नागपूर महानगरपालिका फायनल उत्तरतालिका जाहीर, डाउनलोड करा !! – Nagpur Mahanagar Palika answer Key
Nagpur Mahanagar Palika answer Key
जाहिरात क्र.८०४/पी.आर दि.२३.१२.२०२४ अन्वये, नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परिचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी व तसेच स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक या संवर्गातील २४५ रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. २०.०३.२०२५ ते दि.२७.०३.२०२५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. सूचनापत्र आस्थापना क्र.१४ दि.०२.०४.२०२५ अन्वये दि.०३.०४.२०२५ ते दि.०६.०४.२०२५ पर्यंत सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (Objection) विहित शुल्काचा भरणा करुन, नोंदविण्याचे उमेदवारांना सूचित करण्यात आलेले होते.
तसेच ज्या उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांच्या आधारे उत्तर तालीकामध्ये बदल झालेला आहे, त्याबाबतची माहिती या सूचनापत्रासोबत संलग्न केलेली आहे. या अनुषंगाने, 2nd Response Sheet दि. १०.०५.२०२५ रोजी दुपारी ०४.०० वा. नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना 2nd Response Sheet बघायची आहे त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर “Recruitment link वर क्लीक केल्यावर स्वतःचे Registration Number तसेच Password टाकून लॉगीन केल्यानंतरच त्यांना 2Nd Response sheet उत्तरतालिका पाहता येईल. या Response sheet वर उमेदवाराला आक्षेप घेता येणार नाही. तसेच उमेदवारांनी यावर आक्षेप घेतल्यास ते दाखल दप्तर करण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात क्र.८०४/पी.आर दि.२३.१२.२०२४ प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २०.०३.२०२५ ते २७,०३.२०२५ पर्यंत घेण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परिचारीका (जी.एन.एम). वृक्ष अधिकारी व तसेच स्थापत्य अभियांत्रीको सहायक या पदांच्या उत्तरतालिकेची लिक (Answer key PDF DOWNLOAD) मनपा संकेतस्थळावर (www.nmcnagpur.gov.in) भरती या मेन्यूमध्ये दिनांक ०३.०४.२०२५ ते दिनांक ०६.०४.२०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) वापरुन उत्तरतालिका (Answer key PDF) तपासून घ्यावी तसेच (Objection Form) live करण्यात येत आहे.