मुंबई विद्यापीठातर्फे UG प्रवेशपूर्व नोंदणीस मुदतवाढ
MU Admissions 2021
Mumbai University UG Pre-Registration Extension
MU Admissions 2021 : Mumbai University has more pre-admission students this year than last year. Students must register prior to admission when taking admission to degree courses. Meanwhile, for the convenience of students, the University of Mumbai has extended the pre-admission registration deadline.
मुंबई विद्यापीठामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेशपूर्व नोंदणी केली आहे. पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई विद्यापीठातर्फे UG प्रवेशपूर्व नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व नोंदणीची प्रक्रीया पूर्ण केली नाहीय त्यांच्यासाठी विद्यापीठातर्फे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेशपूर्व नोंदणी करावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पदवी प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रवेशपूर्व नोंदणी करणे बंधनकाकरक असते. ज्यांनी अद्याप ती केलेली नाही, त्यांना आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट www.mum.digitaluniversity.ac वर नोंदणी करता येणार आहे. यासाठी आता १० सप्टेंबर, सायंकाळी ६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
MU Admissions Application Process
Admission process for postgraduate courses by Mumbai University will start from 14th August. Students who want to get admission for this can fill the application by following the steps given in the news. Further details are as follow:-
मुंबई विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया १४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना यासाठी प्रवेश घ्यायचा आहे ते बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज भरु शकतात. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात एम.कॉम, एम.एससी., एम.ए. अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाने या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पीजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असेलेल उमेदवार मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट admissions.mu.ac.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. २६ ऑगस्ट २०२१ ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार खाली दिलेल्या स्टेप फॉलो करुन पीजी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करु शकतात.
How to Apply MU Admissions 2021
- प्रथम अधिकृत वेबसाइट admissions.mu.ac.in ला भेट द्या
- MU Admissions” या लिंकवर क्लिक करा.
- मागितलेली माहिती भरा
- फी भरा आणि सबमिटवर क्लिक करा
- भविष्यातील उपयोगासाठी फॉर्मची प्रिंट घ्या.
अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा स्कॅन केलेला जेपीजी, पीएनजी किंवा जेपीईजी फाईलमधील फोटो आणि सही अपलोड करावी. फाईलचा आकार पाचशे केबीपेक्षा कमी असावा.
Table of Contents