नागपूर मनपाच्या कोविड सेंटरसाठी डॉक्टर-परिचारिकांची होणार भरती

Nagpur Municipal Corporation Recruitment 2020

Nagpur Municipal Corporation Recruitment 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पाच डेडिकेटेड हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु डॉक्टर व मनुष्यबळ नसल्याने त्याचे संचालन होत नव्हते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली आहे.. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे. कंत्राटी पद्धत, करार आधारावर मानधन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यासाठी ९७.९८ लाख रुपये मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत अहे.

Nagpur Municipal Corporation Recruitment 2020

प्रस्तावांतर्गत फिजिशियन व इन्टेंसिव्ह केअर तज्ज्ञांना ७५ हजार रुपये फिक्स मानधन व इन्सेंटिव्ह १.२५ लाख रुपयापर्यंत दिले जाईल. तज्ज्ञ डॉक्टरांच्या ११ पदांना मंजुरी देण्यात येईल. यात फिजिश्यिन, इन्सेंटिव्ह केअर, अ‍ॅनेस्थेशिया तज्ज्ञ आदींचा समावेश राहील. त्याचप्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयसीयूमध्ये पीपीई किट घालून राहावे लागेल. अशा परिस्थितीत एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीयूएमएस डॉक्टरांना १० हजार रुपये, स्टाफ नर्सला ७ हजार रुपये व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत वॉर्ड बॉयला ३ हजार रुपये अतिरिक्त दिले जातील. दर महिन्याला वेतनावर ३२.६६ लाख रुपये खर्च होईल. आरोग्य विभागाच्या आस्थापना खर्चातून संबंधित निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पद संख्या – Nagpur Municipal Corporation Recruitment 2020

  • स्पेशलिस्ट डॉक्टर ११
  • मेडिकल ऑफिसर ३७
  • हॉस्पिटल मॅनेजर ०५
  • स्टाफ नर्स ११५
  • एक्स रे टेक्निशियन ०५
  • इसीजी टेक्निशयन ०५
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर १०
  • वॉर्ड बॉय ३०

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Aman bhagat says

    Sir me 12 pass aho but mala Pan vad boy madhy kam karchy ahi tr kash karu shkto ha maza number ahi 9325299413

  2. Prashant says

    Wordboy sathi aahe ka job

  3. [email protected] says

    Gnm sathi job aahe Ka mla covid pt chi care kraychi aahe mla aawdel

  4. अभिषेक कोकोडे. says

    वॉर्ड बॉय पदासाठी भरती चालू आहेत क्या सर. असेल तर मी या पदा वर भरती कशा देऊ… कृपया माझा मार्गदर्शन करा…. धन्यवाद

  5. Pavitra Dhoke says

    Anm sathi aahe ka job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड