खुशखबर! मुंबईत नोकऱ्यांचे प्रमाण वाढले
Mumbai Bharti 2020
Mumbai Bharti 2020 : एका अहवालानुसार, मुंबईत सप्टेंबर २०२० महिन्यात नोकऱ्या देण्याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत २४ टक्क्यांनी वाढले आहे.
Mumbai Bharti 2020 : मुंबईत करोनाचा कहर अद्यापही पुरता कमी झाला नसला तरी दुसरीकडे हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. हजारो लोक बेरोजगार झाले. पण आता एक आशादायी चित्र समोर आले आहे. मुंबईत सप्टेंबर २०२० महिन्यात नोकऱ्या देण्याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत २४ टक्क्यांनी वाढले आहे. या नोकऱ्या विशेषकरून फार्मास्युटिकल कंपन्या आणि शिक्षण क्षेत्रातील आहेत.
सप्टेंबर महिन्यात, मुंबईत १,७५५ नोकऱ्या दिल्या गेल्या. ऑगस्टमध्ये ही संख्या १,४१३ होती. ही वाढ २४ टक्के आहे. नोकरी जॉबस्पीक इंडेक्सने हे निरीक्षण नोंदवले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नोकरी जॉबस्पीक हा नोकरीसंदर्भातील घडामोडींची नोंद ठेवणारा मासिक निर्देशांक आहे. नौकरी डॉट कॉम या जॉब पोर्टलच्या नोंदणीवर तो आधारलेला आहे. यानुसार, फार्मा कंपन्यांमधील नोकरीची उलाढाल ४४ टक्क्यांनी वाढली आहे. FMCG क्षेत्रात ४३ टक्के, शिक्षण आणि अध्यापन क्षेत्रात ४१ टक्के तर आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे.
तसेच, जसजसे अनलॉकचे टप्पे वाढत आहेत, म्हणजेच जसजसा लॉकडाऊन उठत आहे तसतसे विविध क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी निर्माण होत आहेत. रिअल इस्टेटमध्ये ४४ टक्के, ऑटोमध्ये २९ टक्के तर हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल्समध्ये ४८ टक्क्यांची वाढ आहे.
सोर्स : म. टा.