तांत्रिक अडचणीमुळे लघुलेखन परीक्षा रद्द! – MSCE Pune ShortHand Exam Postponed
MSCE Pune ShortHand Exam Postponed
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक लघुलेखन (शॉर्टहॅण्ड) परीक्षेचे बुधवारी दि. २६ रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र, उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने अनेक केंद्रांवर लघुलेखनाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे बुधवार, दि. २६ जून रोजी होणाऱ्या लघुलेखन परीक्षा येत्या २८ जून रोजी पुन्हा आयोजित केल्या जाणार आहेत.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परीक्षा परिषदेतर्फे यंदा प्रथमच लघुलेखन परीक्षा संगणकावर आयोजित केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकावर ऑनलाईन लॉग इन करावे लागणार होते. परंतु, बुधवारी दि. २६ रोजी सकाळच्या दोन्ही सत्रांमध्ये सर्व्हरच्या काही तांत्रिक अडचणी आल्या आणि अनेक परीक्षा केंद्रांवर लघुलेखनाची परीक्षा होऊ शकली नाही. तसेच दुपारच्या सत्रातील परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत.
२६च्या परीक्षा २८ रोजी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
■ २६ जून रोजीच्या संपूर्ण दिवसाच्या परीक्षा येत्या २८ तारखेला रूपांतरित करण्यात आल्या आहेत.
■ तसेच दि. २७ जून रोजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांना दिली तसेच सर्वांनी आपापल्या विद्यार्थ्यांना हा संदेश पाठवावा, असे त्यात नमूद केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.