नागपूर महानगर पालिकेत ४०४ पदांसाठी नोकरीची संधी! – Nagpur CMYKPY Bharti 2024

Nagpur CMYKPY Bharti 2024, Ladka Bhau Yojna Nagpur Jobs

मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल सध्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देउन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. यासाठी पात्र युवकांनी मोठ्या संख्येत rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर २६ जुलै पासून ते ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. नागपुरातील उमेदवारांना हि एक नोकरीची सुवर्णसंधीच आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती व्हाट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagpur CMYKPY Bharti 2024

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने ५ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवाराला प्रतिमहा ६ हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांची दैनिक हजेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NMC CMYKPY Bharti 2024 Eligibility

NMC CMYKPY Bharti 2024 Eligibility

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे व त्याचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. योजनेत सहभागी होवू इच्छीणाऱ्या उमेदवारांनी इतर अटीची माहिती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक, अग्निशामक विमोचक, कनिष्ठ लिपीक, स्वच्छता निरीक्षक, सहायक शिक्षक (यु.डी.टी. माध्यमिक), सहायक शिक्षक (एल.डी.टी. माध्यमिक), वृक्ष अधिकारी, वायरमन या पदांवर ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी सहा महीने असणार आहे.

यासाठी पात्र युवकांनी मोठ्या संख्येत rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर २६ जुलै पासून ते ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे..

Click Here To Apply For NMC Nagpur CM Yuva Karya Prashikshan Yojana 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड