JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

दिव्यांग विभागाच्या भरतीला खोळंबा; फक्त आठ अधिकाऱ्यांवर विभागाची जबाबदारी । MSHFDC Mumbai Bharti 2025

MSHFDC Mumbai Bharti 2025

दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्यात आला असला, तरी या विभागाला अद्याप पूर्ण स्वरूपात कर्मचारी मिळालेलं नाही. सुमारे १,९०० कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या या विभागाची जबाबदारी सध्या केवळ आठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक योजना अंमलबजावणीअभावी अडकून पडलेल्या आहेत.

या नव्या विभागात दिव्यांग वित्त विकास महामंडळ आणि त्यांची कार्यालये देखील अंतर्भूत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून विभागात पुरेशा मनुष्यबळाचा अभाव असल्याने विभागाचा कार्यवेग मंदावला आहे. राज्य शासनाने विभागासाठी २,०६३ नवीन पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला असला, तरी ती नेमकी केव्हा भरली जाणार, यावर अजूनही स्पष्टता नाही.

सध्या महाराष्ट्रात ३० लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्ती असून, यापूर्वी त्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या योजना सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवत होते. जिल्हा पातळीवर हे काम जिल्हा समाजकल्याण अधिकारी करत होते. आता स्वतंत्र विभाग स्थापन झाल्यानंतरही उपसचिव (२), कक्ष अधिकारी (२), सहाय्यक कक्ष अधिकारी (२) आणि लिपिक-टंकलेखक (२) एवढेच कर्मचारी नियुक्त आहेत.

“स्वतंत्र दिव्यांग विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी आम्ही एमपीएससीकडे पाठपुरावा करत आहोत. काही महिन्यांत ही पदे भरली जातील,” अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिली.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

 

 

 


 

MSHFDC Mumbai Bharti 2024

MSHFDC Mumbai Bharti 2024: MSHFDC Mumbai (Maharashtra State Handicapped Finance & Development Corporation Limited, Mumbai) has recently announced recruitment notification for the vacant posts of  “Retired Employee”. Eligible candidates can apply before the 14th of February 2023. The official website of MSHFDC is mshfdc.co.in. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई (MSHFDC Mumbai) अंतर्गत “सेवानिवृत्त कर्मचारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त कर्मचारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई खोली नं. ७४, तळमजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mshfdc.co.in

MSHFDC Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त कर्मचारी02 पदे

How To Apply For MSHFDC Mumbai Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSHFDC Mumbai Vacancy details 2024

MSHFDC Mumbai Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra State Handicapped Finance & Development Corporation Limited Bharti 2024| mshfdc.co.in Recruitment 2024

???? PDF जाहिरात
shorturl.at/nQVZ7
✅ अधिकृत वेबसाईटmshfdc.co.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड