https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

अग्निशमन विभागात 500 पेक्षा अधिक पदे रिक्त, भरती प्रक्रिया लवकरच अपेक्षित! – Nagpur Fire Brigade Bharti 2025

Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2025

Nagpur Agnishamak Vibhag Bharti 2025

लोकसंख्येच्या अनुपातानुसार २ लाख लोकसंख्येसाठी १ अग्निशमन केंद्राची गरज आहे. अशात उपराजधानीची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यानुसार २० अग्निशमन केंद्रांची आणि १३०० वर कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, सध्या ११ अग्निशमन केंद्रांद्वारे १२० कर्मचाऱ्यांच्या बळावर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अग्निशमन विभागात ८७२ पदे मंजूर असून, कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता आणि कामाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कार्यरत असलेल्या १२० कर्मचाऱ्यांपैकी येत्या दोन महिन्यांत २० कर्मचारी निवृत्त होणार आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून अग्निशमन विभागातील पदभरतीचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने अडवून ठेवला असल्याने कर्मचारीच नाहीत, तर कामे कशी करायची? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते. गेल्या सहा महिन्यांत आगीच्या २०० च्यावर घटना घडल्या असून, रेस्क्यू कॉलही ५०० च्यावर आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

 

भरतीचा प्रस्ताव नगरविकास विभागात धूळखात –  मनपाच्या अग्निशमन विभागात ३५० भरतीची जाहिरातही प्रकाशित झाली होती. महिलांच्या उंचीवरून पेच निर्माण झाल्याने अग्निशमन सेवा शर्तीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव मनपाने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे गेल्या ८ महिन्यांपूर्वी पाठविला होता. परंतु, नगरविकास विभागाच्या लालफितशाहीमुळे हा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. विशेष म्हणजे, नगरविकास विभागाने राज्यातील इतर महानगरांना भरतीची परवानगी दिली. नागपूरची मात्र प्रलंबित ठेवली आहे.

 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2025: शहरात आगीच्या घटनांची संख्या वाढत असतानाही फक्त १३७ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निसुरक्षा केली जात आहे. गेल्या दोन वर्षांत तीन केंद्र वाढले आणि चौथे केंद्र सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असतानाही ती भरली जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शहराची लोकसंख्या वाढत असल्याने ४० अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र, शहरात केवळ ११ केंद्र आहेत.

कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण

दोन वर्षांआधी ८ केंद्र होते. वाठोडा वाडी आणि त्रिमूर्तीनगर येथे नव्याने  केंद्र सुरू करण्यात आले पाचपावली येथे एक केंद्र सुरू केले जात आहे. मात्र या केंद्राला लागणारे मनुष्यबळ नाही. कामाचा ताण वाढत असल्यामुळे काम करणे कठीण झाल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. महापालिकेत ४७० पदे असून गेल्या दोन वर्षात केवळ २० पदे भरण्यात आली. ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. या वर्षात उर्वरित पदे भरली जाणार असून हा विभाग अधिक सक्षम करण्याचा मानस महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अग्निशमन विभागात कमी कर्मचारी असल्याने अडचणी येत असल्या तरी कमी कर्मचा-यांमध्येही काम केले जात आहे. मोठी घटना असली की कर्मचाऱ्यावर ताण येतो. त्यामुळे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे
गरजेचे आहे. – बी. एल. चंदनखेडे, अग्निशमन विभाग प्रमुख, महापालिका


Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2024

 

Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2024 Update – विभागातील निम्मी पदे रिक्त आहेत. सरकारने नव्या आकृतिबंधाला आणि सेवाभरती नियमाला मंजुरी दिली तरी पालिका प्रशासनाने मात्र रिक्त पदे भरण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे यंदाही अग्निशमन विभागाचा कारभार अपुऱ्या मनुष्यबळावरच चालणार हे स्पष्ट आहे. अग्निशमन विभाग महत्त्वाचा असल्याने विभागाचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. पण, सुरुवातीपासूनच प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. सरकारने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर केला, सेवाभरती नियमांनाही मंजुरी दिली. या निर्णयाला वर्ष उलटून गेले. तरीही प्रशासनाने नोकर भरती केली नाही. रोस्टरचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील १३ केंद्रांसाठी ८७२ पदे मंजूर आहेत. त्यात मुख्य अग्निशमन अधिकारी, स्टेशन ऑफिसर, उप अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशामक, ड्रायव्हर ऑपरेटर, वाहनचालक, अग्निशामक, टेलिफोन ऑपरेटर, मोटर फिटर, शिपाई-मजूर या पदांचा समावेश आहे. शहरातील नऊ केंद्रांसाठी विविध विभागात ६११ पदांची आवश्यकता आहे. सध्या अग्निशमन विभागात ३०३ कर्मचारी असून ४४९ पदे रिक्त आहेत.

