महत्त्वाचे – मुंबई मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे रिक्त
Mumbai Mantralaya Bharti 2020
मुंबई मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे रिक्त – Mumbai Mantralaya Bharti 2020
Mumbai Mantralaya Bharti 2020 : मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे (vacant posts of officers in Mantralaya) न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी. कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोर्स : डेली हंट