावली अपलोड करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
“ज्या संस्थांनी अद्याप या कार्यालयाकडून बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी केलेली नाही, त्यांनी तत्काळ २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदांची बिंदू नामावली तयार करून मागासवर्ग कक्ष नाशिककडून अंतिम तपासणी करून पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी. रोस्टरची पवित्र पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर मग विषयनिहाय जागा नोंदवाव्या लागतात. त्या वेळी जिल्ह्यात त्या विषयाचे उपलब्ध असलेले अतिरिक्त शिक्षक यांचा विचार करून विषयनिहाय रिक्त जागा अप्रूव्ह करण्यात येतील.” – प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद
शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील शासन स्तरावरुन प्राप्त यादीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी खालील नियोजनाप्रमाणे आयोजित केलेली आहे.
1) गट इ. 6 वी ते 8 वी (विज्ञान / गणित ) साठी यापुर्वीच्या पडताळणी वेळी गैरहजर, पेसा क्षेत्र NO केलेले, प्रतिबंधित, समांतर आरक्षणास पात्र तसेच उर्वरित उमेदवारांची गुणवत्तेनुसार यादी सोबत जोडण्यात आली आहे.
2) गट इ. 1 ली ते 5 वी साठी यापुर्वीच्या पडताळणी वेळी गैरहजर, तसेच पेसा क्षेत्र NO केलेले, प्रतिबंधित, समांतर आरक्षणास पात्र असेलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार यादी सोबत जोडण्यात आली आहे. सदर यादीतील उमेदवारांनी सोबत दिलेल्या तपासणी सुचीप्रमाणे सर्व मूळ कागदपत्र व स्व-साक्षाकिंत छायांकित प्रतीचा एक संच, सोबतच्या नमुन्यातील स्व-घोषणापत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तसेच एक पासपोर्ट साईज फोटोसह दिलेल्या दिनांक व वेळस उपस्थित रहावे.
Nashik Pesa TAIT Shikshak Bharti Selection List
Download List Of Selected Candidates for Nashik Pesa Shikshak Bharti
Nashik Shikshak Bharti 2023
Nashik Shikshak Bharti 2023: The document verification Process of candidates in the teacher recruitment process under the Education Department Primary Zilla Parishad Nashik is organized as per the following schedule. As per the schedule, candidates should attend DV Process with all the original documents and a set of self attested photocopies and the following sample documents.
As per the schedule for recruitment to the post of teacher in tribal block (PESA) area of the district, the primary education department on Saturday verified the documents of more than 200 graduate candidates who qualified in the list Nashik Shikshak Bharti 2023. Candidates with imperfections and absences will be given another chance. Primary Education Officer Nitin Bachhav said the documents of 300 candidates will be verified on Monday.
जिल्ह्यातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षक पदभरतीच्या वेळापत्रकानुसार शनिवारी (ता.१६) शासकीय कन्या शाळेत प्राथमिक शिक्षण विभागाकडून यादीतील पात्र ठरलेल्या दोनशेहून अधिक पदवीधर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यात अपूर्णता असलेल्या, गैरहजर असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. सोमवारी (ता.१८) तीनशे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पहिल्या टप्यात पदवीधर शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. सोमवारी पदवीधर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यासाठी तीनशे उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. शनिवारी गैरहजर असलेल्यांना २० सप्टेंबरनंतर पडताळणीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.
List Of Documents Required For Nashik Shikshak Bharti 2023
1. शैक्षणिक कागदपत्र
2. स्थानिक पेसा अंतर्गत रहिवासी दाखला ( सक्षम प्राधिकारी यांचा)
3. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
4 संगणक प्रमाणपत्र
5 TET / CAT/ TAIT / गुणपत्रक / प्रमाणपत्र
6. शिक्षक अभियोग्यता
7. आधार कार्ड / पॅनकार्ड
8. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
9. एक पासपोर्ट साईज फोटो
Schedule OF Nashik Education Department Document Verification
दिनांक | वेळ | स्थळ |
15/9/2023 | स. 11.00 वा | जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक |
Download List Of Candidates Selection For Nashik PESA Shikshak Bharti 2023
Job opportunities are going to increase further for future teachers. Teacher recruitment has been closed for many years. Moreover, since the implementation of Pavitra Portal 2017, teachers have not been recruited.
नाशिक विभागातील बी.एड. आणि डी. एड. झालेल्या उमेदवारांसाठी लवकरच गुड न्यूज येणार आहे. महिनाभरात संचमान्यतेनंतर किमान साडेसात ते आठ हजार जागा नाशिक विभागात रिक्त होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली. त्यामुळे बी.एड. व डी.एड. होणाऱ्या भावी शिक्षकांसाठी यापुढे नोकरीच्या संधी वाढणार आहेत. अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. शिवाय पवित्र पोर्टल २०१७ लागू झाल्यापासून शिक्षक भरती झालेली नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
त्यामुळे अनुदानित शाळेतील शिक्षकांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. इंग्रजी माध्यमाकडे मुलांचा शिकण्याचा कल असल्यामुळे अनेक तुकड्या सध्या कमी होत आहेत. शिवाय लाखोने डी. एड. व बी. एड. झालेले भावी शिक्षक सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये किमान आठ हजार जागा रिक्त होतील, असा अंदाज शिक्षण उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. यामुळे होणाऱ्या संभाव्य इच्छुक शिक्षकांना सुगीचे दिवस येणार आहेत.
जिल्हा परिषदेसह खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक विभागात जागा रिक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर माध्यमिक स्तरावर मध्यम आहे. निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागी अनेक संस्थांनी मानधन तत्त्वावर शिक्षक भरले आहेत.
Nashik Shikshak Bharti 2023 – The posts of 11 thousand 252 teachers are sanctioned in the district. But there has been no recruitment of teachers for many years and during this period most of the posts of teachers have become vacant due to retirement. As the ban on teacher recruitment in the state is lifted on July 3, 30 thousand teacher posts will be filled in the first phase.
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील रिक्त जागांचा आकृतिबंध तयार करण्याचे काम जोमाने सुरू झाले आहे. १५ तालुक्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे एक हजार १०० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षक भरतीतून बिगरआदिवासी तालुक्यांमधील शिक्षकांचा प्रश्न सुटणार आहे. जिल्ह्यात ११ हजार २५२ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही आणि या काळात सेवानिवृत्तीमुळे शिक्षकांच्या बहुतांश जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यातील शिक्षक भरतीवरील बंदी ३ जुलैला उठल्याने पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात खासगी शिक्षण संस्थांमधील २० हजार पदे भरण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच सांगितले. शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू झाल्यामुळे जिल्ह्यात किती शिक्षकांची आवश्यकता आहे, यादृष्टीने प्राथमिक शिक्षण विभागाने आकृतिबंध तयार करण्यास प्रारंभ केला आहे.
प्रत्येक तालुक्यातून मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षकांची एकूण मंजूर पदे किती व ३ जुलैपर्यंत त्यापैकी किती शिक्षक निवृत्त झाले, किती शिक्षकांची बदली झाली याची माहिती मागविली आहे.
Table of Contents