Nagpur Agnishamak Vibhag Recruitment 2024

कार्यरत ३०३ कर्मचाऱ्यांमध्ये ४० पेक्षा अधिक कर्मचारी येत्या काही महिन्यात निवृत्त होणार आहेत. वाहन चालकांची ७ पदे रिक्त आहेत, यंत्रचालक १६२ पदे मंजूर असून त्यातील ४६ पदे रिक्त आहेत. सध्या ७५ पदांवर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. त्यातील काही पदे फायरमनची आहेत. उन्हाळ्यात आगीच्या अनेक घटना घडतात. ही बाब लक्षात घेतली तर अग्निशमन विभाग सक्षम असणे आवश्यक आहे. पण, सध्याचे अपुरे मनुष्यबळ बघता या विभागाला अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

 


नागपूर शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन विभागात ८७२ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या केवळ १४४ कर्मचाऱ्यांवर विभागाचा डोलारा सांभाळला जात -आहे. गेल्या दोन वर्षापासून रिक्त पदे भरण्याबाबत आकृतिबंधाला मंजुरी मिळूनही ४०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षात शहरात आगीच्या आणि इतरही -आपत्कालीन घटना बघता महापालिकेच्या अग्निशमन विभागात अपुऱ्या कर्मचान्यामुळे अनेकदा कामाचा ताण वाढत आहे. महापालिकेच्या आकृतिबंधानुसार अग्निशमन विभागात विविध विभागात एकूण ८७२ पदे मंजूर झाली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात नव्या पदासाठी भरती करण्यात आली नाही. शहरातील विविध भागात १५ केंद्राची आवश्यकता असताना सध्या केवळ ९ केंद्रे आहेत आणि त्यातील प्रत्येक केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. महापालिकेत ६३ फायरमनची कंत्राटी पद्धतीवर विभागात नव्याने पदभरती करणार आहे. या विभागातील निम्मी पदे रिक्त आहेत. 

 

 

सरकारने नव्या आकृतिबंधाला आणि सेवाभरती नियमाला मंजुरी दिली असली, तरी पालिका प्रशासनाने रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. महालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विभागांपैकी अग्निशमन विभाग -सुद्धा एक महत्त्वाचा विभाग आहे. विभागाच्या बळकटीकरणाकडे पालिकेच्या सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिलेले नाही. त्यामुळे जैसे थे स्थितीत या विभागाचे आजही काम सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या विभागासाठी मंजूर पदांची संख्या ८७२ आहे. परंतु ही संख्या १३ अग्निशमन केंद्रासाठी आहे. सध्या महापालिकेकडे ९ अग्निशमन केंद्र ९ आहेत.

 

त्यात मुख्य अग्निशमन अधिकारी, स्टेशन ऑफिसर, उप अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशामक, अग्निशामक, ड्रायव्हर ऑपरेटर, वाहनचालक, अग्निशामक टेलिफोन ऑपरेटर, मोटर फिटर, शिपाई-मजूर या पदांचा समावेश आहे. अग्निशमन विमोचक ५०० पदे असताना २९१ पदे रिक्त आहेत. प्रमुख अग्निशमन विमोचक ८१ पदे असताना ३७ पदे त्यात रिक्त आहेत. याशिवाय फिटर व वाहकांची १५ पदे असताना पाच पदे त्यात रिक्त आहे. राज्य सरकारने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर केला, सेवाभरती नियमांनाही मंजुरी दिली. या निर्णयाला दीड ते दोन वर्षे उलटून गेले, अद्याप प्रशासनाने नोकर भरती केली नाही. नोकर भरतीसाठी रोस्टरचे कारण पुढे केले जात आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
  1. SAGAR.DOLSE says

    Please my help job

  2. MahaBharti says

    New Bharti Update

  3. Aniket says

    Sir kdhi honar bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड