पदवी प्रवेश दुसरी मेरिट लिस्ट: नामांकित कॉलेजांच्या जागा भरल्या
Mumbai University Merit List Declared
Mumbai University Second Merit List Declared : मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील पदवी प्रवेशांची दुसरी मेरिट लिस्ट सोमवारी जाहीर झाली….
मुंबई विद्यापीठाअंतर्गत कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या यादीनंतर अनेक नामांकित कॉलेजांमधील जागा दुसऱ्या गुणवत्ता यादीतच पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे अनेक कॉलेजांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी तिसरी यादी जाहीर होणार नसल्याचे समजते. तर दुसऱ्या यादीतही काही कॉलेजांमध्ये कला शाखेत जागा शिल्लक नसल्याने गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याचे समोर आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यामुळे आता इतर कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टला रोजी जाहीर होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीचे वेध लागले आहेत. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा. यानंतर तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत, असे जाणकारांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून प्रवेश निश्चित केल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा खूप कमी होत्या. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत बहुतांश कॉलेजांच्या जागा भरल्या असून, शक्यतो तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नसल्याचे मत एका कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले. याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांची तिसरी यादी निश्चित लागणार आहे, असा दिलासाही या प्राचार्यांनी दिला.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सल्ला
यंदा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा पार पडलेल्या नाहीत. यामुळे इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपारिक बीएससीसाठी प्रवेश घेतला आहे. जेव्हा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राची प्रवेश प्रक्रिया पार पडेल त्यावेळस या जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजांत प्रवेश मिळालेला नाही. त्यांनी निराश न होता काही काळ प्रतीक्षा करावी, असा सल्लाही प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
काही महाविद्यालयांची कट ऑफ टक्केवारी –
साठ्ये कॉलेज
- बीए – ५३.८४
- बीकॉम – ७४.७६
- बीएससी – ६३.२३
- बीएससीआयटी : गणित विषयातील गुण – ६१
- बीएमएस : कॉमर्स – ८०.४६
- सायन्स – ६१.३८
केसी कॉलेज
- बीए (सायकोलॉजी) – ९५.१७
- बीकॉम (विनाअनुदानित) – ९१.५
- बीएससी (एसएमइपी) – ७०
- बीएमएस : आर्टस् – ८८.०४
- कॉमर्स – ९४
- सायन्स – ८९
- बॅफ – ९२.७७
- बीबीआय – ८६.०५
- बीएफएम – ९२
एचआर कॉलेज
- बीकॉम – ९४.४
- बॅफ – ९४.६
- बीएफएम – ९३.२
- बीबीआय – ८९.३८
- बीएमएस : आर्टस् – ८९.५
- कॉमर्स – ९५.८
- सायन्स – ८८.६
- बीएमएम : आर्टस् – ९२
- कॉमर्स – ८९.८
- सायन्स – ८५
पोदार कॉलेज
- बीकॉम – ९२.५०
- बीएमएस : आर्टस् – ८२.६२
- सायन्स – ८४.३१
- कॉमर्स – ९३.६
- इतर – ७५.२३
रुईया कॉलेज
- बीए (इंग्रजी माध्यम) – ९४.५
- बीएससी – ८४
- बीएससी (बायोटेक्नोलॉजी) – ८९.६०
- बीएससी (बायोकेमिस्ट्री) – ७०.१५
- बीएससी (कॉम्पुटर सायन्स) – ८२
विल्सन कॉलेज
- बीए – ९१.८
- बॅफ – ८६.९२
- बीएमएस : आर्टस् – ८२.१५
- कॉमर्स – ९१
- सायन्स – ८१
- बीएमएम : आर्टस् – ८८.८
- कॉमर्स – ८५.८
- सायन्स – ८४.२
सेंट झेविअर्स कॉलेज
- बीए (एमसीजे) : एचएससी बोर्ड – ८२.६५
- इतर बोर्ड – ८६
- बीएमएस : एचएससी बोर्ड – ८४.९१
- इतर बोर्ड – ९२.४४
- बीएससी : एचएससी बोर्ड – ७८
- इतर बोर्ड – ९१
डहाणूकर कॉलेज
- बीकॉम – ८२.१५
- बीएमएस : कॉमर्स – ८२.६२
- सायन्स – ६८
- बॅफ – ८२.३१
- बीबीआय – ७१.३८
- बीएफएम – ७४.३१
- बीएससी आयटी : गणित विषयातील गुण – ४५
रुपारेल कॉलेज
- बीए – ८८
- बीकॉम- ८१.२३
- बीएससी आयटी : गणित विषयातील गुण – ५८
- बीएमएस : आर्टस् – ६०
- कॉमर्स – ८५.५३
- सायन्स – ७१.०७
- बीएससी (कॉम्पुटर सायन्स) – ७१.६९
जोशी-बेडेकर कॉलेज
- बीकॉम – ८८.१५
Mumbai University First Year Degree Admission 2020 First Merit List Declared : बारावीचा निकाल यंदा चांगला लागला आहे. त्याचा परिणाम आज जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीवर दिसून येत आहे.
मुंबई विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी ३ वाजता जाहीर झाली. महाविद्यालयांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर मेरिट लिस्ट जाहीर केली. सर्व कॉलेजांमधील कला शाखेच्या कट ऑफमध्ये वाढ झाली आहे.
माटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालय वगळता सर्व ठिकाणी कला शाखेची कट ऑफ टक्केवारी वाढली आहे. वाणिज्य शाखांच्या प्रवेशांच्या कट-ऑफमध्येही सरासरी १ टक्क्याने वाढ झाली आहे. विज्ञान शाखेच्या प्रवेशांची कट-ऑफ संमिश्र आहे. काही ठिकाणी विज्ञान शाखेची कट ऑफ वाढली आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये कमी आहे.
विद्यार्थ्यांनी आज जाहीर झालेल्या यादीनुसार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणी करून शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे.
मुंबईतल्या काही नामांकित कॉलेजांची कट-ऑफ टक्केवारी पाहण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे –
- जयहिंद कॉलेज – https://bit.ly/33uXWbM
- एचआर कॉलेज – https://www.hrcollege.edu/degree-college-2/
- केसी कॉलेज – https://www.kccollege.edu.in/merit_list_2021.php
- रुपारेल कॉलेज – https://bit.ly/2EZUyeN
- विल्सन कॉलेज – https://www.wilsoncollege.edu/
- सेंट झेवियर्स कॉलेज – http://xaviers.edu/main/
- मिठीबाई कॉलेज – http://mithibai.ac.in/MERIT%20LISTS%202020-21/M__638
प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
- अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
- प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)
- प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)
- पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
- तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
सोर्स : म. टा.
Table of Contents
Sir mujhe arts me addmission lena hai konsha college mein lo addmission meine Andheri East Mumbai ki ke ho mujhe njdeka college chaiye so that recovering my answer