मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत विद्यावेतन थांबवू नये!- Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
Ladka Bhau Yojana Maharashtra 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून अकोले तालुक्यातील कार्यरत युवक आणि युवक्तींना नियमानुसार कामाचा मोबदला व किमान वेतन कायद्यानुसार दरमहा १० तारखेपर्यंत २० हजार रुपये विद्यावेतन द्या. प्रशिक्षणार्थीनी काम केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून दप्तर दिरंगाई झाल्याच्या कारणावरून प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन थांबवू नये, अशी मागणी तरुणांनी केली आहे. याबाबत आमदार किरण लहामटे यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांना जबाबदार धरून संबंधितांवर कारवाई व्हावी, अजूनही या प्रशिक्षणार्थीना एकही विद्यावेतन अद्यापपर्यंत आदा केले नाही, ते त्वरित त्यांच्या खात्यात वर्ग करावे. सहा महिन्यांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर अशा प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून द्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तरुणांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांना मागण्यांचे निवेदन दिले. कामाच्या ठिकाणीच कायमस्वरूपी नेमणूक द्या. शासकीय व निमशासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थीना १० टक्के राखीव जागा ठेवाव्या. यासह अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीनी आमदार डॉ. किरण लहामटे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे व गटविकास अधिकारी विकास चौरे यांना निवेदन दिले.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 Maharashtra -मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत राज्यात ८७ हजार १४९ युवक-युवती प्रशिक्षणार्थी म्हणून शासकीय निमशासकीय कार्यालयांसह विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कार्यकाळ संपणार असल्याने या योजनेला मुदतवाढ मिळणार की योजना गुंडाळली जाणार? याकडे प्रशिक्षणार्थीचे लक्ष लागून आहे. युवकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. शासकीय व निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा हेतू आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यात जवळपास ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले होते. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १९७२ प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. या प्रशिक्षणार्थीचा कालावधी हा सहा महिन्यांचा आहे. ऑगस्ट महिन्यात रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थीचा कालावधी जानेवारी २०२५ मध्ये तर सप्टेंबर महिन्यात रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थीचा कालावधी फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे. सहा महिन्यांनंतर या योजनेला मुदतवाढ मिळणार की कालावधी संपुष्टात येणार? या विचाराने प्रशिक्षणार्थीची धाकधूक वाढली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
काय भूमिका घेणार? या योजनेला मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्यभरातील प्रशिक्षणार्थी युवक-युवतीमधून जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे निवेदनांचा ओघ सुरू आहे. या निवेदनावर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे प्रशिक्षणार्थीचे लक्ष लागून आहे.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.
या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे.
लाडका भाऊ योजना म्हणजेच :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
या योजनेंतर्गत खालील तत्क्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना/उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
✅ 12 वि पास बेरोजगार विध्यार्थ्यांना भेटणार 6000 रुपये
✅ डिप्लोमा झालेल्या विध्यार्थ्याला मिळणार 8000 रुपये
✅ पदवीधर विध्यार्थ्याला मिळणार 10000 रुपये
????लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय
▪️वयोमर्यादा :- 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.
▪️या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
▪️या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
▪️शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.
▪️या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.
▪️अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
Comments are closed.